कागद म्हणतो लिहा ,
लेखणी म्हणते लिहा,
दौतीतली शाई म्हणे
लिहा लिहा अन लिहा
काळजातल्या तक्रारी
फुंकर मागतात,
अंधारातले कोपरे
उजेड मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा
अवघडलेले शब्द
वाटा मागतात,
नेहमीच्या वाटा
बदल मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा.
मन म्हणते मला सुचत नाही,
गाणे म्हणते तुला जमत नाही,
कोणी म्हणे ताल नाही,
कोणी म्हणे चाल नाही,
तरीही,
लिहा लिहा अन लिहा.
प्रतिक्रिया
18 Feb 2011 - 4:37 pm | प्रकाश१११
अभिजित -[बंड्या ]
काळजातल्या तक्रारी
फुंकर मागतात,
अंधारातले कोपरे
उजेड मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा
आवडले. छान मस्त !!
18 Feb 2011 - 5:19 pm | नरेशकुमार
लिहा लिहा अन लिहा.
बरं बरं, लिहितो एक प्रतिसाद.
18 Feb 2011 - 6:58 pm | कच्ची कैरी
बिचारा फ्रॅ़क्चर बंड्या आहे तरी म्हणे लिहा मग शब्द अवघडतीलच ना ?त्याचा फ्रॅ़क्चर ठीक होउ द्या मग त्याला लिह म्हणा .
21 Feb 2011 - 9:18 am | फ्रॅक्चर बंड्या
धन्यवाद प्रकाशजी..
@कैरी : होईल फ्रॅक्चर दुरुस्त हळुहळु..
21 Feb 2011 - 7:47 pm | गणेशा
मस्त एकदम ..
कविता आवडली .. येवुद्या आणखिन
22 Feb 2011 - 5:25 pm | प्रास
.... अगदी हेच म्हणतो मी......