"*जग साल्या जग"

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in जे न देखे रवी...
25 Feb 2011 - 3:31 pm

कधी कधी आयुष्य असच रेटत असताना अगदी थकायला होतं. आपलं aim , ambition असच
राहून जातं नि मग आतून एक आवाज येतो, तो कुणाला गुरु सारखा येतो, कुणाला
मार्गदर्शाकासारखा तर कुणाला अगदी मित्रा सारखा कि "*जग साल्या जग".*

जग साल्या जग,
अंगात रग असेल तोवर जग.
पाठीवरती घेऊन आभाळ, पुन्हा आभाळालाच बघ.....,
जग साल्या जग.

धावत जाऊन सुर्यापाशी मुठभर त्याचे तेज आण,
आणि मग जीवनाच्या ज्योतीला सांग,हवे तसे तग....,
इतका प्रचंड वेग आण नि वादळाहून तेज हो,
तुला आडवणाऱ्या पर्वतांची राख, क्षणात होईल मग....

कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना,
कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग....,
इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल,
उरलेल्या निखार्यांचीही हि आगेलाच लागेल धग.....,

काबीज कर एक एक तर नि अंतरीक्ष सारा,
डोईवर तू असशील त्यांच्या नि तुझ्या पायाखाली ढग....,
जग इतक अर्थपूर्ण कि वेदांच्या ओवीतून तू उमग,
विशाल हो इतक कि सागराच्या तहानेलाही लागेल तुझी तगमग...

जग असा होऊन निडर कि आदर्श होशील जगण्याचा,
नंतर देवही येऊन सांगेल हाच माझा खरा जिवलग.....,
जग साल्या जग... अंगात रग असेल तोवर जग.....

आंतरजालावरून साभार
जगप्रवासी

संस्कृती

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Feb 2011 - 3:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना,
कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग....,
इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल,
उरलेल्या निखार्यांचीही हि आगेलाच लागेल धग.....,

फार सुंदर आहेत या ओळी...... आवडली कविता....
कविचे नाव कळले असते तर बरे झाले असते.