राणीचे राज्य
ब्रिटीश आणि आमच्यात
एक गोष्ट अगदी सेम आहे
प्रत्येक घरात एक राणी आहे
आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम आहे
***
चिमुकल्या फुलांसाठी
अहंकाराची बोचक कुसळे
बाण होण्याआधी छाटून टाका
नाजूक चिमुकल्या फुलांसाठी
धनुष्य टाकून खाली वाका
***
सक्षमीकरण
शब्द अवघड वाटला तरी
सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ
पुरूषातील कोमल स्त्री जागवा
आणि प्रत्येक स्त्रीमधील पुरुषार्थ
***