आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे
तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे
न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड
एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड
जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात
उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात
मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ...
मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे
आज उमगले खरं तर,
जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे
प्रतिक्रिया
23 Mar 2011 - 10:15 am | नगरीनिरंजन
जगण्याच्या त्रैराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे
:) छान कल्पना! कविता आवडली!
23 Mar 2011 - 10:36 am | कच्ची कैरी
छान आहे कविता .सर्वच कडवे आवडले :)
23 Mar 2011 - 10:50 am | sneharani
मस्त कविता!
23 Mar 2011 - 12:50 pm | गणेशा
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे
तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे
अप्रतिम ओळी .. आवडल्या ..
अवांतर : त्रैराशिक म्हणजे काय ? प्लीज सांगता का ?
23 Mar 2011 - 2:13 pm | विश्वेश
त्रैराशिक म्हणजे proportion