गाभा:
प्रधानमंत्री, कृषिमंत्री व योजना आयो्गाचे मोंटेक सिंह यांनी
"भारतीय लोग ज्यादा खाने लगे हैं…इसलिये महंगाई बढ़ी है…"
असे एक विधान केले आहे....
निरनिराळ्या वाहिनिवर दाखवले जाणारे..खाना खजाना,,खाद्य भ्रमंत्या..खवय्ये गीरी..तसे जागोजागी दिसणारे फुड ब्लॉग्ज या मुळे क्षूधा वाढण्यास मदत होते का? व खाव खाव सुटते का?....
परीणाम स्वरुप आज सारी हॉटेल्स..पाव भाजी स्टॉल्स.वडा पाव.उपहार गृहे..भेळेच्या गाड्या..पिझ्झा बर्गर्र गृहे तुडुंब भरलेली दिसतात. व चरणे संस्कृति उदयास आली..
अति खा खा च्या भस्म्या मुळे महागाई वाढली असेल का?
प्रतिक्रिया
18 Mar 2011 - 1:00 pm | चिरोटा
पंतप्रधानांशी सहमत आहे मी. एक चीनी,जपानी,आणि भारतिय पंचविशी-तीशीतले एका लायनीत उभे करा. भारतियाचे पोट सुटलेले दिसेल. चीनी लोक चार पायांचे अनेक प्राणी खाउनही पोटे सपाट.
तेल्,मसाला,मीठ आणि साखर जास्त खावून हे सगळे झालेय.म्हागाई म्हणूनच वाढलिय.
18 Mar 2011 - 1:38 pm | निवेदिता-ताई
सहमत...
18 Mar 2011 - 2:07 pm | डीलर
मॉन्टेक सिग म्हणतात त्या मागचा अर्थ असा आहे ; भारतिय माणसाची क्रय शक्ति(Purchasing Power) वाढलेली आहे. वाढलेली क्रय शक्ति वाढीव खर्चाला कार्णीभूत होत आहे. मागणी पुरवठयातील तफावतीमुळे महागाई वाढत चालली आहे.
18 Mar 2011 - 3:18 pm | शेलार मामा मालुसरे
.खाना खजाना,,खाद्य भ्रमंत्या..खवय्ये गीरी..तसे जागोजागी दिसणारे फुड ब्लॉग्ज या मुळे क्षूधा वाढण्यास मदत होते का? व खाव खाव सुटते का?....
परीणाम स्वरुप आज सारी हॉटेल्स..पाव भाजी स्टॉल्स.वडा पाव.उपहार गृहे..भेळेच्या गाड्या..पिझ्झा बर्गर्र गृहे तुडुंब भरलेली दिसतात. व चरणे संस्कृति उदयास आली.
जाम भुक लागली .....
18 Mar 2011 - 3:44 pm | महेश काळे
नाही का?
18 Mar 2011 - 4:04 pm | गणपा
मागे बुश आणि कॉन्डोलिसा राइसबाईंनी अशीच शेरेबाजी केली होती. त्यावर बेतलेला माझा मिपावरचा पहिला धागा आठवला. (प्रेरणा) :)
18 Mar 2011 - 4:03 pm | विकास
द्रष्ट्या बुशबाबाने हे २००८ सालीच सांगितले होते :-)
"It also, however, increases demand. So, for example, just as an interesting thought for you, there are 350 million people in India who are classified as middle class. That's bigger than America. Their middle class is larger than our entire population.
"And when you start getting wealth, you start demanding better nutrition and better food, and so demand is high, and that causes the price to go up," (दुवा)
त्यावर तत्कालीन व्यापार मंत्री श्री. जयराम रमेश म्हणाले होते: '"George Bush has never been known for his knowledge of economics," आता ते पवार साहेबांना आणि मोंटेकसिंहसाहेबांना असे म्हणू शकतील का ते बघू! ;)
18 Mar 2011 - 4:52 pm | वपाडाव
खाव खाज सुटत असावी...
आपन काय म्हंता?
18 Mar 2011 - 4:59 pm | अन्या दातार
बी.एम.आय. इंडेक्स हा लोकांची तब्येत दर्शवणारा इंडेक्स आहे. काय सांगतो बरे हा इंडेक्स? तर एखाद्या देशातील लोक कुपोषित आहेत, पोषित आहेत कि लठ्ठ आहेत हे दर्शवणारा हा इंडेक्स.
बी.एम.आय. इंडेक्स काय म्हणतोय ते बघुयात जरा:
१९९०:
भारतः २०.७०
अमेरिका: २६.७१
चीनः २१.९
कॅनडा: २६.१२
२००९:
भारतः २०.९९
अमेरिका: २८.४६
चीनः २३
कॅनडा: २७.५
हा दुवा
आता तुम्हीच लक्षात घ्या कोण जास्त खातोय ते!
18 Mar 2011 - 6:24 pm | रेवती
दुसर्या देशातले बीएमाय वाढलेले दिसताहेत पण मला वाटते कि आपण भारताबद्दल काळजी करूया.;)
कोण म्हणतो म्हणून नाही पण आपल्याला काय जाणवते आहे?
मला तरी बरेचदा 'घरी स्वयंपाक करणारी' असे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. पूर्वी हेच कौतुकानं म्हणत असतील पण आजकाल नाही. स्वयंपाक फारसा येत नाही हे सांगताना वाईट वाटत नाही (स्त्री व पुरुष दोघांनाही). नुसते खाणेच नाही तर पिणेही वाढल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. तूर डाळ मध्यंतरी महाग झाल्याने 'गरीब जनतेने' प्रथिने कशी मिळवायची? हा ओरडा झाला. कडधान्येही स्वस्त नसावीत आजकाल पण प्रथिनांचा चांगला व त्यामानाने स्वस्त स्रोत असलेल्या काही कडधान्यांबद्दल माहिती देणे झाले नाही. अनेकजण डाळीच्या किमती कमी होइपर्यंत जास्त पैसे मोजत राहिले आणि डाळ स्वस्त होऊनही अतोनात स्वस्त होणारच नव्हती. अश्यावेळी जनतेला अल्टर्नेटीव्ह प्रथिन स्त्रोतांची माहिती देणे हे सरकारी काम आहे पण अनेक डॉक्टर्रसही ही कामे करू शकतात. त्यांनी त्यांच्या दवाखान्यात एखादा तक्ता लावायला हरकत नसावी. मिपावर खादाड अमिताबाई या वेळोवेळी माहिती देत असतात ते मला आवडते हे या निमित्ताने सांगते.
18 Mar 2011 - 6:34 pm | टारझन
नाही. अलिकडच्या बर्याचष्या पाककृत्या लोकांचा घास बसवुन त्यांची खायची वासनाच उडवत आहे . त्यामुळे भस्म्या कंट्रोल होण्यास मदत होते आहे. :) नेचर बॅलंस करतं सगळं :)
- टारेश घासबसवी
18 Mar 2011 - 7:37 pm | अरुण मनोहर
अगदी बरोबर बोलले मॉन्टेक सिंग.
वर महेश काळे (पैसे खाणे) आणि डीलरने (क्रय शक्ती) देखील योग्य मुद्यावर बोट ठेवले आहे.
पैसा खाणे, वरची कमाई हे सगळे स्त्रोत प्रचंड वाढले आहेत. आणि सगळ्या थरांमधे पसरले आहेत. हा काळा पैसा कायदेशीर पणे उद्योगात लावायला थोडे अडचणीचे असते. उधळपट्टी, शानशौकत, दिखावा ह्यात बराच खर्च केला जातो. घामाचा पैसा असा भराभर खर्च करायला लोकांना आवडत नाही. पण हरामाचा पैसा फटाफट बाजारात येतो. ह्यामुळे क्रय शक्ती प्रचंड वाढते. पण उप्तादन त्या प्रमाणात वाढत नाही. वाढले तरी एकांगी प्रमाणात, काही दिखाव्यांच्या, काही मौजमौजेच्या क्षेत्रात वाढते.
ह्याचा परिणाम सरळ दिसतो आहे- जीवनाश्यक वस्तुंची भाववाढ.
काळा पैसा हाच नंबर एक कारण आहे.
अर्थात वाढत्या डीझेल आणि पेट्रोल किमती हे दुसरे कारण आहेच.