साहित्यः
१ कप दूध
१ कप डबल क्रिम
१/२ कप साखर३ टेस्पून जिलेटीन पावडर
२ टेस्पून व्हॅनिला ईसेन्स
२ टेस्पून पाणी
रास्पबेरी सॉस चे साहित्यः
२ कप रास्पबेरी
१/४ कप साखर
१/२ टेबलस्पून लिम्बाचा रस
कृति
जिलेटीन पावडर थोड्या थंड पाण्यावर भुरभुरा व ते फुलण्यासाठी ५ मिनिटे बाजुला ठेवा.
एका भांड्यात दूध, डबल क्रिम आणि साखर एकत्र करुन एक उकळी आणा.
माएक्रोव्हेव मध्ये जिलेटीन पावडर १२ सेकंदासाठी ठेवून वितळवून घ्या.
गॅस बंद करून दूधाच्या मिश्रणामध्ये व्हॅनिला ईसेन्स आणी जिलेटीन पावडरचे मिश्रण घाला व नीट एकत्र करा.
रॅमॅकिन पॉट मध्ये मिश्रण ओतून फ्रिज्मध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी ४-५ तास ठेवा.
सॉसची कृति
रास्पबेरी, साखर आणि लिम्बाचा रस एकत्र करून गॅसवर ठेवा. रास्पबेरी वितळून एकजीव झाली की गाळ्णीतून गाळून घ्या.थंड होउ द्या.
पॅन्ना कोटा ला डीमोल्ड करा एका प्लेटमध्ये. त्यावर रास्पबेरी सॉस ओता. वर रास्पबेरी आणि पुदिन्याचे पान लावुन खायला सुरूवात करा :)
प्रतिक्रिया
26 Feb 2011 - 4:05 pm | सुत्रधार
रॅमॅकिन पॉट =??
जरा विस्कटून सांगाल काय?
26 Feb 2011 - 4:10 pm | टारझन
वाऊ , स्ट्रॉबेरी इज माय फेण्टसी ढिष यु णो :)
26 Feb 2011 - 4:32 pm | सानिकास्वप्निल
माफ करा....
रॅमॅकिन पॉट म्हण्जे सिरॅमिक किन्वा काचे चे छोटे बाउल ( वाट्या) जर का तुम्च्याकडे हे बाउल नसतील तर तुम्ही वाट्या ही वापरू शकता :)
डीमोल्ड चा अर्थ असा की एकदा का पॅन्ना कोटा तयार झाले कि ते एका ताटलीत वाटी उलट करून हलके आपटून काढणे.
26 Feb 2011 - 4:37 pm | सानिकास्वप्निल
स्ट्रॉबेरी नसून ती रास्पबेरी आहे :)
26 Feb 2011 - 4:39 pm | सुत्रधार
अवांतरः ( वाट्या) काचेच्या की (लोह, तांबे ई) धातूच्या?
26 Feb 2011 - 4:51 pm | मुलूखावेगळी
फोटो तर खुप्प् मस्त .
अर्थातच चवीला पण छान असनार.
तुम्ही पुण्यात असता का सानिकास्वप्निल ? ;)
26 Feb 2011 - 5:00 pm | सानिकास्वप्निल
चवीसाठी एकदा बनवून नक्की पहा तुम्हला आवडेल :)
मी पुण्याची नाही ....सध्या यु.के ला असते पण मनाने पक्की मुंबईकर ;)
26 Feb 2011 - 5:12 pm | सानिकास्वप्निल
वाट्या कुठल्याही चालतील :)
26 Feb 2011 - 6:26 pm | स्वाती२
मस्त!
26 Feb 2011 - 7:04 pm | कच्ची कैरी
वॉव!!!!!!!एकदम चुम्मा दिसतेय हे जे काही आहे ते ट्राय करावे लागेल.
26 Feb 2011 - 7:15 pm | रेवती
मला हा प्रकार खूप आवडतो.
पूर्वीच्या घराजवळच्या हाटेलात चांगला मिळायचा.;)
मेन्यु बदलणार होता तेंव्हा त्या लोकांना आम्हाला आधी सांगितले.
त्यांचा शेवटचा पेन्ना कोटा मला मिळाला होता......नंतर नाही.
तुम्ही दिलेला फोटू ग्रेट आलाय.
26 Feb 2011 - 9:48 pm | प्राजु
मस्तच! एका नव्या डेसर्ट ची पकृ मिळाली. धन्यवाद. :)
26 Feb 2011 - 11:13 pm | आत्मशून्य
.
27 Feb 2011 - 8:46 am | लवंगी
हे डबलक्रिम काय प्रकार आहे? व्हिपक्रीम कि हेविक्रिम? करुन पाहिन जर रासबेरी इथे मिळाली तर...
27 Feb 2011 - 10:11 pm | सानिकास्वप्निल
डबल क्रिम मध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असल्यामुळे त्याचे व्हिपक्रीम चांगले होते.
क्रिमबद्दल इथे तुम्हला जास्त माहिती मिळु शकते http://whatscookingamerica.net/Sauces_Condiments/CreamDefinitions.htm
वरच्या पाकृमध्ये तुम्ही हेविक्रिम देखिल वापरु शकता आणी हो रास्पबेरी नसेल तर ब्ल्यूबेरी ही चालतील :)