न लगे कोठे, शोधे तुज माझे मन
न दिसे काही, दिसे तुझे ते नयन
तु नाही तर कुठे आहे सागर
तु नाही तर कुठे आहे तरंग
एक एक थेंब वाहतो जसा
वाट पहाते तुझी माझे जीवन
न लगे कोठे, शोधे तुज माझे मन...
तु नाही तर कुठे आहे सुख
तु नाही तर कुठे आहे चैन
एक होण्यास धावते बरोबर
नदी काठ होते जसे बेचैन
न लगे कोठे, शोधे तुज माझे मन..
तु नाही तर कुठे आहेत तारका
तु नाही तर कुठे आहे आसमंत
क्षितिजा वर मिळेल धरा जणू
मज मिळेल का तुझे आलिंगन
न लगे कोठे, शोधे तुज माझे मन
न दिसे काही, दिसे तुझे ते नयन....!!