(कधी)

मिलिंद फणसे यांची कधी  ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी  कधी ?

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे
वाटते चढली कुठे, वाटते  चढली कधी

ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी

लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?

हाण केश्या!

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हे दोन्ही शेर एकदम 'टुन्न' जमलेत! Wink
चतुरंग

:)

सही यार!

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?

खी खी खी!

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

खरयं.....कोरी पिण्यात जी मजा आहे ती भेसळमिश्रितमध्ये नाही!

असो, विडंबन नेहेमीप्रमाणे जब्राट!

रोजचा

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

अरे वा!

ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी

Smile तन डोले.. मेरा मन डोले...

लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?

Smile)
पण एक प्रश्न...हा मनुष्य स्वतः दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, आणि काव्यरचना मात्र दारु, तीचे निरनिराळे रंग, परिणाम, नशा इ.इ. गोष्टींगर मोठ्या अधिकाराने करतो ! हे कसे बॉ?
(आता, "मृत्यूचं वर्णन करायला स्वतः गचकायलाच पाहिजे का?" असं 'पुणे-३०' छापाचा प्रश्न करुन कोणी आम्हाला तोंडावर आपटू नये ही 'णम्र इनंती')

लेका..

Angry सिहगड चढून जाणारे...इतके बेवडे Hypnotized आहेत इथे..
त्या साठी आपण कशाला प्यायला हवी.. 8>
(दुसर्‍याच्या आणभवातून लिहणारा)केशवसुमार Nerd

संपतो सोडा

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

तुम्ही खरच छान करता विडंबन पण असं वाट्ट की तुम्हाला फारच आवड्ते का ????

ओ..

तुम्हाला फारच आवड्ते का ????
कोण?
(बुचकळ्यात) केशवसुमार

कोण?

विडंबनाच्या विषयाची नायीका Smile

शिव

शिव शिव..
काय बोलताय काय ऋचाताईईई.. Surprise छ्या छ्या...मी नाहि त्यातला... Not Talking
(लिंबाच्या रसात पाणी घालून पिणारा) केशवसुमार Nerd

लय

Rolling On The Floor

लय भारी!

(बुचकळ्यात) हे मी 'बुचक' 'ळ्यात' असं वाचलं आणि हा काय नवा सबुद बॉ म्हणून मीच (बुचकळ्यात) पडलो Smile)

-(बुचक ळ्यात) ध मा ल.

मस्त

मास्तर मस्तच कि राव!

मास्तर? केस

मास्तर?

केसुशेठ..मास्तर? तद् माताय...ही काय भानगड आहे हो केसुशेठ?

अता..

मला काय विचारतो Waiting
त्या सत्या काम जबालीला विचार Call Me .. मला कै ला मास्तर म्हणून राहिला बे? Thinking
(पुन्हा बुचकळ्यात) केशवसुमार Nail Biting

त्या सत्या काम जबालीला विचार

कय नाय ल बाल्या.......!!! भानगड करायला तु कय बाय नाय....!!

मास्तर बुच कळ्यात

काय मास्तर बुच कळ्यात सर्खे पडु नका!
म्हण्जे मास्तर हा एक शब्द हाय. तो आपल्याकडे आसाच वापरला जातो.!!

हात तेच्या......

हात तेच्या....................
डाव विस्कटला...............

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

लड बापू!!!!!!!!!!!!!!

आऊट...

पार 'आऊट' झालो आम्ही. मूळ रचना (म्हणजे विडंबन, फणसे यांची नव्हे. ती अद्याप वाचलेली नाही) व्हिस्कीची आणि प्रतिसाद चाखण्यासारखे.