[ज्योतिष] ४ एप्रिलचा गुढीपाडवा- हिंदूंचा नववर्ष दिन अशुभ

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
16 Mar 2011 - 8:16 am

भारतीयांच्या मुहूर्तांसंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवा, दसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला "शुभ"च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्या ज्योतिर्विदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही.

आता हेच बघा!

दिनांक ३ एप्रिल २०११ रोजी सायन मेष राशीत १३ अंश ३३ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या अनेक अशुभ योग करते. स्पष्टच लिहायचे झाले तर ही अमावस्या
- प्लुटोबरोबर केंद्र योग
- नेपच्य़ून बरोबर अर्धकेंद्र योग, नेपच्य़ूनचा शनीबरोबर षडाष्टक योग
- शनीबरोबर प्रतियुती

या शिवाय मंगळ-हर्षलची अंशात्मक अपघातकारक युतीमुळे हा कालावधी अत्यंत त्रासदायक बनला आहे.

सांगायचे तात्पर्य एवढेच की ४ एप्रिलचा गुढीपाडवा हिंदूंचा नववर्ष दिन असला तरी अशुभ बनला असल्यामुळे शक्यतो कोणतीही नवी सुरुवात (नवी वाहन खरेदी अथवा गृह खरेदी इत्यादि ) या दिवशी करू नये. केलीच तर ती अशुभ योगांवर झाल्यामुळे त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.

अनेक अशुभ योग सक्रिय झाल्यामुळे मोठा जनसमुदाय या ग्रह योगांमध्ये सापडतो. म्हणून नेहमी मी करत असलेले बाधित जन्मतारखांचे गणित यावेळेला देत नाही कारण यादी बरीच मोठी होईल.

http://rajeev-upadhye.blogspot.com/

ज्योतिष

प्रतिक्रिया

पंगा's picture

16 Mar 2011 - 8:20 am | पंगा

काय दणदणीत टायटल आहे!

म्हणजे अंधश्रद्धाविरोधी आणि हिंदुत्ववादी, दोन्हींच्याही टोळधाडी एकाच वेळी मागे लावून घ्यायला आदर्श आहे.

मानले, गुरू!

चित्रा's picture

16 Mar 2011 - 8:30 am | चित्रा

सगळ्या पेढ्यांचे मालक सराफ - पेठे, गाडगीळ, अष्टेकर इ. कडून युयुत्सुंना नववर्षाआधीच धनप्राप्तीचा योग आहे असे भविष्य वर्तवते.

प्लुटोला कधीपासुन भविष्यात अ‍ॅड केला हो?

अनेक अशुभ योग सक्रिय झाल्यामुळे मोठा जनसमुदाय या ग्रह योगांमध्ये सापडतो. म्हणून नेहमी मी करत असलेले बाधित जन्मतारखांचे गणित यावेळेला देत नाही कारण यादी बरीच मोठी होईल.

म्हणजे कीती % लोक पोळणार? हे एकदम सेफ भाकित आहे ब्वॉ, "जिंदगी झंड है" असे ५०% पेक्षा जास्त लोक तर सतत रडत असतात. युयुत्सुंचा धंदा जोरात!

धन्यवाद. या पाडव्याला मी एक विमान खरेदी करणार होतो.. आता नंतर करतो. ;)

टारझन's picture

16 Mar 2011 - 12:20 pm | टारझन

तसंही मला विटकरी रंगाचं विमान हवं होतं , कलर चॉइस मुळे तसाही वेळ लागणार हे पथ्थ्यावर पडणार :)

बाकी ते उपग्रह सोडलेत वर .. मागे एकदाही विचारल्या होते . हे सोडलेले उपग्रह नाही का भविष्यवाणीत लुडबुड करत ? ;)

-( ३६५ दिवस सारखे) टारुत्सु

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

मी एक क्रुझ घ्यावे म्हणत होतो आणि एक छोटासा आयलंड.. पण असो...

सावध केल्याबद्दल धन्यवाद.

बादवे दारू खरेदी केली तर चालेल काय हो ?

परुत्सु

धन्यवाद. या पाडव्याला मी एक विमान खरेदी करणार होतो.. आता नंतर करतो

मी सुद्धा गविंना एक डझन फायटर प्लेन ची ऑर्डर दिली होती
आता क्यान्सल करतो

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2011 - 12:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आम्हाला तर आमच्या भाईंचेच (पुल) मत अगदी पटत बघा,

आनंदाला मुहुर्तच लागत नाही, तो जेव्हा होतो तोच त्याचा मुहुर्त असतो.

शुभ आणि अशुभ गेल... ......

बिचारे अगोदरच चिंबलेले आहेत त्यात हा आघात....देवच त्याचे भले करो.

अनेक ग्रह आनि उपग्रहांच्या शुभ युति मुळे आमच्या बुद्धिवर विपरित परीणाम झाल्या ची दाट शक्यता असुन
युयुत्सु यांच्या भारतीयांच्या संबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. भारतीय कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला "शुभ"च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्या ज्योतिर्विदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही.

आता हेच बघा!

दिनांक Wed, 16/03/2011 - 08:16 रोजी कोणत्या तरी राशीत कितितरी अंश आणि कितितरी मि वर कोणाची तरी युती होत असून ही युती अनेक अशुभ लेख पाड्ते . स्पष्टच लिहायचे झाले तर वरील लेख .......
-कोणातरि बरोबर केंद्र योग
- कोणातरि बरोबर अर्धकेंद्र योग,कोणातरिचा कोणातरिबरोबर षडाष्टक योग
- कोणातरि बरोबर कोणाची तरि प्रतियुती

या शिवाय कोणाची तरि कोणा तरि बरोबर अंशात्मक अपघातकारक युतीमुळे हा कालावधी अत्यंत त्रासदायक बनला आहे.

सांगायचे तात्पर्य एवढेच की आज चा दिवस अशुभ बनला असल्यामुळे शक्यतो कोणताही नवा लेख वाचायला सुरुवात (नवी स्वगृह * चर्चा * काव्य * साहित्य * पाककृती * कलादालन* कौल* घोषणा* नवे लेखन * मराठी दिन २०११ * क्रिकेट विश्वचषक २०११* मदत पानेइत्यादि ) या दिवशी करू नये. केलीच तर ती अशुभ योगांवर झाल्यामुळे त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.

अनेक अशुभ योग सक्रिय झाल्यामुळे मोठा जनसमुदाय या ग्रह योगांमध्ये सापडतो. उदा. मिपाकर म्हणून नेहमी मी करत असलेले बाधित जन्मतारखांचे गणित यावेळेला देत नाही कारण यादी बरीच मोठी होईल.

सदर ज्योतिष खरे ठरल्यास आम्ही नैतिक जबाबदारि स्विकारायला तयार आहोत.(*अटि लागु)

अमोल केळकर's picture

16 Mar 2011 - 4:00 pm | अमोल केळकर

छान माहिती

अमोल केळकर

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2011 - 4:34 pm | नगरीनिरंजन

४ एप्रीलला नवा जन्म घेऊ पाहणार्‍या जीवांचं काय? मुळात जीव जन्माच्या क्षणाबद्दल वाद असला तरी दोन्हीपैकी एकही क्षण टाळता येणे शक्य नाही. टारझन यांनीही योग्य शंका उपस्थित केली आहे. प्लुटोशी केंद्रयोग असतो तर SLV IIशी का नाही? अर्थात ज्योतिषीबुवा यावर सोयीस्करपणे मौन पाळतील यात शंका नाही.

SLV IIशी केंद्रयोग होऊ शकतो, तसे अवकाशात फिरणा-या प्रत्येक दगडा बरोबर तो होऊी. शकतो. प्रश्न आहे तो आवर्तनाच्या (सायकलच्या) अभ्यासाच्या. प्लुटोच्या सायकलचा अभ्यास झाला आहे पण आकाशातल्या प्रत्येक दगडाची सायकल अभ्यासली गेली नाही आणि ते शक्य ना्ही

पंगा's picture

16 Mar 2011 - 5:22 pm | पंगा

SLV IIशी केंद्रयोग होऊ शकतो, तसे अवकाशात फिरणा-या प्रत्येक दगडा बरोबर तो होऊी. शकतो.

१. या वाक्यातील शेवटून दुसर्‍या शब्दातले शेवटचे अक्षर नेमके कसे टंकलेत?
२. शेवटून दुसर्‍या शब्दानंतरचा पूर्णविराम लक्षात घेता, आपले वास्तव्य तूर्तास जर्मनीत असते काय?

प्रश्न आहे तो आवर्तनाच्या (सायकलच्या) अभ्यासाच्या.

३. आम्ही पुण्यात अनेक वर्षे सायकल चालवलेली आहे. पक्षी, आमचा सायकलचा पुरेसा अभ्यास आहे. शिवाय, पुण्यात राहत असताना आम्हीही अवकाश मिळाल्यास त्या अवकाशात सायकलवर फिरत असू, आणि आमच्या मातु:श्रींचे आमच्याबद्दलचे 'दगड' असे मत आजतागायत टिकून आहे. आमच्याशी तो केंद्रयोग की काय तो होऊ शकतो काय? शकत असल्यास, इतक्या वर्षांच्या आमच्या पुण्यातील वास्तव्यात तो कसा काय झाला नाही?
४. पुण्यातील प्रत्येक सायकलदुरुस्तीवाल्याचा (सायकल खोलूनखोलून झालेला) सायकलचा अभ्यास दांडगा असावा असे मानावयास जागा आहे. सायकलदुरुस्तीवाल्यांबरोबर केंद्रयोग होऊ शकतो काय?

आकाशातल्या प्रत्येक दगडाची सायकल अभ्यासली गेली नाही आणि ते शक्य ना्ही

५. पुण्यातील प्रत्येक दगडाकडे सायकल असते याची कल्पना होती. आकाशातील प्रत्येक दगडाकडेसुद्धा सायकल असते ही माहिती रोचक आहे. इतक्या सायकली ते नेमक्या कोठे चालवतात?
६. मुळात आकाशात सायकल चालू शकते काय? की हा काही अंतरिक्षासारखा (पक्षी: अंतराळातील रिक्षा) प्रकार आहे?
७. अंतरिक्षावरून आठवले. अंतराळातील रिक्षा या सायकलरिक्षा असतात काय? असल्यास, त्याऐवजी ऑटोरिक्षा का वापरल्या जात नाहीत? पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या संदर्भात 'पेट्रोल अंतराळास जाऊन भिडले आहे' असे ऐकले होते. त्यामुळे अंतराळात पेट्रोलचे दुर्भिक्ष्य नक्कीच नसावे!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

पंगा शेठ __/\__

ख ल्ला स !!

जाता जाता :- अंतराळातला 'शेखर मल्होत्रा' कोण ?

चित्रा's picture

16 Mar 2011 - 5:57 pm | चित्रा

पुण्यात राहत असताना आम्हीही अवकाश मिळाल्यास त्या अवकाशात सायकलवर फिरत असू, आणि आमच्या मातु:श्रींचे आमच्याबद्दलचे 'दगड' असे मत आजतागायत टिकून आहे. आमच्याशी तो केंद्रयोग की काय तो होऊ शकतो काय? शकत असल्यास, इतक्या वर्षांच्या आमच्या पुण्यातील वास्तव्यात तो कसा काय झाला नाही?

बेस्ट प्रतिसाद! :)

पैसा's picture

16 Mar 2011 - 7:14 pm | पैसा

पंडितजी मान लिया!
hehe

प्रदीप's picture

16 Mar 2011 - 8:04 pm | प्रदीप

:)

हा हा हा .. लै भारी...

बाकी सगळ्यात जास्त अडचणी हे दगड जेव्हा भर रस्त्यात सायकली हातात घेउन गप्पा हाणत बसतात तेव्हा होतात.. (लगेच संपादकांनी अवांतराचा संबंध इथे लावु नये) ;-)

अडगळ's picture

17 Mar 2011 - 3:11 am | अडगळ

पण राव ती तुमची नेहमी जी काळ्या-पांढर्‍या- राखाडी रंगाची जी काय प्रकाशयोजना* करता ती नसल्याने** चुकल्यासारखे वाटले.

*म्हणजे योजना तुम्ही करता , प्रकाश आम्ही टाकतो.कर्सर्-माऊस फिरवत फिरवत.
** ती आहे का हे पाहण्यासाठी चारदा कर्सर्-माऊस फिरवला आणि मगच 'चुकल्यासारखे वाटणे' व्हॅलिडेट झाले.

सेरेपी's picture

17 Mar 2011 - 5:55 am | सेरेपी

हा हा!

युयुत्सु's picture

17 Mar 2011 - 7:20 am | युयुत्सु

आम्ही पुण्यात अनेक वर्षे सायकल चालवलेली आहे. पक्षी, आमचा सायकलचा पुरेसा अभ्यास आहे. शिवाय, पुण्यात राहत असताना आम्हीही अवकाश मिळाल्यास त्या अवकाशात सायकलवर फिरत असू, आणि आमच्या मातु:श्रींचे आमच्याबद्दलचे 'दगड' असे मत आजतागायत टिकून आहे. आमच्याशी तो केंद्रयोग की काय तो होऊ शकतो काय? शकत असल्यास, इतक्या वर्षांच्या आमच्या पुण्यातील वास्तव्यात तो कसा काय झाला नाही?

तुम्ही ज्या अवकाशात सायकल वरून फिरत होतात त्यावेळेस ज्योतिषांच्या दूर्बीणीत निरिक्षणासाठी उपलब्ध झाला नाहीत (आता हेच बघा, पुण्यात कोथरूडमध्ये राहून डेक्कन जिमखान्यावरचे दगड अभ्यासायला आवश्यक दूर्बीणी अजून विज्ञानाने शोधल्या नाहीत.). सबब, आपल्या सारख्या भू-स्थित दगडांच्या भ्रमणांचा अभ्यास आम्हा ज्योतिषांना करता येत नाही.

पंगा's picture

17 Mar 2011 - 9:21 am | पंगा

तुम्ही ज्या अवकाशात सायकल वरून फिरत होतात त्यावेळेस ज्योतिषांच्या दूर्बीणीत निरिक्षणासाठी उपलब्ध झाला नाहीत (आता हेच बघा, पुण्यात कोथरूडमध्ये राहून डेक्कन जिमखान्यावरचे दगड अभ्यासायला आवश्यक दूर्बीणी अजून विज्ञानाने शोधल्या नाहीत.).

कोथरूडमध्ये राहणार्‍या माणसास डेक्कन जिमखान्यावरचे (झालेच तर नदीपल्याड एकेकाळच्या आमच्या ४११०३०मधले) दगड अभ्यासायला दुर्बीण हो कशाला लागते?

सायकलवर टांग टाकून, नाही तर रिक्षाने येता येत नाही काय? अंतर इतकेही जास्त नाही. (हं, चालत यायला म्हणाल तर थोडे जास्त आहे हे मान्य.)

सबब, आपल्या सारख्या भू-स्थित दगडांच्या भ्रमणांचा अभ्यास आम्हा ज्योतिषांना करता येत नाही.

सबब, आपली सबब/पळवाट पटली नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2011 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्बीण वगैरे शब्द कानावर येताच लगबगीने या धाग्यावर येण्याचं सार्थक पंगाशेठमुळे झालं. पंगाशेठ, आमचा साष्टांग प्रणाम मान्य करा. _/\_

कोथरूडमध्ये राहणार्‍या माणसास डेक्कन जिमखान्यावरचे (झालेच तर नदीपल्याड एकेकाळच्या आमच्या ४११०३०मधले) दगड अभ्यासायला दुर्बीण हो कशाला लागते?

सूक्ष्मदर्शीबद्दल बोलत असतील ते, चुकून दुर्बीण म्हटलं असेल.

युयुत्सु's picture

17 Mar 2011 - 10:49 am | युयुत्सु

ज्योतिषाना अभ्यासासाठी जे दगड लागतात त्यांचा प्रमुख गुणधर्म म्हणजे भ्रमणसातत्य होय. तुमच्या स्वत:च्या वर्णनावरून तुम्ही धूमकेतूमधले दगड वाटता. सबब, आवश्यक असलेली दूर्बीण अथवा द्विनेत्री किंवा तत्सम काहीही उपलब्ध झाली तरी तुमचा अभ्यास उपयोगाचा नाही.

राजेश घासकडवी's picture

17 Mar 2011 - 8:58 am | राजेश घासकडवी

दगडांची सायकल, सायकलचा अभ्यास, अंतरिक्षा, अंतराळ... पार अवकाशात नेलाय प्रतिसाद.
अंतरिक्षा जबरदस्त... मान लिया.

बाय द वे, होऊी लिहिताना त्यांनी होऊही लिहिलं आणि ह खोडून टाकला :)
(ते बहुधा इन्स्क्रिप्ट वापरतात. त्यात ु ू ी ि स्वतंत्र लिहिता येतात.)

पंगा's picture

17 Mar 2011 - 9:12 am | पंगा

(ते बहुधा इन्स्क्रिप्ट वापरतात. त्यात ु ू ी ि स्वतंत्र लिहिता येतात.)

माहितीबद्दल आभार.

नितिन थत्ते's picture

17 Mar 2011 - 11:27 am | नितिन थत्ते

<०=0==

साष्टांग दंडवत.

विनायक बेलापुरे's picture

17 Mar 2011 - 2:20 pm | विनायक बेलापुरे

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2011 - 7:54 pm | नगरीनिरंजन

आकाशातल्या प्रत्येक दगडाची सायकल तपासली की नाही त्याने त्याचा परिणाम व्हायचा थोडीच राहणार आहे? म्हणजेच अब्जावधी गोलकांपैकी फक्त दहा-बारा ग्रहगोल वापरून केलेला अंदाज किती अचूक असणार आहे?
असो.
पंगाशेटला साष्टांग नमस्कार :-)

मानवी जीवन सुख आणि दू:ख या दोन केंद्रकांभोवती प्रामुख्याने फिरताना दिसते. हे दोन पैलु निश्चित करायला १०-१२ ग्रहगोल पुरेसे आहेत.

पंगा यांच्या वाचनीय प्रतिसादासाठी लेखाचे निमित्त झाले.

त्याचे निमित्त झालेल्या अवकाशातील दगडाधोंड्यांच्या युतीचा आभारी आहे.

सहज's picture

17 Mar 2011 - 5:02 am | सहज

पंगाशेठ म्हणजे पृथ्वीवरच्या दगडांच्या उद्धारासाठी परग्रहावरुन आलेला अश्म!

५० फक्त's picture

16 Mar 2011 - 9:44 pm | ५० फक्त

ऑर ये लगा पंगा का सिक्सर.. भारी रे मानलं, तुम्हाला.

काय ठरलं मग शेवटी? विमान घेऊ का नको?

पंगा's picture

17 Mar 2011 - 11:14 am | पंगा

त्याऐवजी सायकल घ्या.

धूमकेतूसारखी कुठूनही कुठेही फिरायला बरी.

शिवाय धूमकेतूसारखे फिरले की ज्योतिषी मागे लागत नाहीत हा बोनस फायदा!

शिल्पा ब's picture

17 Mar 2011 - 11:17 am | शिल्पा ब

तुम्ही गप बसा ओ!! आणि पेट्रोल अंतराळात पोचलय म्हणतात तर विमानात काय भरणार?
कुणाचं काय तं कुणाचं काय...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Mar 2011 - 1:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

घेऊन टाका हो. आणि हो, सिनेमा बघायला जाताना ते पार्क कराल तेव्हा चावी न विसरता काढून घ्या. शिवाय लकडी पुलावर ते न्यायला बंदी तर नाही ना, हे ही बघून घ्या.

विनायक प्रभू's picture

17 Mar 2011 - 2:01 pm | विनायक प्रभू

विमानच घे रे नान्या.
फक्त बियर प्यायची सवय ठेव म्हणजे झाले.
(आत्ताच मुत्र इंधनाचा शोध लागलेला आहे असे वाचले)

रमताराम's picture

17 Mar 2011 - 10:05 pm | रमताराम

नाना नि वरील सारे प्रतिसादक यांना समायिक __/\__

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2011 - 1:07 pm | प्रकाश घाटपांडे

धर्मशास्त्रीय दृष्ट्या चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शुभ मुहुर्त असल्याने फलज्योतिषकीय ग्रहयोग काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करण्याची परंपरा ज्योतिषातच आहे