पाखरे निघालीत देशांतराला ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
1 Apr 2011 - 3:12 pm

पाखरे आता मोठी झालीत ..
पाखरांचे पक्षी झालेत .
उडण्याचे बळ आलेय त्यांच्यां पंखात
डोक्यावरचे आभाळ त्याना आतां कमी पडू लागलेय
त्यांची नजर आता खूप दूरवर
क्षितिजाच्या पार....
देशांतराला निघालीत ही पाखरे
स्वप्नाच्या झुल्यावर स्वार होऊन
आपल्या मादिसकट
डोक्यावरची हवा उलटी वाहू लागलीय
..

देशांतराला निघालीत ही पाखरे
आपल्या म्हातार्या पालकाना सोडून
निसर्गाचा नियमच असतो
शाप असतो म्हातार्या पक्षाना [?]
त्यांनी थांबायचेय मागे
हवा झेलीत स्वाधीन व्हायचेय ह्या बर्फाळ वादळात
काहीसे खंबीरपणे
आपले पाय रोवून
स्वाधीन व्हायचेय नियतीच्या हवाली
विरुध्द दिशेने वाहणारी हवा कसे कापणार ह्यांचे हे म्हातारे पंख.......?

झाडावरची पाने गळून गेलीत
बर्फ जमू लागलाय
पाखरे झेपावून निघालीत देशांतराला
आई-बाप बघत बसलेत त्याना क्षितिज पार करताना
फक्त आशीर्वादासाठी पंखांची उघडझाप [!]
हळूहळू नजरेच्या आड होतील
नि हरवून जातील ......

वडीलधारी पाखरे येथेच आपल्यातच गच्च ...
ती वाट बघत बसलीत
येणार्या निरोपाची
तेवढेच त्यांच्या हातात
हताश बावरलेत
गोठून गेलेत हे क्षण ....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

कविता आवडली नेहमी प्रमाणे ..

एक लिहावेशे वाटत अहे बघतो आहे जमते का ?

--
गोठुन गेलेत हे सगळे क्षण
निष्पर्ण झालाय हा वृक्ष ..
बर्फाळतेचे स्वच्छ रुपडे घेवून
उगाच अशृ गोठवत बसलेय मन

पांढर्‍या अस्तित्वाला ही
ओढ आहे क्षितिजापल्याडच्या
मलकट वाटेची ..
आईच्या प्रेमळ सावलीची ..
आणि बाबांच्या आशेच्या वलयाची ...

ती वाट हातात आरती घेवून उभी आहे..
ते घर अजुनही माझ्या वस्तु संभाळुन आहे ..
पाखरे मोठी झाली .. मोठेपाण मात्र तिथेच ..
क्षितिजापल्याड विसरलाय पण ..

........

चित्रा's picture

2 Apr 2011 - 6:11 pm | चित्रा

कविता वाचून वाईट वाटले.

कल्पना वेध घेणारी आहे.

पियुशा's picture

4 Apr 2011 - 11:27 am | पियुशा

+१
:)