लांबचे येते दिसून जवळ अधिक
आहोत त्यात जणु आपण कधी
थ्री डि ची आहे जादु कसली
दुरुनच साधता येते जवळीक
पहावे उतरुन तिच्यात कधी
जाणावे तिचे मन माझ्यासाठी
करावे हे रोमांच कधी तरी
वापरून चश्मा हा अतरंगी
डोळेच का नाही दिले बप्पानं थ्री डी
असे वाटते कधी कधी
अन कधी वाटते कि बरेच झाले
आपले तर आपलेच
दुक्ख इतरांचे झाले असते किती
थ्री डि असावे फक्त एक चयन
विरंगुळा म्हणून कधी तरी
कळावे मन इतरांचे मला खरे
अन माझे त्यांना कधी तरी
थ्री डि असावी एक मानसिकता
ज्यात आपण व्हावे कुणाचे कधी
कदाचित सापडेल औषध रागाचे
राग येताच कुणावर क्षणिक..
तु देखिल घाल बप्पा हा चश्मा कधी
तुला देखिल ठाउक नसतील
तुच बनविल्या ह्या मानवांचे
झटझट बदलणारे रंग किती
प्रतिक्रिया
17 Mar 2011 - 5:18 am | नरेशकुमार
छान कविता.
नेक्स्ट फोर-डी वर लिहा.
17 Mar 2011 - 7:18 am | प्रकाश१११
निनाव -आवडली कविता
डोळेच का नाही दिले बप्पानं थ्री डी
असे वाटते कधी कधी
अन कधी वाटते कि बरेच झाले
आपले तर आपलेच
दुक्ख इतरांचे झाले असते किती