आता मागणे एकची

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
14 Mar 2011 - 7:12 am

माझे मागणे एकची, ठेव ताठ उभा सूखी
खोल रुतवले पाय, जरी माती रुखी सुखी

अंगाखांद्यावर खेळे, पिलावळ चिमण्यांची
धरी पानांचा पखवाज, धून अंगाई गीताची

राघू पोपटी, मी तृप्त, बाकदार लाल चोची
श्वास रोखूनी साहतो, पक्व फ़ळावर टोची

कधी ढगही धरती, वेड्या कंजुषीचा हट्ट
तहानला व्याकूळ मी, बंद खजिने ते घट्ट

ओल्या वाऱ्यातून बाहू, शोषी अपुऱ्या जलाते
दवबिंदू चार घेऊन, रस भरतो फ़ळाते

येता मागणी कुठूनी, दांडे कुऱ्हाडींचे काळ
भुंडे करूनीया अंगा, कुणी पेटविती जाळ

आता मागणे एकची, राहो अंतरंगी श्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास

कविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Mar 2011 - 8:06 am | स्पंदना

__/\__

ज्ञानराम's picture

14 Mar 2011 - 9:34 am | ज्ञानराम

अप्रतिम ...

पुर्वी धातु बराच पातळ होता ... पण आता घट्ट होतोय ... जियो मनोहर जी ... :) अजुन प्रोडक्सन वाढवा पण हे मागने फार अननॅचरल आहे , कधीतरी ठिके .. पुढच्या वेळी कल्जी घ्या :)

- तरुण लंबोदर
दिस जातील दिस येतील || भोग सरल ||
सुख येईल || टार्‍या म्हणे ||

अरुण मनोहर's picture

14 Mar 2011 - 12:35 pm | अरुण मनोहर

बेबंद वृक्ष कटाई, आणि पर्यावरणाचा नाश होतांना त्या तोडलेल्या वृक्षाच्या मनात अजूनही जगासाठी जगायची उम्मीद आहे. ह्या आशयाची ही कविता.

वावा!! अप्रतिम कविता!!

ओल्या वाऱ्यातून बाहू, शोषी अपुऱ्या जलाते
दवबिंदू चार घेऊन, रस भरतो फ़ळाते

सुंदर!!

पैसा's picture

15 Mar 2011 - 10:09 pm | पैसा

आवडली...

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2011 - 7:44 am | नगरीनिरंजन

छान कविता!

प्रीत-मोहर's picture

16 Mar 2011 - 7:54 am | प्रीत-मोहर

मस्त !!!

ढब्बू पैसा's picture

16 Mar 2011 - 9:06 am | ढब्बू पैसा

आता मागणे एकची, राहो अंतरंगी श्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
अप्रतीम! सुंदर झालीये कविता खूपच!

अप्रतिम काव्य .. मनापासुन आवडले

--

अंगाखांद्यावर खेळे, पिलावळ चिमण्यांची
धरी पानांचा पखवाज, धून अंगाई गीताची

कधी ढगही धरती, वेड्या कंजुषीचा हट्ट
तहानला व्याकूळ मी, बंद खजिने ते घट्ट

एकदम छान