तो नं? - अस्साच आहे
पडतो धडतो पण नाही रडत तो
उभा राहातो तो पुन्हा उठून
भरारी घेतो पुन्हा दम भरुन
धरा करते धरशायी त्यास कधी
घेतात उंच लाटा त्यास पाशात
अग्निबाणच घेतात कधी परिक्षा त्याची
पण तो नाही होत अनुत्साहीत
खरं तर होते त्याचे मग 'फिनिक्स'
अन आगितून जन्मते नव-जीवन
तेवढ्याच उस्ताहानं
नव्या जोमानं सर्व उभे करण्याच्या जिद्दीनं
अस्साच आहे तो...जिद्दी!!
प्रतिक्रिया
13 Mar 2011 - 1:04 pm | निवेदिता-ताई
सुंदर