आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे,
आपण जणू एक कलाकारच असतो ।
आपापल्या परीने प्रत्येक जण,
आपापली भूमिका ति बजावत असतो ।
प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या,
रंगमंच्यावर मांडत असतो ।
असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे,
आपण येथे साकारत असतो ।
कुणास जमतो-कुणास न जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो ।
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो ।
कितीही लांबला जरी खेळहा तरी तो,
शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो ।
खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे,
ह्या परी कोणता मग मार्गच नसतो ।
ह्या खेळाचा सुत्रधार तो,
एकमेव हा देवच असतो ।
आपण फक्त जणू ताबेदार ते,
हुकमावर त्याच्या नाचत असतो ।
तोच ठरवितो आपूली भूमिका,
अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो ।
शेवटी देउनी वृद्धपणा तो,
आपूली रजाही मानूनी घेतो ।
हर्षद अ. प्रभुदेसाई......
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 11:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच जमलीय....
14 Mar 2011 - 12:04 pm | टारझन
पण माझ्या माहिती प्रमाणे ... "आयुष्य एक चुलिवरच्या कढई मधले .. क्कांऽऽऽऽऽद्दे प्पोऽऽऽऽऽऽऽऽहे" आहेत म्हणुन !!
14 Mar 2011 - 12:10 pm | नरेशकुमार
नाय,
आयुश्य म्हनजे गुलाबजामुन !
कादा पोहे खान्याचि गरज न वाटलेला णकु.