आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का?
नजरेत भरतील मात्र सर्वेच, तसे नाही.
पानं झाडांवर किती तरी हिरवे, बघ जरा
पण सुखावतील नजरांना सर्वे, तसे नाही.
मग प्रेम तरी का व्यक्त व्हावे माझे
मग का मी वेड्या सारखे वागावे
माझे वेडेपण आवडेलही कुणाला
पण तुलाच आवडेल, तसे नाही.
प्रेमाच्या परिभाषेत बसणारे शब्द सारे
बसतील तुझ्या-माझ्या भाषेत, तसे नाही.
हातात धरून हात कदाचित धरु ती वाट
अन मन माझे शोधेल एक घर पाखरांचे
फुलतीलही स्वप्न कदाचित त्या बागेत
पण येईल वास त्या फुलांस, तसे नाही.
आसमंतात तारे सर्व निळेच , आज ही.
चमकतील मात्र सर्वेच रात्री, तसे नाही.
प्रतिक्रिया
8 Apr 2011 - 11:47 am | पियुशा
+१
:)
8 Apr 2011 - 1:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान झालीय....