२६ मार्च २०११ रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई विभागात जगन्नाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या यात्रेत जगन्नाथस्वामींच्या दादर दर्शनासाठी सुंदर रथ बनवलेला होता.
यात्रा शिवाजी पार्कातून सुरू होऊन गडकरी चौक, प्लाझा सिनेमा, गोल मारुती मंदिर, पोर्तुगिज चर्च मार्गे पुन्हा शिवाजी पार्कात परतली. जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्राजींसाठी तिथे पुरीतील जगन्नाथाच्या रथाची प्रतिकृती बनवली होती. अगदी असाच रथ पुरीत यात्रेत वापरला जातो आणि शिवाजी पार्कात त्या रात्री रथामधील जगन्नाथांचे अत्यंत मनोहारी दर्शन होत होतं.
प्रतिक्रिया
3 Apr 2011 - 2:45 am | पुष्करिणी
अतिशय सुंदर फोटो आहेत.
माहित नव्हतं मुंबईतही जगन्नाथ यात्रा इतकी साग्रसंगित आयोजित केली जाते ते.
3 Apr 2011 - 11:06 am | प्रास
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मुंबईमध्ये बर्याच ठीकाणी अशी जगन्नाथ रथयात्रा काढतात.
दादरमध्ये हे चौथं वर्ष होतं. याच वर्षी घाटकोपरमध्येही पहिल्यांदा अशी यात्रा झाली. गिरगावातही दरवर्षी रथयात्रा निघते.
मुंबईजवळच्या मिरारोड मध्ये गेली १०-१२ वर्षे जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन होत आलेले आहे.
6 Apr 2011 - 10:34 pm | मुलूखावेगळी
+१
3 Apr 2011 - 7:02 am | आळश्यांचा राजा
चांगली माहिती. मलाही माहीत नव्हतं. इस्कॉन अर्थातच अशा यात्रा जगभरात करत असते. इस्कॉनचा मुख्य प्रेरणास्रोत चैतन्य महाप्रभू जगन्नाथाच्या रथापुढे तल्लीनतेने नाचत असत. त्यांचे पट्टशिष्य सनातन गोस्वामी यांनी रथाखाली आपला प्राण दिला होता.
आपल्या शीर्षकातील ओळी जयदेवांच्या गीतगोविंदमधील आहेत. त्याविषयी काही लिहिता येईल काय? अवश्य लिहावे.
(जगा काळियाचा प्रेमी!)
3 Apr 2011 - 11:10 am | प्रास
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद राजासाहेब!
डोक्यात, ज्यावर लिहायचेय त्यांची एक जंत्री आहे, त्यात या विषयाचा समावेश केलेला आहे. तेव्हा राजासाहेब, आपल्या आज्ञेचे पालन नक्की केली जाईल याची नोंद घ्यावी.
3 Apr 2011 - 12:32 pm | विनायक बेलापुरे
हा रथ सुद्धा पूर्णपणे लाकडी असतो का ? बिन खिळ्यांचा ( फक्त लाकडी खिळे वापरलेला , लोखंड न वापरलेला )
छान आहेत फोटो ....
3 Apr 2011 - 1:41 pm | प्रास
प्रतिसादाबद्दल धन्यवाद काकाजी!
नाही. पुरीतल्या यात्रेत तसा रथ असतो पण इथे आपल्याकडे ट्रकवर रथ बनवलेला आहे.
शिवाजी पार्कामध्ये रात्री दर्शनासाठी केलेला रथ हा केवळ पुरीतल्या रथाची प्रतिकृती होती आणि ती लोखंडी सांगाड्यावर उभारली होती. मात्र त्याचे प्रमाण जवळ जवळ मूळ रथाबरहुकूम होते. पुरीमध्ये मूळ रथाचे काम करणारे १५-२० कारीगर हा बनवण्यासाठी दिड महिना खपत होते असे ऐकतो. पण रात्री या रथाचे दर्शन घेतल्यावर वाटलं, "त्यांची मेहनत खरंच रंग लायी है." :-)
3 Apr 2011 - 12:23 pm | विनायक बेलापुरे
हा रथ सुद्धा पूर्णपणे लाकडी असतो का ? बिन खिळ्यांचा ( लोखंडी )
छान आहेत फोटो ....
6 Apr 2011 - 10:01 pm | गणेशा
फोटो दिसले नाहित ...
6 Apr 2011 - 10:09 pm | प्रास
मला तर व्यवस्थित दिसत आहेत.....
रीफ्रेश मारून बघा एकदा.....
6 Apr 2011 - 10:20 pm | मराठमोळा
नविन माहिती.. छान फोटो..
धन्यवाद.. :)
6 Apr 2011 - 10:47 pm | ईश आपटे
चांगले फोटो... मुंबईत प्रथमच होतेय काय ?????????
7 Apr 2011 - 5:35 pm | प्यारे१
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
8 Apr 2011 - 3:28 am | निनाद मुक्काम प...
कुठलीही प्रलोभने न दाखवता जेव्हा इस्कोन च्या कार्याने प्रभावीत होऊन अनेक परदेशी लोक हिंदू धर्म स्वीकारतात .शाकाहारी बनतात त्याचे मला नेहमीच कौतुक वाटते .
असेच कौतुक प्रास ह्यांचे वाटते .( त्यांचे लेख नेहमीच दर्जेदार असतात .)
जुहू च्या इस्कॉन मंदिरात मी केट बरोबर गेलो होतो. .''आरतीच्या शेवटी'' हरे रामा हरे कृष्णा ''च्या नादात तल्लीन झालो होतो .
त्या नामजपाची सीडी आजही ताणताणाव असह्य झाले की मी ऐकतो ..
युरोपात विशेतः स्पेन मध्ये ह्यांचे कार्य भरपूर आहे .
केट ची आत्या व त्यांचे पती स्पेन मध्ये इस्कॉन च्या सोहळ्याला नेहमीच जातात .( १५००० युरोपियन . कलर फेस्टिवल ला उपस्थित असतात
पुढची वसंत पंचमी तिथेच साजरी करणार आहोत .
8 Apr 2011 - 10:51 am | प्रास
आणि तो स्पेन मधल्या रंगपंचमीचा दुवा भनाट आहे. छान वाटले तो उत्सव पाहून.
:-)