उठवू नका मज आता

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
10 Mar 2011 - 9:45 am

उठवू नका मज आता, मी उरलो जिवंत नाही
करू नका चर्चा माझी, कुणाच ज्याची खंत नाही

उकरा न शोधा राख माझी, मी अजुन थंड नाही
सोबत माझ्या जळले ह्रदय आता ते शिल्लक नाही

कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही
नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही

भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही
तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही

रस्त्यावर उडलो धूर होऊनी आता सावली नाही
दिसलो कुठे भासच असावे मी उरलो जिवंत नाही

कविता

प्रतिक्रिया

कविता आवडली ...

लिहित रहा .. वाचत आहे ..

असाच एक रिप्लाय सुचला देतो ...

शब्दांना वाट मिळेना, स्वर्गाचे दारही बंद आहे
बोलू कसे मी तुझ आता, तू उरला जिवंत नाही

विचारु कोणाला काय? विठ्ठल का मार्ग आहे ?
पंढरीस जाण्यास मात्र , मी वारकरी संत नाही

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Mar 2011 - 3:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!! गणेशराव.. झक्कास....

निनाव's picture

10 Mar 2011 - 8:13 pm | निनाव

वाह गणेश राव, मस्तच. क्या बात!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Mar 2011 - 3:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त झालीये.... विशेष करुन:

कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही
नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही

भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही
तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही