मी एक मिडल क्लास ...............
सकाळी साडे सहाचा गजर वाजतो
तो मी चरफडत बंद करून टाकतो
चला ऑफिसला जायचे (च )म्हणून
रडत - खडत साडेसातला उठतो
मला झालेली असते आंघोळीची घाई
त्यात पेपरला न्यूज असते आज तुमच्या एरियाला
टिंब टिंब कारणामुळे पाणीपुरवठा नाही
कसेबसे ४ मग्गे घेऊन स्नान करावे
कुठ राहिला फेस ,अन साबण तर टॉवेलाने पुसावे .....
कॉर्न फ्लेक्स रोजची चैन , आपल्याला परवडत नाही ,
रोजचचेच कांदे -पोहे ,उपमे घशाच्या खाली उतरत नाही ,
म्हणून कोपर्यातल्या गाडीवर दोन मस्का पाव मारतो ...
कसेबसे आवरून गाडीला किक टा़कतो
समोरच दुधवाला अन धोबी बिल द्या म्हणू छेडतो..
कसेबसे ढाका मारून त्यांना कटवतो
च्यायला नसती कटकट करत पुन्हा करतो गाडी स्टार्ट
पुढच्या चौकात सिग्नल माझीच पहात असतो वाट
कसाबसा सिग्नल पार करत सुटतो
घडी - घडी, घडीत किती वाजलेत बघतो
आज मी घाई घाईत डोक्यात माठ ( हेल्मेट) घालायला विसरतो
बरोबर तीच संधी साधून मला ट्राफिक पोलीस गाठतो
घेरे याला साईडला म्हणून चलन बुक काढतो
जरा तुझ लाईसन पाहू ?कुठ राहतोस तू भाऊ ?
तू नियम मोडला आहे
चलन फाडणे हाच यावर तोडगा आहे
मला वाटत याला कोपच्यात घेऊन दोन लाथा का मारू नये?
तेवढ्यात माझ मन सांगत "अशा लोकांशी नडू नये "
५६ शिव्या देवून (मनात) मी चलन फाडतो ..
(साले रस्ते निट बनवा आधी ,मग हेल्मेटची गरज पडणार कशी ?)
नगरसेवक फक्त आम्हाला वाढदिवसाच्या होर्डींग्स मध्येच दिसत्तात
एरवी ते गटार शुभारंभ ,पाईप लाईन शुभारंभ अशा कामातच बिझी असत्तात
घड्याळात 9 .15 चा काटा पुढे सरकतो
कसाबसा मी ऑफिसला येऊन धडकतो
माझे विनम्र बॉस मला रस्त्यातच भेटतात
" गुड मोर्निंग सर " असे म्हणून आम्हालाच चिडवतात
कोपर्यातला शीपाई खिक्कन हसतो
थांब जरा ,भेट तू, तुझ्या कानाखालीच लावतो
संध्याकाळी माझा जीव शिणलेला असतो
कसबसा मी ट्राफिकशी दोनाचे चार करत घरी पोचतो
आई गरमगरम चहा घेऊन येते
फार काम होत ? किती दमलास म्हणून मायेने विचारते
चला आता थोडी मॅच तरी पाहू ,तर लाईट माउली जाते
४ तासाचे सक्तीचे भार नियमन नुसते
सामान्यांचे तोटेच तोटे....
कालच आमदाराच्या मुलिच लग्न झाल
तिथे अख्या गावाला पुरेल एवढी रोषणाई
तिथे का नव्हते भार नियमन
अन पाण्याची टंचाई
इथे आम्हाला प्यायला पाणी नाही
अन तिथे पाण्याचे कारंजे उडत होते
आम्हाला १० च्या नंतर लौड स्पीकरला बंदी
तिथे रात्रभर डि जे बोंबलत होते .........
साला रोज रोज तेच लाईफ
सामान्यांचे किती बेक्कार लाईफ
वीकेंडला मला गर्लफ्रेंडला बाहेर घेऊन जायचे असते
खिशात हात घालतो तर फक्त ५०० ची नोट ,
महिना अखेरी असते
तीच आपल तूनतून ,आपण मल्टीप्लेक्सला फलाना पिक्चर पाहु
अन मॅक डोनाल्ड मध्ये जाऊन चीझ पिझ्झा खाऊ
मी :- अग तो पिक्चर फार बेक्कार आहे शी ..........
ती :- नाही ,त्यात माझा आवडता रुख रुख आहे आणि तो मी बघणारच आहे
५०० रुपयात काय डोम्बल होणार ?
पिक्चर बघणार कि पिझ्झा खाणार ?
शेवटी मी बळेबळे मांडवली करतो
पिक्चर बघू कधीही, आधी तुला पिझ्झा चारतो
नको नको जाऊ दे आज
आपण मस्त पैकी गप्पा मारुया
आणि पाणी पुरी चाट,
भेळ भत्ता खाऊया
ती हि एक मध्यम वर्गीय
ती पन स्वप्न पाहते कधीतरी मोठे
मी आहे तिचे आभाळ
स्वप्न झालीत मोठे अन आभाळ पडले छोटे
मला ह्या मिडल क्लास इमेजमधून बाहेर पडायचे आहे
कितीही ओव्हर टाईम मारला तरी सॅलरी पुरत नाही
महिना अखेरीला १००० हि हातात उरत नाही
मी काय स्वप्न पाहू अन तिला दाखवू
मला पण कधीतरी "सीग्रम "
चे दोन पेग मारायचे आहे
मला पण अनुभवायचेत श्रीमंती थाट
साल्ला आपली लाईफ काय ?
तोच धोबी अन तोच घाट
चला आता झोपतो ,अपुर्या सुंदर स्वप्नाची पहात वाट .... :)
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 1:56 pm | विसुनाना
या ओळी आवडल्या.
साधी-सोपी कविता म्हणता येईल असे स्फुट.
15 Apr 2011 - 1:55 pm | सूर्यपुत्र
स्वप्न झालीत मोठे अन आभाळ पडले छोटे
हे आवडले. :)
-सूर्यपुत्र.
15 Apr 2011 - 2:02 pm | प्रीत-मोहर
वावा मस्त ....
खूप आवडल
15 Apr 2011 - 1:56 pm | नगरीनिरंजन
लय भारी!
15 Apr 2011 - 1:59 pm | इंटरनेटस्नेही
सही पियु! अतिशय उत्तम!
15 Apr 2011 - 2:03 pm | नगरीनिरंजन
लय भारी!
15 Apr 2011 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त लिखाण ग.
एकदम आवडले.
मुक्तक आधी 'मी कधीच रिस्क घेत नाही' च्या अंगाने जाणारे वाटले, मात्र नंतर नंतर ट्रॅक आणी शब्द एकदम निराळे आणि भन्नाटच.
15 Apr 2011 - 2:12 pm | ५० फक्त
ओळखलं तुम्हाला, नव कवि का काय म्हणतात ना ते आहात तुम्ही.
पण एक सांगतो या अशा कविता मिडल क्लास लोकाना जमत नाहीत, ते फक्त स्वप्नं बघतात, ती कागदावर उतरवायची पण त्यांना भिती वाटत असते. कुणी हसलं तर काय घ्या आपल्या स्वप्नांना.
पण या भितीची फ्रेम फार फार हलकी असते, अगदी कचकड्याची, ती तोडायचा जे प्रयत्न करतात ना ते नेहमीच यशस्वी होतात.
आणि मग आपण पण असंच व्हायचं हे अजुन एक स्वप्न बाकी उरलेल्या मिडल क्लास वाल्यांच्या डोळ्यात यायला लागतं.
त्यामुळं तुम्ही मिडल क्लास लोकांची स्वप्नं बरोबर टिपली आहेत, त्याबद्दल धन्यवाद.
15 Apr 2011 - 2:15 pm | पियुशा
एक छोटासा प्रयत्न करुन पाहिलाय साहेब :)
"मला पन एक इमेज तोडायचि होति बालकथेतिल नायिके चि ;)
धन्यवाद !
15 Apr 2011 - 2:16 pm | गणेशा
छान ..
मिडलक्लास जीवन आवडते मला..
रोजचा दिवस एक नाविन्य घेवुन येतोच.. शिकवतो.. धक्के देतो .. पण मस्त असतो ..
गर्लफ्रेंडसाठी पाउस नाहि पाडु शकलो तरी तीचे आभाळ होण्यातला येथेच आनंद असतो ...
आईची माया . कसले ही घर असले तरी घराची ओढ लावतेच ..
श्रिमंतीची स्वप्ने पाहण्यात पण आनंद असतो.. कदाचीत ती स्वप्ने पुर्ण होतील तेंव्हा.. उरलेल्या मिडलक्लास लोकांचा क्लास समजावुन -सामावुन घेण्यात पण आनंद बाळगळ्याची आस असतेच त्या स्वप्नांपाठीमागे
लिहित रहा.. वाचत आहे...
15 Apr 2011 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला !! काय एकेक दवणीय* प्रतिसाद सुचतात लोकांना.
(श्रेय :- नंदन)
15 Apr 2011 - 2:23 pm | स्पा
झकास
15 Apr 2011 - 2:24 pm | टारझन
विडंबण सुचते आहे , पण गप्प रहायचे ठरवले आहे .
- मी एक थर्ड क्लास ...
15 Apr 2011 - 3:22 pm | मी-सौरभ
टाका की विढंबण...
15 Apr 2011 - 4:51 pm | पियुशा
टारु गप्प बस्ला चक्क आज
डोळॅ पानावले :)
15 Apr 2011 - 2:55 pm | sneharani
मस्त लिहलस ग!
15 Apr 2011 - 3:02 pm | नन्दादीप
मस्त...!!! छान...
15 Apr 2011 - 3:04 pm | प्रचेतस
छान लिखाण. आवडले.
15 Apr 2011 - 3:04 pm | असुर
मस्त जमलंय!!! आणि विषयसुद्धा भारी फिरवलाय!!!
--असुर
15 Apr 2011 - 3:17 pm | प्यारे१
छानच्चे
आभाळ छोटं पडतंय म्हणजे थोड्याच दिवसात जी एफ कलटी डॉट कॉम करणार असे दिसते.
बाकी ही 'हा पियु' आहे का????????
काय प्रा? ( म्हणजे काय भाऊ हो नाहीतर उगाच दुसरे समजायचा)
15 Apr 2011 - 3:19 pm | मृत्युन्जय
आपण मस्त पैकी गप्पा मारुया
आणि पाणी पुरी चाट,
भेल भत्ता खाऊया
सांभाळून खा म्हणजे झालं. किमान पाणीपुरीवाला भैय्या नाही हे बघा. ;)
बाकी मुक्तक आवडले. :)
15 Apr 2011 - 3:25 pm | नरेशकुमार
खरायं,
कोणे एके काळी आपलं पन असंच होत होत. पन आजकाल आपन उच्च वर्गात मोडतो,
लक्ष्मिचा पायगुण अजुन काय.
बाकी, कविता चांगली आहे पियुषा मॅडम.
शेवटी एक (बुद्धीवजा)प्रश्न :
१००० हे INR की USD ?
15 Apr 2011 - 3:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान छान!!
15 Apr 2011 - 3:51 pm | प्राजक्ता पवार
छान .
15 Apr 2011 - 5:05 pm | प्रास
जमलीय की मस्त.....!
बीइन्ग मध्यमवर्गीय, जणू माझीच गोष्ट..... ड्वॉळे पाणावत..... आवल्डीय.....!!
:-)
15 Apr 2011 - 5:32 pm | RUPALI POYEKAR
खुपच छान झालीय कविता
15 Apr 2011 - 5:48 pm | राजेश घासकडवी
मध्यमवर्गीयाची व्याख्या बदललेली जाणवली. तीस - पस्तीस वर्षांपूर्वीचा मध्यमवर्गीय बसने किंवा ट्रेनने जायचा. मल्टिप्लेक्स, पिझ्झा वगैरेंवर पाचपाचशे रुपये खर्च करण्याऐवजी थेटरात पाच रुपयाचा पिक्चर आणि घरी येऊन वरणभात खायचा. मोबाईल काय, त्याच्या घरीदेखील फोन नसायचा.
पुलंनी वर्णन केलेला बटाट्याच्या चाळीत रहाणारा साठ वर्षांपूर्वीचा मध्यमवर्गीय तर याहून खूपच गरीब होता. पण जास्त सोशीक होता बिचारा.
15 Apr 2011 - 8:12 pm | लिखाळ
खरं आहे !
कविता वाचून डोळे पाणावले :)
15 Apr 2011 - 8:43 pm | अप्पा जोगळेकर
मध्यमवर्गीयाची व्याख्या बदललेली जाणवली
हो. पण पिर्पिर करण्याची वॄत्ती तशीच आहे.
तरीही कविता आवडली.
15 Apr 2011 - 6:03 pm | वाहीदा
पियू ,
तुझी कविता तुझ्या इमेजच्या अगदी हटके रचलीस
बाय द वे मिडल क्लास हा नेहमी पुरुषच का असतो ?
ती हि एक मध्यम वर्गीय
ती पन स्वप्न पाहते कधीतरी मोठे
मी आहे तिचे आभाळ
स्वप्न झालीत मोठे अन आभाळ पडले छोटे
मला ह्या मिडल क्लास इमेजमधून बाहेर पडायचे आहे
तिचे आभाळ तो ? कधी ती पहाट उजाडणार, जेव्हा स्त्रीयांच्या विचारात तरी त्यांचे एक स्वतःचे आभाळ असणार ???
हल्ली दोघेही कमवितात मग दोघांनी स्वप्न्-पूर्ती एकत्रच करायची की, त्यात काय मोठं? - फिफ्टी फिफ्टी ,
मामला फिट्ट :-)
15 Apr 2011 - 7:57 pm | निनाद मुक्काम प...
अनिवासी व्यथा
कांदे -पोहे ,उपमे रोजची चैन , आपल्याला परवडत नाही
कॉर्न फ्लेक्स घशाच्या खाली उतरत नाही ,
आपल्याला वेळ नसतो व आई आणी बायकोमधील फरक हा नेहमीच असतो .
नवरा बायकोत असते समानता किंवा ५० % काम वाटून घेणे
.पण आई साठी मी नेहमीच दुधावरची साय असतो .
मन्या ला त्याची आई तो ऑफिसातून लवकर आला तर कांदेपोहे करून देते
आमची मात्र आभसी जगतातून आभासी चौकशी होते .
कट्यावर कट्टे होतात. .आभसी जगतातील दोस्तांच्या वास्तविक जगतात निखळ गाठीभेटी होतात .
हसत, खिदळत, दिलखुलास, मनमुराद गप्पा मारत
आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात गुपचूप चोरासारखे
'' आज तू सुंदर दिसते'' अशी सरावाची वाक्ये फेकून बेचव अन्न पोटात ढकलत ..
15 Apr 2011 - 9:57 pm | असुर
मुक्तक आवडलं की!!! आणि बरचसं खरंदेखील आहे!!
--असुर
16 Apr 2011 - 9:40 am | वाहीदा
आवडले .
खास करुन पण आई साठी मी नेहमीच दुधावरची साय असतो .
15 Apr 2011 - 8:51 pm | माझीही शॅम्पेन
ज ब रा !!! एकदम कडक !!!
संदीप खरेनि त्याच्या नावावर खपवली तर अजुन एक हीट गाण होईल ! ( कृ. ह. घ्या , कविता शोलिड आहेच)
15 Apr 2011 - 9:31 pm | किशोरअहिरे
आता पाणी पुरी नका म्हणु हो थोडे दिवस :)
बाकी लिखाण एकदम झ्याक
16 Apr 2011 - 2:17 am | शिल्पा ब
छान लिहिलंय.
17 Apr 2011 - 3:44 pm | पियुशा
सर्व वाचकान्चे आभार
:)