तुला कसली रे एवढी घाई ?

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
23 Feb 2011 - 12:28 pm

आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ...
तुला कसली रे एवढी घाई ?

निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ...
आयुष्याची पाने मला उलटायची घाई

हसायची घाई, मला रडायची घाई ...
चार पावले चालताच मला पडायची घाई

खायची घाई, मला पिण्याची घाई ...
कोणी काही देवो, मला घेण्याची घाई

जिंकायची घाई, मला हरायची घाई ...
कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई

भेटीची घाई, मला गाठीची घाई ...
ऐन तारुण्यातच मला साठीची घाई

सवयीची घाई, मला सवयीची घाई ...
मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...

मुक्तक

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

23 Feb 2011 - 12:34 pm | नरेशकुमार

घाई घाईत एक प्रतिक्रिया देउनच टाकतो.
आवडली कविता.

निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ...
आयुष्याची पाने मला उलटायची घाई

जिंकायची घाई, मला हरायची घाई ...
कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई

ह्या दोन कडव्यातुन जीवनाप्रतीची माणसांची स्थीती एकदम जबरदस्त सांगितली आहे..
एकदम आवडले ..

---
हसायची घाई, मला रडायची घाई ...
चार पावले चालताच मला पडायची घाई

खायची घाई, मला पिण्याची घाई ...
कोणी काही देवो, मला घेण्याची घाई

या ओळी छान असल्या तरी वरील दोन कडव्याचा , अर्थाच्या प्रवाहात वेगळ्या वाटल्या...

आत्मशून्य's picture

23 Feb 2011 - 1:45 pm | आत्मशून्य

दीसत नाही.

कच्ची कैरी's picture

23 Feb 2011 - 2:14 pm | कच्ची कैरी

घाई घाईत कविता वाचली काय प्रतिसाद द्यावा सुचत नव्हते पण मलाही प्रतिसाद देण्याची घाई तेव्हा घाई घाईत देऊनच टाकला .

कवितानागेश's picture

24 Feb 2011 - 1:08 pm | कवितानागेश

.... अजिबात घाई न करता वाचले...
मुक्तक आवडले.