साहित्यः
१ कप दूध
१ कप डबल क्रिम
१/२ कप साखर३ टेस्पून जिलेटीन पावडर
२ टेस्पून व्हॅनिला ईसेन्स
२ टेस्पून पाणी
रास्पबेरी सॉस चे साहित्यः
२ कप रास्पबेरी
१/४ कप साखर
१/२ टेबलस्पून लिम्बाचा रस
कृति
जिलेटीन पावडर थोड्या थंड पाण्यावर भुरभुरा व ते फुलण्यासाठी ५ मिनिटे बाजुला ठेवा.
एका भांड्यात दूध, डबल क्रिम आणि साखर एकत्र करुन एक उकळी आणा.
माएक्रोव्हेव मध्ये जिलेटीन पावडर १२ सेकंदासाठी ठेवून वितळवून घ्या.
गॅस बंद करून दूधाच्या मिश्रणामध्ये व्हॅनिला ईसेन्स आणी जिलेटीन पावडरचे मिश्रण घाला व नीट एकत्र करा.
रॅमॅकिन पॉट मध्ये मिश्रण ओतून फ्रिज्मध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी ४-५ तास ठेवा.
सॉसची कृति
रास्पबेरी, साखर आणि लिम्बाचा रस एकत्र करून गॅसवर ठेवा. रास्पबेरी वितळून एकजीव झाली की गाळ्णीतून गाळून घ्या.थंड होउ द्या.
पॅन्ना कोटा ला डीमोल्ड करा एका प्लेटमध्ये. त्यावर रास्पबेरी सॉस ओता. वर रास्पबेरी आणि पुदिन्याचे पान लावुन खायला सुरूवात करा :)