शोधते आहेस मला कुठे तु
मनी तुझ्याच वसतो मी
असलो दूर जरी असा
जवळच तुझ्या असतो मी
नको शोधूस इतरत्र मज
बघ जरा डोळे मिटून
वेडी माझी प्रिये कशी तु
डोळ्यांत तुझ्या असतो मी
शोधू नकोस बाहेर मज
तिथे दिसेल पुतळा माझा
माझ्या सारखाच,
मात्र कधी तो नसतो मी
जगतो तुझ्या श्वासात असा
सुगंधच तुझा असतो मी
कुशीत तुझ्या भासेन तुला
तिथेच तर सदा असतो मी
प्रतिक्रिया
1 Apr 2011 - 10:42 am | कच्ची कैरी
वाचायला फारच गोड वाटली कविता :)