गाभार्‍यातील शिव शंभो ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
1 Mar 2011 - 7:26 am

त्या छोट्याश्या अरुंद गल्लीत
जुन्या पुराण्या वाड्यात
मध्यभागी खोलवर उतरत गेलेल्या
त्या पायर्या
आत शंकराचा गाभारा
मिट्ट काळोख .
मिणमिणता दिवा
टिपुकल्या प्रकाशाची काळोखाला साथ
मामा शिवशंभो करीत वाजवायचा ती
छोटीशी घण्टा
किणकिण नाद उडवून जायची काळोखाची पाखरे
अंधाराला भोके पाडीत
घुमायचा नाद गोल चौफेर
भीती वाटायची मला
मी गप्प घाबरून ..
मामाचा नाद घुमायचा
शी ssss व शsss भो ...!!
माझे कान गच्च .....!!!

खूप वर्षांनी गावी गेलो
गल्लीत गेलो
उध्वस्त झालेला वाडा
नि चकाचक नवी ईमारत
उत्तम बांधणीची
भळभळून प्रकाशाची
शंकराचा गाभारा सुंदर मार्बलचा
प्रकाशाने ओघळलेला
सुशिक्षित वाटला
पण मन नाही झाले प्रसन्न

मन शोधात बसलेय
त्या गच्च काळोखाचा गाभारा
त्यातला मिणमिणता दिवां
काळोखाला प्रकाशाची
टिपुकली साथ
मी आठवून हरवून जातोय
त्या जुन्या गाभार्यात
मामाचा आवाज
घुमणारा ..
हरवून गेलाय कधीचा ......!!

करुणकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

1 Mar 2011 - 7:45 am | मदनबाण

छान कविता...
उद्या महाशिवरात्र आहे...
बाकी उगाच शंकराच्या मंदिरा वरुन तेजोमहाल आठवला...

५० फक्त's picture

1 Mar 2011 - 7:56 am | ५० फक्त

आपली कविता छान आहे,

श्री. प्रकाश, आपली पुर्व परवानगी ग्रुहित धरुन आपल्या कवितेच्या दोन्ही कडव्यांना योग्य वाटतील अशी दोन छायाचित्रे टाकत आहे.

हे आहे श्री क्षेत्र भुलेश्वर येथील -

पहिल्या कडव्यासाठी

आणि हे श्री क्षेत्र जटाशंकर, मु़ळज ( माझ्या आईचे माहेर) येथील,

अशोक७०७'s picture

1 Mar 2011 - 10:34 am | अशोक७०७

अप्रतिम कविता.
अश्या गाभार्यतील मन्दिरात बरेच शान्त क्षण पूर्वी घालविले आहेत.

गणेशा चा अभ्यासपुर्ण प्रतिसाद वाचण्यास उस्तुक :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Mar 2011 - 12:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर कविता....
विषेशतः ह्या ओळी फार सुंदर....

किणकिण नाद उडवून जायची काळोखाची पाखरे

टिपुकला प्रकाश .. काळोखाची पाखरे ..

हे शब्द खुप आवडले ... जुन्या गाभार्‍यातील मामाचा आवाज आठवुन ही स्थब्ध होणारे मन शेवटच्या कडव्यामधेय मस्त मांडले आहे.

अवांतर :

काळेखाची पाखरे अंधाराला भोके पाडुन जात आहेत .. हे वाचुन छान वाटले .. कलप्ना मस्त तरी ही
काळोख आणि अंधार थोडे साम्य वाटते आहे.

पाषाणभेद's picture

1 Mar 2011 - 4:01 pm | पाषाणभेद

एकदम छान. जुन्या आठवणी जागवल्यात.

स्पा's picture

1 Mar 2011 - 4:03 pm | स्पा

सुंदर परिणाम साधलाय
अभिनंदन

जय शिवशंभो

बाकी मार्बलचा गाभारा ती शांतता देत नाही हे खरेच. ;)