खिडकीच्या बंद तावदाना आडून
अविरत कोसळणारा मुका पावूस बघतेय…किती वेळ.
त्याने काचेला फासलेल धुकं
रानाचा हिरवा रंग अजूनच गडद करतंय
आणि विजेसारखे धारदार त्याचे शिंतोडे
ठोठावतायत दार माझ्या जाणिवांच…किती वेळ
कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय
कधी लागली कोण जाणे?
धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम
अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे?
भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट
खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.
प्रतिक्रिया
21 Mar 2011 - 10:12 pm | प्राजु
खल्लास!!
धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम
अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे?
हे फार फार आवडलं. :) जियो!!
31 Mar 2011 - 4:01 am | चित्रा
कविता आवडली. डोळ्यासमोर दृष्य उभे राहिले (असे वाटले).
21 Mar 2011 - 10:23 pm | हर्षद प्रभुदेसाई
धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम
अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे?
भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट
खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.
ह्या चर ओळीतर फारच छान आहेत....
आवडली.....कविता....
जमल्यास माझी देखील कविता वचुन पाहा आवडले का ते....
(प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....)
जमल्यास तुमच ह्या बद्दलच मर देखील नोंदवा...
22 Mar 2011 - 12:21 am | गणेशा
खुपच करुण कविता ..
पावसात ही मनाच्या तडफडीचे चित्र जबरदस्त दाखवले आहे
22 Mar 2011 - 12:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
संपलो...
22 Mar 2011 - 12:40 pm | गवि
अप्रतिम यार.. पुन्हा एकापेक्षा एक ताकदवान क्रिएशन्स यायला लागल्या आहेत तुझ्याकडून..
आनंद वाटतोय. फारच खास.
23 Mar 2011 - 7:10 pm | राघव
आवडले. :)
राघव
27 Mar 2011 - 10:08 pm | काव्यवेडी
कान बन्द करुन पावसाला मुका ठरवायची सवय
कधी लागली कोण जाणे !!!
खूप मस्त कल्पना !!!!
कविता खूप आवडली.
31 Mar 2011 - 3:33 am | धनंजय
कविता आवडली.
हिरव्या जखमा!
31 Mar 2011 - 12:00 pm | sneharani
मस्त कविता!
9 Apr 2011 - 12:06 pm | सोनल कर्णिक वायकुळ
सगळ्यान्चे खूप खूप आभार आणि नविन वर्षाच्या मनापासुन शुभेच्छा.
9 Apr 2011 - 12:53 pm | विनायक बेलापुरे
वायकुळताई व्याकूळ करुन टाकलत :(
नविन वर्षाच्या तुम्हालाही मनापासुन शुभेच्छा
9 Apr 2011 - 8:23 pm | लिखाळ
छान..
10 Sep 2011 - 6:32 am | राजेश घासकडवी
ही कविता वाचायची राहून गेली. धनंजयने उल्लेख केल्यामुळे ती उणीव भरून निघाली.
पावसाला मुकं करून खंगत जाणाऱ्या खोलीतून त्याच्या हिरव्या जखमा बघायच्या....
अशाच शक्तिवान कविता अजून येऊदेत.