ओले परीस...

स्वानंद मारुलकर's picture
स्वानंद मारुलकर in जे न देखे रवी...
20 Mar 2011 - 2:25 pm

डोळ्यामधील आसू परतून ना गळावे
धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे

आता न जाणवावी दुःखे उदासवाणी
’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे

तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा
डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे

काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी
श्वासात ध्यास आहे तोची प्रकाश दावे

आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे
हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे

- स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com

गझल

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

21 Mar 2011 - 7:35 am | राजेश घासकडवी

शेवटच्या दोन ओळी काहीशा वेगळ्या जातकुळीच्या वाटल्या. पण बाकीचं चांगलं जमलंय.

चित्रा's picture

21 Mar 2011 - 8:10 am | चित्रा

गेय कविता आवडली. (*येणार नाथ आता च्या चालीवर गुणगुणून पाहिली. छान जमते आहे!)

दारू परीस ओले हे वेगळे वाटले. डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे हे जरा लक्ष वेधून घ्यायचे आहे असे वाटले. पण मग त्यावर शेवटचे कडवे वेगळे वाटते (कडवे म्हणून आवडले तरी ते या कवितेत का बसते हे समजून दिल्यास -रसग्रहण केल्यास- आवडेल).

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 6:21 pm | कच्ची कैरी

दारु ओले परीस ?:(
कवितेचा अभिप्राय नीट कळला नाही :( काय करणार कच्ची आहे ना मी ;)

प्राजु's picture

21 Mar 2011 - 10:24 pm | प्राजु

चांगली आहे. आवडली.