देवा ...

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
3 Mar 2011 - 10:10 am

आस्तिकतेची भीती बाळगून ओढून ताणून नास्तिक मी
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...

समाजातले स्थान टिकविण्या चढतो तुझी पायरी
चुकवीत डोळा मग तुझ्यावरच करतो मनसोक्त शायरी ...

तुझ्या पुढ्यात मनातली हुरहूर अन चिंता वाढत जात
नकळतच मग, शरीर जोडते हात अन मन सोडते हात ...

पितोही मग ओंजळीतून मी तुझ्या चरणीचे तीर्थ
दाटून येतो घशाशी तेव्हा अवघा जगण्याचा अर्थ ...

भक्तांच्या गर्दीमधल्या नास्तिकतेच्या ढोंगाचे प्रतिक मी
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...

मुक्तक

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

3 Mar 2011 - 12:48 pm | कच्ची कैरी

मस्त कविता :)

निनाव's picture

3 Mar 2011 - 9:14 pm | निनाव

मस्त रचना आहे..