काळ काम वेगाचा गणित सोडवताना हिशोब वयाचे राहून गेले,
घर बांधता बांधता घरपण मागे राहून गेले.
मनात कितीही योजिले होते तुझ्यासाठी,
भरभरून ते सगळे तुला द्यायचे राहून गेले.
कधीतरी एकांत वेळी आता आठवत काय ते,
करूया करूया म्हणत प्रेम तुझ्यावर करायचे राहून गेले.
सरणावर आता पसरुनी, मना एकच वाटते,
प्याले दोन डोळ्याचे, रिते करायचे राहिले.
प्रतिक्रिया
11 Apr 2011 - 10:42 am | चिरोटा
भावूक कविता.
11 Apr 2011 - 11:13 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच आहे..... पण हे कुठेतरी आधी वाचले आहे....
12 Apr 2011 - 1:23 am | निनाव
कविता सुंदरच आहे!!
12 Apr 2011 - 2:48 am | प्राजु
आवडली कविता.
12 Apr 2011 - 5:05 pm | बन्या बापु
धन्यवाद..
25 Apr 2011 - 1:09 pm | राजाराम पत्कर
बन्या मस्त कविता आहे रे.... एकदम बापु...
26 Apr 2011 - 8:19 pm | अमित गायकवाड
सहि आहे कविता खुपच
28 Apr 2011 - 9:07 am | विसोबा खेचर
वा..!
29 Apr 2011 - 10:17 am | निनाद
छान! पण मला सुरेश भटांची कविता आठवली.