aapla maharashtra
१)आता कोठे राहीली सच्चाइ अन ईमानदारी
नोकरी साठी हिडंतोय मी दारोदारी,
डोके घालायला घर अन दोन वेळेची भाकरी,
झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी,
याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी?
२)म्यानेतुन तलवार काढल्यावर
तीला चटक लागते रक्ताची,
नेत्यांनाही निवडनुकीनंतर
भुक लागते सत्तेची,
रक्ताचाच अभिषेक द्यावा लागतो
तलवारीच्या पातीला,
अन मग विकतात हेच नेते
महाराष्ट्राच्या मातीला.
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 9:14 pm | निनाव
खल्लास!!!
जे न देखे रवि... अगदी खरे उतरले आहे हे वाक्य!
16 Mar 2011 - 9:17 pm | pramanik
नोकरी करुनही झेरॉक्ससाठी उधारी? कुठली नोकरी करतो हा कवितेतला पात्र?
नाही म्हणजी त्या नोकरीपासुन आम्ही खबरदार राहु नाही का?
17 Mar 2011 - 8:43 am | श्री गावसेना प्रमुख
नोकरी साठी झेरॉक्स ची उधारी हो,नोकरी झाल्यावर नाही.
17 Mar 2011 - 11:47 am | अमोल केळकर
मस्त . आवडली कविता :)
अमोल केळकर
17 Mar 2011 - 1:17 pm | नरेशकुमार
why don't you do a business ?
Just try it !
17 Mar 2011 - 6:11 pm | श्री गावसेना प्रमुख
झेरॉक्स च दुकान टाकाव म्हणतोय,