दीपा माने in जे न देखे रवी... 27 Mar 2011 - 11:17 pm का असा लोपला हा चंद्र मेघडंबरी का शांत झाल्या अवखळ लाटा किनारी कुठे मंद पवन हळू गुप्त झाला का फुले पानाशी धरतात हा अबोला? दूर देऊळाची समाधी जणु लागलेली तिची शांतता पसरली ही आसमंती की भाकीतसे ह्या नीरव नीरव वेळी कालमानाचे गणित ते चंद्र्मौळी! कविता प्रतिक्रिया अहाहा! वाचताना आपोआपच 28 Mar 2011 - 7:20 am | स्पंदना अहाहा! वाचताना आपोआपच कवितेतली शांतत्ता मनात भरत जाते. दिवसाची सुरुवात अशी करुन दिल्या बद्दल धन्यवाद दिपा! मिपावर स्वागत. 28 Mar 2011 - 10:02 am | पैसा छान झालीय कविता. शांत वातावरणनिर्मिती मस्तच! छोटीशी 28 Mar 2011 - 1:12 pm | कच्ची कैरी व्वा मस्त छ्छोट्टीशी कविता :) कविता छान .. मेघडंबरी आणि 28 Mar 2011 - 4:40 pm | गणेशा कविता छान .. मेघडंबरी आणि चंद्रमौळी नविनच शब्द आहेत माझ्या साठी .. प्लीज अर्थ सांगताल का ? मेघडंबरी म्हणजे मी वाचताना उगाच मेघअंबरी घेतले .. aparna akshay, पैसा, कच्ची 29 Mar 2011 - 8:11 am | दीपा माने aparna akshay, पैसा, कच्ची कैरी, गणेशा कविता आवडल्याबद्दल आभारी आहे. गणेशा, मेघडंबरी म्हणजे ढगांचे छत्र आणि चंद्रमौळी हे शंकराचे नाव आहे. मस्त कवोता... शांत भाव 29 Mar 2011 - 10:34 am | नन्दादीप मस्त कवोता... शांत भाव निर्माण झाला...छान...!!! अवांतर : रायगडावर पण महाराजांच्या डोक्यावर जे छत्र आहे तीला मेघडंबरी म्हणतात ना??
प्रतिक्रिया
28 Mar 2011 - 7:20 am | स्पंदना
अहाहा!
वाचताना आपोआपच कवितेतली शांतत्ता मनात भरत जाते.
दिवसाची सुरुवात अशी करुन दिल्या बद्दल धन्यवाद दिपा!
28 Mar 2011 - 10:02 am | पैसा
छान झालीय कविता. शांत वातावरणनिर्मिती मस्तच!
28 Mar 2011 - 1:12 pm | कच्ची कैरी
व्वा मस्त छ्छोट्टीशी कविता :)
28 Mar 2011 - 4:40 pm | गणेशा
कविता छान ..
मेघडंबरी आणि चंद्रमौळी नविनच शब्द आहेत माझ्या साठी ..
प्लीज अर्थ सांगताल का ?
मेघडंबरी म्हणजे मी वाचताना उगाच मेघअंबरी घेतले ..
29 Mar 2011 - 8:11 am | दीपा माने
aparna akshay, पैसा, कच्ची कैरी, गणेशा कविता आवडल्याबद्दल आभारी आहे.
गणेशा, मेघडंबरी म्हणजे ढगांचे छत्र आणि चंद्रमौळी हे शंकराचे नाव आहे.
29 Mar 2011 - 10:34 am | नन्दादीप
मस्त कवोता...
शांत भाव निर्माण झाला...छान...!!!
अवांतर : रायगडावर पण महाराजांच्या डोक्यावर जे छत्र आहे तीला मेघडंबरी म्हणतात ना??