आज असे वाहिले वारे, नाहीच बघीतले तिने वळुन
हात सुटले नकळत अमुचे, मन माझे हाय गेले जळुन
न दिसली ती तिथे ही, मी गेलो कठिण वाटा पार करुन
सुख माझे एवढेच मनी, होतो मी गेलो सर्व तिला हरून
भरकटलोच तिचा शोध घेत मी, असा आलो लांब निघुन
टाकता पाउल पुढे, पाउलखुणा गेल्या मागच्या मिटून
एकत्रच होतो आम्ही निघालो , हातात हात धरून
सुटले हात तुझे जेथे प्रवास माझे तिथे गेले संपुन
प्रतिक्रिया
12 Mar 2011 - 9:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान प्रयत्न...