आकुंचन

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
16 Apr 2011 - 12:55 am

कोठे गेले पूल, कोठे गेले रस्ते,
सापडत नाहिये व्यायामशाळा
मुलांचे दप्तर, वह्या अन झब्बे
अन आज काय तर गेले पाणी
अन सोबत गेल्या वाहूनी जल-वाहिन्या

दॄष्टीहिनास मिळाला आज काय सांगू
जड-वाहन चालविण्याचा परवाना
गल्ली-बोळात गरज तिथे उभा आज
वैद्यकिय सहाय्य्कांचा दवाखाना

ओरबाडली गेली लज्जा कुणाची
दमटवले गेले कुणाला
दाबली जमीन कुणाची
तर खल्लासच केले कुणाला

अपंग व्यवस्था, लुळे कायदे
लुटले गेले आज भर चौकात
मज दिसलेच नाही हे सगळे काय सांगू
'व्यस्त' होतो मी 'जवळचे' बघताना

लोचट-गिरी ला उरले नाही वय
पाहावा तिथे रोग मानसिक विकॄती चा
लहान असो वा मोठी - लाज कुणाची
तिला वरतून खाली बघातांना

साठे झाले जप्त, साखरेचे, मात्र गोडवा अनुपस्थित
बातमीत कांदे-बटाट्यांसोबत -
शब्द ही झाले आहेत महाग हल्ली
स्मित हास्याचाही पडला आहे तुटवडा

झाले घराचे कुंपण छोटे, मनाचेही, मस्तकाचेही
आकुंचले आहेत हृदय , मदतीस धावणारे हातही
"ना आउंगा मै तेरे घर, ना तु मेरे आना"
देश, समाज, आदर, मानवी-मुल्ये?
श्श्या..असलं काय सांगता राव- काही चवदार सांगाना

कविता

प्रतिक्रिया

हम्म!! तुमची तगमग छान उतरली आहे.
काय करणार याला.. परिस्थिती अशी नुसतीच नाही सुधारत ना!

ajay wankhede's picture

16 Apr 2011 - 7:49 am | ajay wankhede

झाले घराचे कुंपण छोटे, मनाचेही, मस्तकाचेही
आकुंचले आहेत हृदय , मदतीस धावणारे हातही
व्वा..अजुनही वेळ गेलेलि नाही...

च रैवेति..च रैवेति.

प्रकाश१११'s picture

16 Apr 2011 - 11:51 am | प्रकाश१११

निनाव - मस्त नि झकास

साठे झाले जप्त, साखरेचे, मात्र गोडवा अनुपस्थित
बातमीत कांदे-बटाट्यांसोबत -
शब्द ही झाले आहेत महाग हल्ली
स्मित हास्याचाही पडला आहे तुटवडा

चांगली लय लागलीय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Apr 2011 - 12:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रे!!