आठवण...( की विसर??)

हरिप्रिया_'s picture
हरिप्रिया_ in जे न देखे रवी...
11 Feb 2011 - 1:17 pm

माझा हा मिपा वरील पहिलाच प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकण्यास उत्सुक आहे..
तुम्हा दिगज्ज लोकांकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती

निशब्द रात्री जेव्हा जागून निघतात,
आणि आपण पाहिलेलीच स्वप्न जेव्हा आजूबाजूला पिंगा घालू लागतात,
कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते...

जुनेच message जेव्हा नव्याने वाचते,
जुनेच क्षण आठवून जेव्हा एकटीच हरवते,
कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते...

डोळ्यांच्या कडा जेव्हा ओल्याच राहतात,
अर्धवट स्वप्नातही तुलाच पहिल्याचा दावा करतात,
कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते...

आता मीही शिकणार आहे माझ्या मनाला दगड बनवायचं,
तुझ्या सारखाच न बोलता सार विसरून जायचं,
पण कस सांगू तुला ,
तेव्हा पण तुझीच आठवण अनावर असते..

एकच सांग नि एकदाच सांग,
तुला आशी अनावर आठवण कधी येतच नाही का रे??

कविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

11 Feb 2011 - 1:22 pm | टारझन

आपल्यात उत्तम कविता करण्याची ताकद दिसली.

- (दिग्गज ) प्रियागोल्ड
इंजमाम-उल- हक से मांगो !

कविता छान जमली आहे, त्यातील भाव खोल आहेत..
असेच लिहित रहा ..

अवांतर : दिग्गज वगैरे कोणी नसते, अनुभवाने प्रत्येक जण स्वताच्या आयुष्यात स्वतापुरता दिग्गज होत असतो...

कच्ची कैरी's picture

11 Feb 2011 - 2:09 pm | कच्ची कैरी

गणेशा यांच्याशी पूर्णपणे सहमत .तुमच्या अजुन कविता वाचण्यासाठी उत्सुक !