अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.
-----------------------------------------------------------
दि. ९ एप्रिल २०११
केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.
"भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 7:44 pm | विकास
मनःपूर्वक शुभेच्छा!
7 Apr 2011 - 7:45 pm | प्रास
हेच म्हणतो.....
7 Apr 2011 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनःपूर्वक शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
7 Apr 2011 - 7:46 pm | सुहास..
"लोकपाल विधेयकाच्या" सक्रिय ,,, नव्हे जनलोकपाल
7 Apr 2011 - 9:11 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद. दुरुस्ती केलीय.
7 Apr 2011 - 8:23 pm | निवेदिता-ताई
मनःपूर्वक शुभेच्छा !
7 Apr 2011 - 8:34 pm | अप्पा जोगळेकर
मनापासून शुभेच्छा.
7 Apr 2011 - 9:32 pm | सुधीर काळे
आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला.
बाईंच्या धारिष्ट्याला सलाम!
7 Apr 2011 - 9:44 pm | विकास
आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला.
म्हणजे? सोनीया गांधी आणि संघ हे एकत्रित कारस्थान करत आहेत?
आता तरी पंतप्रधान हजारे इतरांच्या सांगण्यावरून करत आहेत असे म्हणणार नाहीत!
7 Apr 2011 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला.
अण्णांची लढाई आणि काँग्रेसपक्षाची लढाई एकच आहे. तेव्हा अण्णांनी उपोषण सोडावं असं त्या म्हणाल्या. :)
अरे हो, सुरेश दादा काय बोलले वाचलं काय ?
-दिलीप बिरुटे
8 Apr 2011 - 12:58 am | विकास
अरे हो, सुरेश दादा काय बोलले वाचलं काय ?
सुरेशदादा. म.टा. मधील मथळ्याप्रमाणे म्हणाले की, "अण्णाला 'गांधी' बनवू नका - जैन" !
पण सोनीयाजींची विनंती आणि "आपण चॉक्केट आणू बक्का तुला" स्टाईलमधील सोनीयाजींचे बालहट्ट शांत करण्याच्या स्टाईलमधील वक्तव्य वाचल्यावर, "(सोनीया) गांधी अण्णांना बनवू नका!" असे म्हणावेसे वाटत आहे. ;)
7 Apr 2011 - 9:36 pm | सुधीर काळे
आज सोनियामॅडमनीसुद्धा अण्णांना पाठिंबा दिला.
बाईंच्या धारिष्ट्याला सलाम!
आता शरद पवार, सुरेश कलमाडी, राजा यांनीसुद्धा मागे राहू नये! त्यांनीही १०० टक्के पाठिंबा देऊन अण्णांना उपोषण मागे घ्यायची विनंती करावी. ते थोडा वेळ 'जंतर-मंतर'वर जाऊनही बसले असते. पण अण्णाच कुठल्याही 'फुडार्या'ला (मॅडमसकट सगळ्यांना) आपल्या मंचावर येऊ देत नाहींत म्हणे! त्यामुळे सगळ्याच 'धुतल्या तांदळासारखे चारित्र्य' असलेल्या 'फुडार्यां'ची मोठीच पंचाईत झालेली आहे!
7 Apr 2011 - 9:48 pm | विकास
नुसते पॉलीटीकल वाक्य आहे. रीड बिट्विन दी लाईन्सः
"There can be no two views on the urgent necessity of combating graft and corruption in public life. I believe that the laws in these matters must be effective and must deliver the desired results. I am sure that Anna Hazare Ji's views will receive the government's full attention as we move forward to fight this menace."
यात नक्की पाठींबा आहे असे कुठे म्हणले आहे? गव्हर्नमेंटने टेंशनमध्ये येऊन अटेंशन दिले आहेच! पण पुढे काय? उलट पंतप्रधान म्हणत आहेत की आणिबाणीसदृश परीस्थिती होईल म्हणून. ही भिती आहे का धमकी? आणि ते जर हे सोनीयांकडून अॅप्रूव्ह न करता बोलले असले तर पंतप्रधानांच्या धारीष्ट्याला खरचं सलाम! :-)
8 Apr 2011 - 3:26 am | निनाद मुक्काम प...
तुमच्या संघटने विषयी आदर अजून वाढला आहे .
8 Apr 2011 - 10:17 am | पिवळा डांबिस
एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण
हॅ हॅ हॅ!!!! रोजा पाळतायत म्हणा ना!!!
तुम्ही पण भलतेच विनोदी बुवा!!!!
:)
9 Apr 2011 - 10:42 pm | गंगाधर मुटे
केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.
"भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
11 Apr 2011 - 11:50 am | नरेशकुमार
something is always better than nothing !