चांदण्या राती पाहाता वाटे असे
उशीत मी चंद्रच व्हावे तुझे
कुशीत तुझ्या बनावे तरंग
हसणार्या लाटाच नदीत जैसे
तुझ्या नजरांत बोलतात ती पाने
माझ्या प्रेमाच्या गातात ती गीते
तुझ्या श्वासांत आहे अशी जादू
मोहतात चाफ्याची कोमल फुले
येताच तु जीवन होते संमोहीत
घेतो मन माझे वसंता चा झोके
पाहातो मी आभाळात जेंव्हा कधी
दिसतात मज नुसते तुझेच चेहरे
मिठित माझ्या यावीस तु असे
मध पाण्यात विसावे जैसे
बहरावे जीवन माझे तुज परि
तारुण्यास लागावे मोहोर जैसे
चांदण्या राती पाहाता वाटे असे
उशीत मी चंद्रच व्हावे तुझे
कुशीत तुझ्या बनावे तरंग
हसणार्या लाटाच नदीत जैसे
प्रतिक्रिया
12 Mar 2011 - 9:35 am | प्रकाश१११
निनाव -एकदम झकास .
येताच तु जीवन होते संमोहीत
घेतो मन माझे वसंता चा झोके
पाहातो मी आभाळात जेंव्हा कधी
दिसतात मज नुसते तुझेच चेहरे
आवडली
12 Mar 2011 - 11:50 am | विनायक बेलापुरे
वा !!
12 Mar 2011 - 8:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त!!