आयुष्य साधेपणे जगत गेला ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
28 Mar 2011 - 6:27 am

तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला
उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला

स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां
मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला
शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे
काटकसर करून करून आयुष्य जगायचे

लग्न झाले बायको पण साधी सुधी मिळाली
हनिमूनला न जाता घरीच गात बसली
डोहाळे डोहाळे लागले फक्त चिंचा खाण्याचे
स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे

खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा
पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा
देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा
कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा

नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची
चालण्यासारखा व्यायाम नाही, असे दोघे म्हणायची
भर उन्हात सुद्धा दोघे चालत घरी यायचे
थंड थंड माठ्तले पाणी पिऊन दोघे तृप्त व्हायचे

काळ गेला वेळ गेली , कळले देखील नाही
वय झाले कसे गेले कळले सुद्धा नाही
एके दिशी छातीत कळ नि अचानक तो गेला
घरासाठी मात्र खूप ठेऊन काही गेला

तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला
उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला

करुणकविता

प्रतिक्रिया

हरिप्रिया_'s picture

28 Mar 2011 - 10:58 am | हरिप्रिया_

:(

पियुशा's picture

28 Mar 2011 - 11:00 am | पियुशा

व्व्व्वा वा
छान लिहिलिय :)

नगरीनिरंजन's picture

28 Mar 2011 - 11:19 am | नगरीनिरंजन

खूप छान! मागच्या पिढीतल्या कित्येक निम्नमध्यमवर्गीय जोडप्यांची कथा सांगणारी कविता आवडली!

स्वानन्द's picture

28 Mar 2011 - 11:28 am | स्वानन्द

आवडली.

अशोक७०७'s picture

28 Mar 2011 - 11:49 am | अशोक७०७

मस्त रचना, आवडली

कच्ची कैरी's picture

28 Mar 2011 - 1:19 pm | कच्ची कैरी

कविता बोधपूर्ण आहे ,यातुन हे कळते कि आयुष्य इतके मरमर करत काढण्यापेक्षा आयुष्य जगायचे आणि फुलवायचे .
कवितेतल्या नायकाला बायको साधी सुधी मिळाली नसती तर बरे झाले असते ,अशी एखादी कविता येऊ द्या अजुन :)

नेहमी पेक्शा वेगळी शब्दरचना .. जास्त उच्च नाही नेहमीप्रमाणे ..
परंतु सत्य कथा वाटत आहे .. त्यामुळे त्याला शब्दांच्या झालरी पेक्षा ही खरे पणाची किणार वाटते आहे

मदनबाण's picture

29 Mar 2011 - 7:05 am | मदनबाण

अप्रतिम...