पुन्हा पुन्हा तू येतोस
तुझा मीट्ट अंधार,
गडद काळोख घेउन
पुन्हा पुन्हा ते पाशवी,
ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन
पुन्हा मी लढते, जीव तोडुन
सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन,
स्वत:तील सत्व जपत
तू घोंघावत येतोस सुनामी सारखा
आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत
मला संपवून टाकायला
पण मी जिवाच्या आकांताने लढते
स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने
लढते लढते लढते
त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला
पुन्हा एकदा परतवून लावते
माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो
पण मी जिवंत रहाते
मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला
अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते
प्रतिक्रिया
15 Mar 2011 - 7:39 pm | नरेशकुमार
आई ग्ग !
15 Mar 2011 - 7:40 pm | प्राजु
वाह!! छान. :)
15 Mar 2011 - 8:31 pm | गणेशा
कविता आवडली ...
15 Mar 2011 - 8:50 pm | वर्षा म्हसकर-नायर
नरेशकुमार, प्राजु, गणेशा धन्यवाद.
15 Mar 2011 - 8:56 pm | टारझन
रुद्रावतारावर कविता ? !!!
16 Mar 2011 - 12:20 am | वर्षा म्हसकर-नायर
:)
16 Mar 2011 - 11:54 am | मिसळलेला काव्यप्रेमी
........!!