तोतयांची, फक्त...

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
13 Feb 2011 - 7:40 pm

कापल्या गेल्यांवरी तर मदार होती
तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती

समजले नाही मने करपली कशाने ?
सूर्य होता माजला की दुपार होती....

नाचली होतीस तू थयथया कशाला ?
हाक प्रेमाची जराशी... चिकार होती

उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती
माणसांची त्या वयेही उतार होती

'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती

तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ?
साधनेला वेदनेची किनार होती

गझल

प्रतिक्रिया

समजले नाही मने करपली कशाने ?
सूर्य होता माजला की दुपार होती....

आवडली द्विपदी.

मुलूखावेगळी's picture

13 Feb 2011 - 10:15 pm | मुलूखावेगळी

कविता सहज कधी नव्हे ते वाचली
आवडली
पण कोणाला उद्देशुन आहे प्रेयसीला का?
भाउसाहेब पाटण्कर टाईप वाटतेय

टारझन's picture

15 Feb 2011 - 3:54 pm | टारझन

भाउसाहेब पाटण्कर टाईप वाटतेय

सहमत ... पाटण्कर काढा प्यायल्या सारखे वाटले ..

समजले नाही मने करपली कशाने ?
सूर्य होता माजला की दुपार होती....

शेर जबर्या हाय भाउ

प्राजु's picture

15 Feb 2011 - 10:33 pm | प्राजु

तुफ्फान आहे गझल. :)

अजय जोशी's picture

15 Feb 2011 - 11:38 pm | अजय जोशी

पाटण्कर काढा...! हा हा हा
विनोद छान आहे. मात्र तुलना चुकली आहे.