सुरंगी

जागु's picture
जागु in कलादालन
21 Mar 2011 - 12:38 pm

एका ओळखिच्या व्यक्तिकडून सुरंगिच्या झाडाचा पत्ता लागला. आणि त्याच व्यक्तीची ओळख काढून होळीच्या सकाळीच सुरंगीचे झाड पहाण्याचा मुहुर्त ठरविला. सकाळी ७ वाजताच या नाहीतर सगळ्या कळ्या काढून नेतील ही सुचना मिळाल्याने सुट्टीच्या दिवशीही सकाळी उठुन व नवरोबांची सकाळ लवकर उजाडून आम्ही सुरंगीचे झाड पाहण्यास गेलो आणि जवळ जवळ १ तास त्या झाडाखाली रमलो. झाडावर कळ्या काढण्या साठी दोन माणसे चढलेलीच होती. मिस्टरांच्या ओळखीची असल्याने त्यांनी आमचे झाडावरुनच स्वागत केले. आणि सुरंगीची त्यांना माहीत माहीती दिली.

साधारण चिकु, आंब्या सारखे मोठे असते. हे झाड चिवट असते.

होळी जवळ आली की सुरंगीच्या गजर्‍यांची आठवण येते. आजकाल खुप दुर्मीळ झालेली सुरंगी ही मार्च महिन्यापासुन दोन बहरांत फुलते. सुरंगीच्या कळ्या झाडाच्या खोडालाच लागतात.

सुरंगीच्या कळ्या काढण म्हणजे जोखिमीच काम असत. कळ्या काढण्यासाठी झाडावर चढाव लागत व एक एक झालेली कळी काढावी लागते. ह्या कळ्याच काढाव्या लागतात. जर फुल उमलले तर गजरा करताना त्रास होतो. साधारण १० वाजता म्हणजे सुर्यप्रकाश पुर्ण आल्यावर ह्या कळ्यांचे फुलात रुपांतर होऊन झाड पिवळे दिसु लागते. होळी असल्याने मला १० वाजेपर्यंत थांबणे शक्य नव्हते म्हणून थोडी खंत वाटली.

ह्या झाडावरुन जर पाय सटकुन माणूस पडला तर त्याची खुपच वाईट स्थिती होते असे म्हणतात. फुलांच्या सुगंधामुळे ह्या झाडावर साप येतात असेही म्हणतात. एवढी जोखिम आणि मेहनत घेउन ह्या गजर्‍यांना जास्त भाव नसतो. १० ते १५ रुपयांत ह्याचा गजरा मिळतो. शिवाय तो संध्याकाळी कोमेजतो. एकीकडे सायलीचा, टिकाऊ गजरा मात्र बाजारात २५ ते ३० रुपयांवर भाव खाउन बसतो.

झाडाखाली सुकलेल्या फुलांचा सडा पडला होता.

सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमीवासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाची सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगिला कमी असतात.
" alt="" />

सुरंगीच्या फुलांचा मंत्रमुग्ध करणारा वास स्त्रियांना आकर्षीत करतो. केसांमध्ये माळलेला गजरा सुकुन काढला तरी पुर्ण दिवस ह्या फुलांचा वास केसांमध्ये राहतो. पुर्वी होळीला ह्या गजर्‍यांना खुप डिमांड असे. पुर्वी हे गजरे भेट म्हणूनच वाटायचे.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2011 - 1:01 pm | पर्नल नेने मराठे

मला खुप आवड आहे फुलांची..
मुम्बैत सुरन्गीचे गजरे मिळत असत.
हल्ली ३-४ वर्शात सुरंगिचे दर्शन नाही.
थन्क्स जागुतै

स्पंदना's picture

21 Mar 2011 - 1:05 pm | स्पंदना

हाय जागू!!

कत्ले आम!!

खास आम्हा मिपाकरांसाठी कष्ट घेउन तिथे गेलीस आणि या झाडाची आणि फुलाची माहिती दिलीस , तुस्सी ग्रेट हो जागु. :)

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेउन ती पुर्ण करणं या तुमच्या व्रुत्तीला नमस्कार.

अतिशय छान माहिती दिलीत, आम्ही असं बकुळीची फुलं गोळा करायला हुतात्मा बागेत जायचो त्याची आठवण करुन दिलीत.

शेवटचा गज-याचा फोटो एकदम झकास.

जागु's picture

21 Mar 2011 - 1:58 pm | जागु

धन्स धन्स धन्स. मला झाडा-पानांची आवड असल्याने तसेच नेटवरील निसर्ग प्रेमिंच्या गप्पांमुळे हे करण्यास उभारी येते.

दीविरा's picture

21 Mar 2011 - 2:11 pm | दीविरा

छान माहिती मिळाली.

हे गजरे पाहून खूपच काळ झाला होता.

फोटो अप्रतिम :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 2:11 pm | परिकथेतील राजकुमार

__/\__
साष्टांग आहे बै तुला.

राजकुमार - आयुष्यमान भव.

RUPALI POYEKAR's picture

21 Mar 2011 - 2:32 pm | RUPALI POYEKAR

जागुताई तुमचे आभार, अहो हल्ली बघायला पण मिळ्त नाही हो सुरंगीचा गजरा, तुम्ही घातला का नाही?

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 2:40 pm | कच्ची कैरी

मस्त फोटो आणि माहिती !जागुताई तु खरच धन्य आहेस यात शंकाच नाही .

रेवती's picture

21 Mar 2011 - 6:21 pm | रेवती

ग्रेटच हां जागु!
मी पहिल्यांदाच पाहतिये फुलांचा हा प्रकार!
माझे केस मोठे नसल्याने गजरा घालता येत नाही.
लहानपणी मात्र केसांपेक्षा मोठ्ठा गजरा घालून तो मिरवण्याची हौस होती.;)

गोव्यातील स्त्रियांना सुरंगीची ही वेणी खूप आवडते, असे वाचण्यात आले होते.

अवांतर : गोव्यात फिरताना मला एक जाणवले, की गजरेसुद्धा लांब आणि फुलांनी किती भरगच्च असतात. (कोकणातही तसेच आहे) साधा अबोलीचा गजरा (वळेसर) चौबाजूंनी ओवला होता. मुंबईत रेल्वे क्रॉसिंग पुलांवर जे बटमोगर्‍याचे दाट गजरे असतात तेपण पहायला प्रसन्न वाटते. आमच्याकडे पुण्यात जो वेली मोगर्‍याचा गजरा विकतात तो अजिबात देखणा नसतो. दोर्‍यात सैलसर १०-१५ फुले ओवली, की लगेच विकायची घाई.

(महिलांच्या हक्काच्या विषयात नाक खुपसल्याबद्दल आणि पुणेरी गजर्‍याला नाव ठेवल्याबद्दल मला माफ करा. :))

रेवती's picture

21 Mar 2011 - 6:56 pm | रेवती

पुणेरी गजर्‍याला नाव ठेवल्याबद्दल मला माफ करा.
माफ केले आहे.;)
खरच पुण्यात इतके विरळ गजरे असतात ना!
माझ्या सासरच्या गावीही असेच विरळ फुलांचे गजरे मिळतात.
माझ्या सासूबाई एकावेळी दोन गजरे घालतात.
उगीच दोन फुलं ओवली की झाला गजरा!
त्यापेक्षा मुंबैचे आणि चेन्नैचे गजरे आवडले आहेत.
एकदा तर भारतवारीच्या आधी सहा महिने मुद्दाम केस वाढवून गेले.
दोन तीन दिवस गजर्‍याची हौस करून झाली मग कापले.
दक्षिणेकडे मोगर्‍यात अबोलीची फुलं, हिरवी पानं आणि काय काय ओवून देखणे गजरे करतात.
आईग्ग! नुसत्या आठवणीनं कसंसच झालं.:)

प्रीत-मोहर's picture

23 Mar 2011 - 12:33 pm | प्रीत-मोहर

योगप्रभु अनुमोदन !!!!!

गोवेकर
प्रीमो :)

सहज's picture

21 Mar 2011 - 6:52 pm | सहज

झाडाचे नाव, कळ्या व शेवटी गजरा उत्तम सचित्र माहीती.

दीपा माने's picture

21 Mar 2011 - 7:44 pm | दीपा माने

फुलं नेहेमीच सुंदर असतात. प्राजु तुमच्या सुंदर लिखाणाने ही सुरंगीची फुलं आणखीनच सुंदर दिसायला लागलीत अगदी सुरंगीच्या मादक वासासह. मला निसर्गाचं वेड आहे.
आपल्याकडून वरचेवर अशी लिखाणं येवोत.

रेवती's picture

21 Mar 2011 - 7:49 pm | रेवती

प्राजु नै, जागु तै आहेत त्या!;)
चालतय हो.....मी गंमत केली.

प्राजक्ता पवार's picture

21 Mar 2011 - 7:52 pm | प्राजक्ता पवार

शेवटचा गजर्‍याचा फोटो एकदम मस्तं :)

प्राजु's picture

21 Mar 2011 - 8:52 pm | प्राजु

ग्रेट आहेस यार तू!
मी कधीच नाही पाहिलेली सुरंगी. फार सुंदर दिसतेय गं. वासही मनमोहक असेल नक्कीच.
कधी मिळेल पहायला माहिती नाही.

निवेदिता-ताई's picture

21 Mar 2011 - 11:07 pm | निवेदिता-ताई

प्राजु..तु़झ्याशी सहमत....मी पण नाही पाहिली ही फुले कधी,

आम्चे कडे जाई-जुई, सायली, मोगरा, अबोली असते.

बकुळीचे एक झाड खुप जुने आहे, तिथे आम्ही लहानपणी फुले वेचायला जायचो व त्याचा गजरा करुन

आमच्या शाळेतल्या बाईंना द्यायचो...बाई खूष व्हायच्या. (मग वर्गात गजग्याचा डाव मांडला तरी माफ.)

रेवती's picture

21 Mar 2011 - 11:21 pm | रेवती

शेवंतीच्या वेण्या तर विसरल्यासारख्याच झाल्यात.
मला पूर्वी वेणी हाताने करता येत असे.
दोरा आणि शेवंतीची फुले यांची, सुई लागत नाही याला.
आज्ज्यांना केसाच्या अंबाड्याभोवती घालायला तर एकदम सोप्या वाटायच्या.
छे! एकदा आठवणी सुरु झाल्या की निग्रहानं थांबवाव्या लागतात.;)

चित्रा's picture

22 Mar 2011 - 3:48 am | चित्रा

सुरंगीचा गंध मादक असतो हे कोणीतरी वर केलेले वर्णन अक्षरशः खरे आहे. :) हा सुवास हळूहळू डोक्यात चढतो..

जागु यांचे कौतुक नेहमीप्रमाणेच करावेसे वाटते. सुटीच्या दिवशी मुद्दाम नवर्‍याला उठवून सुरंगीची फुले बघायला नेणे म्हणजे अजून दुहेरी कौतुक!

धन्यवाद सगळ्या.न्चे. रेवती आजकाल शेव.न्ती ची वेणी फक्त नवरात्रात दिसते .

सुहास..'s picture

22 Mar 2011 - 12:24 am | सुहास..

छान च ग !! ह्याची पण भाजी करतात किंवा सरळ असेच खातात , तुला माहीत असेलच :)

पण हीच पाककॄती अंड्याशिवाय करता येईल का?

छान च ग !! ह्याची पण भाजी करतात किंवा सरळ असेच खातात , तुला माहीत असेलच
तेच म्हटल अजुन कोण बोलल कस नाही ! (हसरी बाहुली) ह्या झाडाचा औषधात उपयोग होतो पण कशासाठी ते माहीत नाही.

पैसा's picture

22 Mar 2011 - 8:50 pm | पैसा

सुरंगीचा वास खरंच मादक, एकदम खास असतो. आणि गजरा भरगच्च, खूप जड असतो. उगीच चार केस असणार्‍या बायानी घालायचं प्रकरण नव्हे हे. हा गजरा अंबाड्यावर छान शोभून दिसतो. नंतर त्याचे पिवळे केसर केसांत चिकटून रहातात. गजर्‍याचं वजन आणि वास बर्‍याच जणीना सहन होत नाहीत पण जर हा गजरा तुम्हाला सूट होत असेल तर अहाहा! दुसर्‍या कुठच्याच फुलांच्या वाटेला जाणार नाही तुम्ही!

इरसाल's picture

22 Mar 2011 - 9:22 pm | इरसाल

जल्ला सगला लै भारी...........पन फटू कारायचा यंत्र कंचा ?

मदनबाण's picture

22 Mar 2011 - 9:30 pm | मदनबाण

लयं मस्त जागु ताय !!! च्यामारी ज्या फुलाचा सुगंध इतका वेड लावणारा आहे त्याच झाड कधी पाहण्यास मिळेल असे वाटले नव्हते, तुझ्यामुळे ते शक्य झाले... धन्स. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 11:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त माहिती आणि फोटो.
एकेकाळी आईच्या हौसेपायी भरपूर फुलं, गजरे घालयचे. आता मोगर्‍याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं दिसली की कोणा काकू, मावशीसाठी खरेदी होतेच. खरेदीचा, गंधाचा आनंद मिळतो आणि छोट्या केसांचं दु:ख होतही नाही.

"... माळला सुरंगी गजरा गं त्यावरी..." मधला गजरा हाच का गं जागु?

जागु's picture

23 Mar 2011 - 12:24 pm | जागु

पैसा, इरसाल, मदनबाण धन्स.

आदिती तोच तो गाण्यातला सुरंगीचा गजरा.

स्पा's picture

23 Mar 2011 - 12:28 pm | स्पा

मस्त फोटू

प्रीत-मोहर's picture

23 Mar 2011 - 12:30 pm | प्रीत-मोहर

मी य सुट्टीत खूऊऊऊऊऊऊऊऊओप माळुन घेतली सुरंगी :)

फुल माळुन तृप्त
प्रीमो

डावखुरा's picture

26 Mar 2011 - 1:37 pm | डावखुरा

खुप छान...

मनिम्याऊ's picture

26 Mar 2011 - 8:41 pm | मनिम्याऊ

सहजच एक राजस्थानी लोकगीत आठवलं...

सुरंगी रुत आई म्हारे देस
भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली
तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।

मनिम्याऊ,
या राजस्थानी गीताचा मराठीत अर्थ समजाउन सांगितल्यास आनंद वाढेल.

मनिम्याऊ's picture

28 Mar 2011 - 6:34 pm | मनिम्याऊ

सुरंगी रुत आई म्हारे देस
भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली
तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।

हे 'पावस' काळाच वर्णन आहे. . .

माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (मेवा- मिसरी* प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

*मिसरी = खडीसाखर

योगप्रभू's picture

29 Mar 2011 - 2:23 am | योगप्रभू

तृषार्त मनाचा आनंद या चार ओळीतून किती सुरेख प्रकटलाय?
मनिम्याऊ! तुम्हाला विनंती.
अशाच सुंदर दुसर्‍या भाषांतील गीतांचा परिचय का करुन देत नाही?
किमान राजस्थानी तरी.

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 12:52 pm | नन्दादीप

+१.
हेच म्हणतो...

विनीत संखे's picture

29 Mar 2011 - 12:57 pm | विनीत संखे

खरंच!

धनंजय's picture

29 Mar 2011 - 3:32 am | धनंजय

मस्तच माहिती आणि चित्रे.

जागु's picture

29 Mar 2011 - 11:12 am | जागु

मनिम्याउ खुप छान आहे गित.
स्पा, प्रितमोहर, लालसा, योगप्रभु, धनंजय धन्यवाद.

मनिम्याऊ's picture

29 Mar 2011 - 9:25 pm | मनिम्याऊ

[मनिम्याऊ! तुम्हाला विनंती.
अशाच सुंदर दुसर्‍या भाषांतील गीतांचा परिचय का करुन देत नाही?
किमान राजस्थानी तरी.]

जरुर
नक्की प्रयत्न करेन

पुष्करिणी's picture

29 Mar 2011 - 11:48 pm | पुष्करिणी

मस्त मस्त्, वर्णन आणि फोटो दोन्हीही.

सुरंगीची फुलं कधीच पाहिली नव्ह्ती. बूचाची आणि बकुळीची फुलं माळायचे मी खूपदा .