अंगडाई घेतेस तु जेंव्हा

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
13 Mar 2011 - 10:16 am

अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून
मी बघताच वीज भिरभिरते अंगभर
जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात
लाजाळुच बसते जशी अंग दुमडून

चढत्या श्वासांना तु दाबतेस कसून
बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन
हात शोधतात पदर हातातला मग
अधिकच मोहक येतेस तु दिसून

उडावे केस मोकळे तुझे मग विसरुन
उठाव्या नजरा तुझ्या हळुच ठरवून
असह्य होते माझेच मला तुझे दिसणे मग
पडावे मजवर तुझे मधु यौवन कोसळुन

जणु यावी कशी चाल गाण्याची चालुन
आरस्यातली छवी यावी बाहेर निघुन
गझल उतरावी माझी नश्यात भिजुन
आलीस पौर्णिमे ची रात्र मज दिसून

अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून
मी बघताच वीज भिरभिरते अंगभर
जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात
लाजाळुच बसते जशी अंग दुमडून

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Mar 2011 - 11:53 am | मिसळलेला काव्यप्रेमी

solid च जमलीय.. खुप आवडली....