खालील बातमीचा मथळा वाचून त्यात काही गैर वाटले का?
Corruption has no place in armed forces: Antony
याबातमीत ऍन्टोनी साहेब खडसावून सांगतात की "सैन्यदलातील भ्रष्टाचार अजीबात खपवून घेतला जाणार नाही".
नक्की कुठला नैतीक आधार आपण सैन्यदलास देत आहोत आणि नक्की कुठला आदर्श (निदान बोलण्यात तरी) जनतेसमोर मांडत आहोत?
प्रतिक्रिया
10 Oct 2007 - 11:56 pm | टग्या (not verified)
यात नेमके काय गैर आहे ते कळले नाही.
11 Oct 2007 - 2:55 am | विकास
यात नेमके काय गैर आहे ते कळले नाही.
याबातमीत ऍन्टोनी साहेब खडसावून सांगतात की "सैन्यदलातील भ्रष्टाचार अजीबात खपवून घेतला जाणार नाही".
याचा अर्थ इतर ठिकाणचा भ्रष्टाचार चालेल...म्हणून म्हणले पॉलितीकली इनकरेक्ट
विकास
12 Oct 2007 - 12:31 am | धनंजय
त्यांना सैन्यातील भ्रष्टाचाराबद्दलच काही करता येते, म्हणून "आपण काय करणार" असे सांगितले असणार. शिवाय, सैन्याचे कुटुंब म्हणून प्रेम असेल, "आमच्या सैन्यात हे खपवून घेणार नाही", तुम्ही बेशिस्त बिगर-सैन्यवाले, तुमचे तुम्ही पाहून घ्या!
12 Oct 2007 - 2:38 am | बेसनलाडू
तीन महिन्यांपूर्वी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलेले ब्रह्मसत्य आठवले. ते असे -
"भ्रष्टाचार हा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू नाही. भ्रष्टाचारी समाजव्यवस्थेतही संपन्न भारताचे स्वप्न बघणे आणि ते वास्तवात येणे शक्य आहे. थोडक्यात, भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीयवाद."
अर्थात यात भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका किती उपहासात्मक आणि किती गंभीरतेने घ्यावी, हा कदाचित वादाचा विषय होईल, पण जातीयवादाबाबतचे विधान खचितच चूक नसावे.
असो.
(अवांतर)बेसनलाडू
12 Oct 2007 - 2:53 am | विकास
यात भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका किती उपहासात्मक आणि किती गंभीरतेने घ्यावी, हा कदाचित वादाचा विषय होईल, पण जातीयवादाबाबतचे विधान खचितच चूक नसावे.
जातीयवादाबाबतचे विधान बरोबर आणि गंभीरपण आहे. भ्रष्टाचाराबाबत "एका अस्वस्थ दशकाची डायरी" लिहीणारे धर्माधिकारी उपहासाने बघतील/बोलतील कदाचीत पण त्यांच्या नजरेत त्याचे गांभिर्य कमी असेल असे वाटत नाही..
12 Oct 2007 - 6:39 am | बेसनलाडू
आपल्या जातीयवाद आणि भ्रष्टाचाराबाबतच्या मताशी सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू
अवांतर - प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात माझा प्रतिसाद अवांतर असल्याने तसे म्हटले. असो.
(खुलासेवार)बेसनलाडू
18 Oct 2007 - 6:14 pm | आजानुकर्ण
अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक जबरी आहे.
- (वाचक) आजानुकर्ण
अविनाशदांची लेखनशैली आवडते बॉ.
- (गुणग्राहक) आजानुकर्ण
11 Oct 2008 - 6:48 am | d_vaibhav
अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक कोणाकडे इ-पुस्तक आहे का? If you have pdf version of this book then please forword it to me.
आभार,
वैभव.
12 Oct 2007 - 11:51 am | सर्किट (not verified)
धर्माधिकारींशी सहमत आहे !
ही भूमिका उपहासात्मक नाही. २००४ मध्ये धर्माधिकारींशी बे एरियातच चर्चा करण्याचा योग आला होता (स्थळ सान्ता क्लारा लायब्ररी), आणि त्यातही ते हेच म्हणाले होते.
- सर्किट
12 Oct 2007 - 4:20 pm | विकास
२००४ मध्ये धर्माधिकारींशी बे एरियातच चर्चा करण्याचा योग आला होता
त्याच सुमारास मी पण बॉस्टनमधे त्यांना भेटलो होतो. (नंतर पुण्यातपण भेट झाली होती). त्यांचा तेंव्हा "आपण त्यांच्या समान व्हावे" हा भाषणाचा संच घेतला होता. शिवाजी, विवेकानंद, शाहू महाराज, म. फुले, आंबेडकर, सावरकर, गांधीजी आणि सर्वात शेवटी एक सर्वसामवेषक प्रत्येकी दोन अशा १६ सीडींचा तो संच होता. खूप चांगली आणि वेगळी माहीती (नुसत्याच नेहेमीच्या गोष्टी नाहीत) त्यात त्यांनी सांगीतली होती.
15 Oct 2007 - 9:21 am | कोलबेर
भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीयवाद.
जातीयवाद आणि भ्रष्टाचार ह्या दोन्ही तुलना न करता येण्याइतक्या भिषण समस्या आहेत. "पैसे खायचे तर खाऊ द्या काम तर करता आहेत ना!" ह्या वृत्तीमुळे भ्रष्टाचाराची तिव्रता कमी न होता उलत वाढते असे मला वाटते.
कोणत्याही ठीकाणी साधारण १० टक्के लोक हे जन्मत: अतिभ्रष्ट आणि १० टक्के लोक हे जन्मत:च प्रामाणिक असतात. बाकी ८०%च्या कॉन्शंसला मात्र 'पैसे खाल्ले तर काय झाले, काम तर करतो आहे ना!' हे समर्थन मिळते आणि भ्रष्टाचार बोकाळतो.
कोणाकडूनतरी पैसे घेऊन केलेले काम, हे काम न करण्यापेक्षा घातक असते. कारण त्यामूळेच बांधल्या पासून महिन्याभरातच पूल कोसळतात आणि निरपराध लोकांचे जीव जातात. त्यापेक्षा तो पूल न बांधलेलाच बरा.
तेव्हा तात्पर्य काम होते आहे म्हणून भ्रष्टाचाराची समस्या निवळते असे मलातरी वाटत नाही.
15 Oct 2007 - 1:07 pm | बेसनलाडू
मला वाटते, भ्रष्टाचाराच्या समस्येची गंभीरता त्यांनी नाकारलेली नाही. मात्र गिवन ए चॉय्अस ऍन्ड सिविएरिटी, जातीयवाद भ्रष्टाचारापेक्षा जास्त खतरनाक आणि म्हणूनच अधिक असह्य वाटतो.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
15 Oct 2007 - 11:42 pm | कोलबेर
बरोबर. इतकेच बोलुन ते थांबले असते तर पटले असते. असहमती आहे ती दिलेल्या खालिल कारणाला.
>>"भ्रष्टाचार खपवता येईल. काम करण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचेत का तुम्हाला? घ्या! पण काम करा. हा संदेश!! "
20 Mar 2008 - 6:56 pm | चतुरंग
भ्रष्टाचार हा वाईटच. त्याचा संबंध नैतिक/अनैतिकतेशी येतो. त्याची व्याप्ती मोठी असली तरी तो पकडणे/रोखणे काही प्रमाणात शक्य आहे. आणि तो असला तरी प्रगती होऊ शकते.
लोकांच्या मनात ह्याविषयी असलेल्या संकल्पनाना मूर्त स्वरुप देता येते.
त्या उलट जातीयवादाचे स्वरूप फार सूक्ष्म आहे. आपल्या समाजाशी बांधिलकी कुठे संपते आणि जातीयता कधी सुरु होते ह्यातली सीमारेषा फार अंधुक आहे आणि ती ओळखायला फारच शहाण्या समाजाची गरज आहे. हा रोग फार पूर्वीपासून समाजमनात घट्ट पाळेमुळे रोवलेला आहे तो असा सहजासहजी जाणवणारा, पकडता येणारा, रोखता येणारा नाही कारण त्याचा संबंध भावनांशी आहे. तो कधी, कुठे, कसे डोके वर काढेल कळत नाही. एकदा भावना भडकवल्या की विवेक संपतो आणि त्यानंतर रोग बळावतच जातो. एकमेकाचे पाय खेचण्यात सर्व प्रकारची शक्ती खर्च होते आणि प्रगती थांबते.
चतुरंग
18 Oct 2007 - 6:12 pm | आजानुकर्ण
अँटनी साहेबांचे बरोबर आहे.
पहिलीच्या वर्गात सूचना देताना गुरूजी "मुलांनो बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही" असे म्हणतात... त्याचा अर्थ दुसरीतल्या मुलींचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाईल असा थोडाच आहे.
- (सूक्ष्मनिरीक्षक) आजानुकर्ण
ऑडियन्स बघून त्यांनी ऍडिशन घेतली आहे असे म्हणावे लागेल.
- (प्रेक्षक) आजानुकर्ण
20 Mar 2008 - 6:22 am | सृष्टीलावण्या
सैन्यात भ्रष्टाचार होणे वाईट पण म्हणून सरसकट भ्रष्टाचार वाईट असे म्हणता येणार नाही.
लाच देण्याने देणारा आणि घेणारा दोघे ही खुश. कामे पटपट होतात. कामे न करता झोपा काढणारे सरकारी बाबू लोक क्रियाशील होतात. काळा पैसा तिजोरीत पडून न राहता चलनात राहतो. एकूण काय मी म्हणेन लाच देणे आणि घेणे वैधानिक करून टाका.
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
20 Mar 2008 - 2:41 pm | इनोबा म्हणे
एकूण काय मी म्हणेन लाच देणे आणि घेणे वैधानिक करून टाका.
हो! मुंबईत करुन टाका.पुण्यात तरी गरज नाही त्याची.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
20 Mar 2008 - 3:30 pm | मनस्वी
आणि ज्यांची लाच द्यायची लायकी नाही त्यांनी काय करायचे??
20 Mar 2008 - 4:00 pm | आनंदयात्री
लायकी पेक्षा ऐपत शब्द कसा वाटतो ?
आणि ज्यांची लाच द्यायची ऐपत नाही त्यांनी काय करायचे??
20 Mar 2008 - 4:40 pm | मनस्वी
शब्द सुचला नाही.
"ऐपत" असे वाचावे.
मनस्वी
20 Mar 2008 - 7:26 pm | llपुण्याचे पेशवेll
या बाबतीत चाणक्याचे उदाहरण बघता येईल.
चाणक्याच्या कारकिर्दीत प्रवास करणार्या चिनी प्रवाशानं लिहून ठेवले आहे की 'चाणक्याच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा संध्याकाळ झाली होती, ते काहीतरी काम करीत होते, त्यानी मला बसण्याची खूण केली. थोड्या वेळात काम संपवून त्यानी दिवा विझवला. आणि दुसरा दिवा लावला. मी त्याना असे करण्याचे कारण विचारल्यावर ते उत्तरले 'त्या दिव्यातले तेल सरकारी होते. त्यामुळे सरकारी काम झाल्यावर मी तो दिवा बंद केला. आपण माझे खाजगी पाहुणे असल्यामुळे आपल्याशी बोलताना मी माझ्या खर्चातून आणलेल्या तेलातून दिवा लावला.'
अशी निस्पृहता असल्याशिवाय धनानंदासारख्या सम्राटाचा पराभव करून स्वतःचे साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्तासारखा राजा निर्माण करता येत नाही.....
पुण्याचे पेशवे
20 Mar 2008 - 10:16 am | विजुभाऊ
पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे जातीवाद."
हे १००% खरे.........
अडवाणीचा रामरथ थांबवण्यासाठी व्ही पी सिंग नी मंडल चा जूना पुराणा बासनात पडलेला मुद्द शोधुन काढला आणि भारातच्या भविष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.मंडल मुळे जातीयवाद जास्तच उफाळुन आला. विषेशतः उत्तर भारतात्..सध्या तेथे विकास शिक्षण अन्न पाणी रस्ते हे सर्व जीवनावश्यक मुद्दे जाती च्या मुद्द्यापुढे गौण होतात......या जातियावादाचा फयदा होतो अर्थिक्द्रुष्ट्या प्रगत समाजाला आणि भरडला जातो अशिक्षित समाज...........
खरे तर सर्वांगीण शिक्षण हाच भारताच्या विकासाचा मुख्य खांब आहे.त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जातेय "जातीवाद" या जीवनावष्याक? मुद्यापुढे.
जाती व्यवस्थेचा बळी ठरलेला
विजुभाऊ
20 Mar 2008 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगातील १८० देशांच्या भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमांक ७२ वर आलाय त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ही आनंदाची बातमी आहे. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता येत आहे, त्यामुळे हा क्रमांक हळू हळू खाली जाईल असे वाटते.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भारतात कोणकोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, हे सांगितले होते.त्यामुळे सैन्यदलातला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, ही बातमी आपण सर्वांनीच हलके घेतली पाहिजे असे वाटते.
ट्रान्सपरन्सीचा अहवालात कशाकशावर ठपका ठेवलेला आहे याची माहिती कोणीतरी इथे दिली पाहिजे असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 Mar 2008 - 6:59 pm | सुधीर कांदळकर
म्हणजे पहिल्या क्रमांकाचा शत्रू जातीयवाद आहे. भ्रष्टाचार हा दुस-या क्रमांकाचा शत्रू असा अर्थ मी घेईन. पुण्याच्या पेशव्यांनी दिलेला चाणक्यांचा दाखला मी देखील वाचला आहे.
प्रा. डॉक्टरसाहेब जगातील १८० देशांच्या भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमांक ७२ वर आलाय त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ही आनंदाची बातमी आहे.
ही बातमी फसवी आहे. निष्कर्ष कोणत्या सांख्यिकी विश्लेषणावरून काढला अहे हे आपल्याला ठाऊक नाही. माझ्या माहितीप्रमाणे लाच म्हणून दिलेला पैसा फक्त यात धरला जातो. लाच घेतलेला पैसा नाही. त्यामुळे आनंद नको मानूया.
भ्रष्टाचाराची व्याख्या काय? हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. पूर्ण पगार घेऊनहि बॉस नसतांना कामाची टाळाटाळ करणे यालादेखील भ्रष्टाचार म्हणतात. तसेच त्याच पगारावर सेवकाकडून त्याच्या सेवाशर्तीच्या बाहेरील काम करून घेणे हा देखील भ्रष्टाचारच. विजेचा अपव्याय, सार्वजनिक मालमत्तेची हानि करणे (यात घाण करणे आले) हा पण भ्रष्टाचार.
परंतु कामगार कायद्यानुसार, (फॅक्टरी ऍक्ट, १९४८) सतत चार तास काम केल्यानंतर विश्रांति न देता एखाद्या सेवकाकडून काम करून घेणे तसेच सलग १२ तासांपेक्षा (यात एक अर्ध्या तासाची सुटी व दोन १५ मिनिटाच्या सुट्यांचा वेळ धरला नाही)काम करून घेणे हाहि भ्रष्टाचार. शाळा, १० पेक्षा कमी सेवकवर्ग असलेल्या व्यापारी आस्थापना, सरकारी व निमसरकारी नोकर, सैनिकी दले या कायद्याखाली येत नाहीत. म्हणून व्याख्या व अपवाद नक्की करायला पाहिजेत.
कानिटकरांचे "मला उत्तर हवंय" हे नाटक मला या विषयावर मर्मवेधी वाटले.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.