प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....

हर्षद प्रभुदेसाई's picture
हर्षद प्रभुदेसाई in जे न देखे रवी...
19 Mar 2011 - 9:36 pm

तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
मनाने मनावर केलेल प्रेम....
की नजरेच सौंदर्यावर असलेल प्रेम हे प्रेम असतं ?

खर पाहता प्रत्येक जण प्रेमात,
ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो ।
प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त...
दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो ।

तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
आईने-मुलावर,नवऱ्याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेल प्रेम....
की माणसाने माणसावर केलेल प्रेम हे प्रेम असतं ?

खर पाहता प्रेमात नात्याला फारस महत्व नसतं ।
कारण प्रेमाच्या ओलाव्याने नात फुलत असतं...
पण नात असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच अस काही नसतं ।

तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने,
अथवा तिची जागा दुसऱ्या कुणीतरी घेतल्याने..
तिच्यावर असलेल प्रेम का कमी होत असतं ?

माझ्यामते तरी तीच्या असण्याने वा नसण्याने,
असलेल प्रेम कमी-जास्त होत नसतं ।
प्रेम असेल जरका तिच्यावर मनापासून तर...
तीच्या नसण्यातही असण्याचा आभास ते निर्माण करत असतं ।

तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....

हर्षद अ. प्रभुदेसाई.....

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

20 Mar 2011 - 4:39 am | प्रकाश१११

छान लिहिले आहेस -

खर पाहता प्रेमात नात्याला फारस महत्व नसतं ।
कारण प्रेमाच्या ओलाव्याने नात फुलत असतं...
पण नात असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच अस काही नसतं ।

आवडले. पु.ले.शु.