आज आमच्या लग्नाच्या २र्या anniversary निमित्त मी हा केक केला होता. तशी ही recipe खुप मोठी असल्यामुळे मी step by step फोटो सहित पा़कृ लिहित आहे.
साहित्यः
स्पाँज केक - १
चॉकलेट क्रिम - २ पाकिट
मिक्स फ्रुट जॅम - १ छोटा डबा
Marzipan (बदाम-साखर ची पेस्ट)
Cornflour - ३ चमचे
कृति :
१. नेहमीच्या तुमच्या पद्धतीने १ स्पाँज केक करुन घ्यावा. केक आद्ल्या दिवशी करुन ठेवल्यास जास्त चांगले कारण तो पुर्णपणे गार होतो.
२. केकचे आडवे २ भाग करुन घ्यावेत.
३. हल्ली बाजारात रेडी chocolate cream ची पाकीटे मिळतात. त्या पाकीटा वरील सुचनां प्रमाणे chocolate cream बनवुन घ्यावी. केक च्या एका भागाला ही cream लावावी.
४. केकच्या दुसर्या भागाला मिक्स फ्रुट जॅम लावावा.
५. हे दोन्ही भाग एकमेकांवर लावावे.
६. संपुर्ण केकला परत एकदा वरतुन सगळ्या बाजुने जॅम लावावा.
७. बाजारात मिळणारा marzipan आणुन त्याची पराठ्याच्या जाडीची पोळी लाटुन घ्यावी.
८. ही पोळी केक वर अलगद ठेवुन त्यास नीट केकच्या आकारानुसार कापुन घ्यावे.
९. ह्या marzipan ची वेगवेगळ्या रंगांची, आकाराची फुले व पाने करुन घ्यावीत. हे करताना marzipan हाताला चिटकत असल्यास cornflour चा वापर करावा. ही फुले व पाने करुन झाल्यावर फ्रिज मधे कमीत कमी १ तास ठेवावीत.
१०. सगळ्यात शेवटी ही फुले व पाने वापरुन केक सजवावा.
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 3:49 am | स्वाती२
मृणालिनी, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मस्त दिसतोय केक.
11 Feb 2011 - 4:07 am | Mrunalini
धन्यवाद :)
11 Feb 2011 - 4:28 am | वडिल
दोघानांहि अनेक शुभेच्छा. आता समजलं येवढ्या भारी-भारी रेसीपी रोज का करणं चालु आहे. आता काय पुढच्या वर्षि मोठा केक करावा लागणार ! त्यासाठि आत्ताच कॉन्ग्रॅटस !
निशांतराव लक्क्क्की आहेत ! रोज नुसती मज्जा चालु आहे.
11 Feb 2011 - 4:37 am | Mrunalini
हा हा हा... आहो नाही, मी तसे रोजच कय कय बनवत असते. कारण मला करायला आवडते आणि निशांतला खायला. ;)
11 Feb 2011 - 4:44 am | वडिल
तुम्हाला करायला आवडते हे बरं !
पण ह्यात त्याचा हि वाटा आहेच कि.
11 Feb 2011 - 4:48 am | nishant
आत्ता पर्यन्तचे फोटो आवडल्या बद्ल धन्यवाद :)
11 Feb 2011 - 4:49 am | Mrunalini
हो, ते तर आहेच.
11 Feb 2011 - 10:18 am | लवंगी
केक मस्तच
11 Feb 2011 - 4:17 am | बेसनलाडू
फोटो आणि क्रमवार कृती दोन्ही मस्त!
(खवय्या)बेसनलाडू
अॅनिवर्सरीनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू
11 Feb 2011 - 4:30 am | धनंजय
हार्दिक शुभेच्छा!
छान दिसते आहे सजावट.
(ज्यांना मार्झिपान मिळत नाही, ते हलवायाकडून बदामाची बर्फी किंवा काजूकतली आणून त्याचा गोळा करून/तिंबून/लाटून वापरू शकतील. ज्यांना घरी बदामाची बर्फी किंवा काजूकतली करता येते, त्यांना हे प्रकार हलवायाच्या दुकानातून आणायची गरज नाही.)
11 Feb 2011 - 4:34 am | Mrunalini
सगळ्यांचे धन्यवाद. :)
11 Feb 2011 - 4:35 am | शुचि
अगं मृणाल पण तो स्पाँज केक आणि ती बदाम पेस्ट, जॅम, चॉकोलेट सिरप वेगवेगळे खाता नसते आले का? एवढं करण्यापेक्षा
खी: खी:
गंमत ग. मस्तच आहे अल्टीमेट अशी बायको मिळाली की नवर्यावर एक प्रकारचा "गुणांचा" दबावच येत असावा . आमच्याकडे बघ कसं आहे नाहीतर दबाव सोडच वर नवर्याला तोंड सोडायला वाव मिळेल असं अगदी "नो प्रेशर" वातावरण आहे. ;)
11 Feb 2011 - 4:40 am | Mrunalini
हा हा हा... :)
11 Feb 2011 - 4:52 am | Mrunalini
Thank u all.
11 Feb 2011 - 5:09 am | गणपा
दोघांनाही हार्दीक शुभेच्छा !!!
आवांतर : केक मात्र अगदी ए१ दिसतोय. :)
11 Feb 2011 - 5:24 am | शुचि
>> केक मात्र अगदी ए१ दिसतोय.
अहो तो केक नाही रांगोळी आहे ;)
मृणाल आनि निशांत दोघांनाही शुभेच्छा.
11 Feb 2011 - 5:45 am | वडिल
काहिंना केक दिसतो... काहिंना रांगोळी.
गणपाला स्वयपाकघरातुन बाहेर काढला शेवटी आपल्या मिपावरच्या "काहि" कुशल गृहिणींनी !
गणपा साहेब आता लागा तुमच्या क्रिकेटच्या कामाला. ह्या पिच वर आता तुमची विकेट पडली.
( दिवा घेणे)
अवांतरः मराठि तुन वर्ल्ड कप चे पुर्ण स्केड्युल मिपावर टाकल्या बद्दल धन्यवाद.
11 Feb 2011 - 7:07 am | विंजिनेर
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
बाकी, काही वडिलधार्या मंडळींची लवकरच विकेट पडणार आहे असे ऐकले त्यामुळे फार हाफ व्हॉलीज् खेळू नयेत एखादा यॉर्कर निघायचा :)
11 Feb 2011 - 10:17 am | लवंगी
:)
11 Feb 2011 - 10:28 am | प्यारे१
गणपाभौ,
येत्या शनि अमावस्येला रात्री १२ वाजता दहीभाताची एक मूद जुन्या पिंपळाच्या पारावर ठेव रे....
त्यातूनही नाही ऐकलं तर बघू .शांती करुनच घ्यायला हवी.
लईच मागं लागलंय रे.
15 Feb 2011 - 8:16 pm | धिन्गाना
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.केक खाउन निशान्त चा चेहरा अगदि त्रुप्त दिसतो आहे.छान छान.
11 Feb 2011 - 5:30 am | नंदन
पाककृती अप्रतिम! (पण मुळातच स्पाँज केकपासून सुरुवात असल्याने पाककलेतल्या पोस्ट-ग्रॅज्वेट लेव्हलची वाटते आहे :)).
अॅनिव्हर्सरीच्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा!
11 Feb 2011 - 5:54 am | प्राजु
लय भारी दिसतोय केक.
एक प्रश्न.. खूप गोड होतो का हा केक. म्हणजे शुगर क्रीम ने आयसिंग करावे तसे होते का?
मार्सिपान कुठे मिळेल?? फ्रोजन असते का? की बेकिंग सेक्शन मध्ये मिळेल?(एक म्हणता म्हणता ३ प्रश्न झाले.. उप्स!)
तुम्हा दोघांचा फोटो मस्त आला आहे.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
11 Feb 2011 - 6:07 am | Nile
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :-)
(पाककृतीतले सुंदर फोटो पाहिलेले नाहित तसेच स्टेप बाय स्टेप दिलेली कृतीही वाचलेली नाही!)
11 Feb 2011 - 8:02 am | ५० फक्त
म्रुणालिनिशांत, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
केक बद्दल तर, जाम आणि चॉकलेट लावुन ठेवणे या पुढे मी काहिहि करु शकणार नाही,त्यानंतर फक्त रिकाम्या खरकट्या प्लेटचा फोटो टाकावा लागेल.(अर्थात हे एवढे मि केलं तर..)
म्रुणालिनि तुझं हे करण्याबद्दल जेवढं कॉतुक आहे त्यापेक्षा निशांतचं संयमानं फोटो काढण्याबद्दल जास्त आहे. आमच्याकडे पदार्थ झाल्यावर खाण्यासाठी वेगळा आणि करताना खाण्यासाठी वेगळा बनवावा लागतो.
बाकी, आपल्या स्वाक्ष-या जुळतात त्यामुळे आपल्या तरंगलांबी पण जुळतील असं वाटतंय.
11 Feb 2011 - 8:13 am | निवेदिता-ताई
दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अग पण marzipan ची पोळी लाटून लावल्यावर परत बेक करायचा का....
(अडाणी निवू)
11 Feb 2011 - 8:28 am | चित्रा
ह्या marzipan ची वेगवेगळ्या रंगांची, आकाराची फुले व पाने करुन घ्यावीत.
हे म्हणणे किती सोपे आहे! पाने-फुले केली आहेत भारी, तेव्हा कशी करायची तेही लिहा :)
दोघांना अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा.
11 Feb 2011 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार
दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
कधितरी आम्हाला गिळायला देखील बोलवा. नाहितर ऐनवेळी तुमचा कुकिंग गॅस संपेल आणि फोटोचा रोल खराब होईल असा शाप देतो ;)
हे घ्या इथे सगळे शिकता येईल.
आणि इथे देखील.
ह्यावरुन मध्ये इमेल मधुन फिरत असलेल्या मार्झिपान बेबीजची आठवण आली.
अजुन काही निवडक चित्रे.
11 Feb 2011 - 6:10 pm | गणपा
हे फोटु पाहुन टिंग्याची आठवण झाली.
दिसला नाही बरेच दिवसात.
11 Feb 2011 - 8:27 pm | सूर्यपुत्र
मागे एकदा कोणत्यातरी लेखात असे वाक्य होते : कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली
त्यात जी पोरं घातली होती, ती मर्झिपान बेबीज होती ना? सजावटीसाठी वापरलेली?
आणि हे बेबीज एवढे खरे दिसताहेत, की खर्या-खोट्यातील फरक करतां येणे अशक्य झाल्यामुळे ब्राह्मण पळून गेले.समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.
आता एवढी सुंदर पाककॄती (आणि कलाकॄती) बघितल्यानंतर श्री दत्तस्वरूपांची काय बिशाद खूष न होण्याची? दर्शन न देउन सांगतील कोणाला?
मॄणालिनी आणि निशांत यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
-सूर्यपुत्र.
11 Feb 2011 - 8:41 pm | सेरेपी
खी: खी: खी:
मॄणालिनी आणि निशांत यांना लग्नाच्या दुसर्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
केक छान.
11 Feb 2011 - 9:03 pm | प्रियाली
परा कलन,
मार्झिपानची असली तरी खाववणार नाहीत बॉ! ;) भारी गोंडस आहेत.
11 Feb 2011 - 9:15 am | प्यारे१
तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू पाकृंच्या माळा....
बाकी निशांतला खायला आवडते म्हणता पण तसे वाटत नाहीये फोटो बघून.
उलट निशांत तुम्हाला खायला घालत असावा असे वाटते आहे. (ह.घ्या.)
-अर्धा टनी प्रशांत. (प्यारे)
11 Feb 2011 - 10:09 am | स्पंदना
फुल पान खुप आवडली, कलर्स तर अतिशय सुन्दर.
अन हो अॅनीवर्सरीच्या शुभेच्छा!! गोड दिसताय दोघेही!!
11 Feb 2011 - 11:15 am | कच्ची कैरी
सगळ्यात आधी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
केक एकदम ५ स्टार झाला आहे ,तु सुगरणच दिसतेस बाई !
11 Feb 2011 - 11:39 am | पिंगू
मृणालिनी आणि निशांत दोघांना लग्नाच्या द्वितिय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
कधी मायदेशी परत आल्यावर मजसाठी केक पार्टी जरुर ठेवा.. :)
- पिंगू
11 Feb 2011 - 12:32 pm | स्वाती दिनेश
केकची सजावट छान दिसते आहे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
स्वाती
11 Feb 2011 - 12:48 pm | यशोधरा
मृणालिनी, अॅनिव्हर्सरीच्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा! :)
केक भारी आणि त्यावरची सजावट तर मस्तच आहे! ही फुलं वगैरे कशी बनवली? त्याचेही बनवताना स्टेप बाय स्टेप फोटो टाका की. :) मला बघायला आवडेल, करण्याइतका पेशन्स नाहीये! :P
11 Feb 2011 - 3:31 pm | Mrunalini
सगळ्यांचे खुप खुप आभार.
@प्राजु - अग हे marzipan साधारण केक decoration चे जिथे साहित्य असते, तिथे मिळेल. हे फ्रोजन नसते.
@निवेदिता-ताई : marzipan लावल्यावर केक बेक नाही करायचा. marzipan हा ready to use असतो. मर्झिपन म्हणजे, बदामाची पावडर आणि साखर याची पेस्ट असते. त्यामुळे बेक करायची गरज नाही.
marzipan ची फुले व पाने कशी बनवायची याचे फोटो टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल. तसे, ही पाने व फुले, साधारण एखाद्या पॉट वर आपण ceramic ची फुले करतो, तशीच करायची आहेत. तरी मी ही एक youtube ची link देत आहे. ती बघुन तुम्ही try करु शकता.
" title="flowers">
11 Feb 2011 - 3:49 pm | Mrunalini
सगळ्यांचे खुप खुप आभार.
@प्राजु - अग हे marzipan साधारण केक decoration चे जिथे साहित्य असते, तिथे मिळेल. हे फ्रोजन नसते.
@निवेदिता-ताई : marzipan लावल्यावर केक बेक नाही करायचा. marzipan हा ready to use असतो. मर्झिपन म्हणजे, बदामाची पावडर आणि साखर याची पेस्ट असते. त्यामुळे बेक करायची गरज नाही.
marzipan ची फुले व पाने कशी बनवायची याचे फोटो टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल. तसे, ही पाने व फुले, साधारण एखाद्या पॉट वर आपण ceramic ची फुले करतो, तशीच करायची आहेत. तरी मी ही एक youtube ची link माझ्या ब्लॉग वर देत आहे. ती बघुन तुम्ही try करु शकता.
11 Feb 2011 - 4:00 pm | टारझन
मृणालिणी , तुमच्यात चांगला केक बनवायची ताकद दिसली !
11 Feb 2011 - 4:40 pm | प्राजक्ता पवार
केक अप्रतिम !
अॅनिव्हर्सरीच्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा!
11 Feb 2011 - 5:34 pm | चिगो
वेगळा केक.. मस्त वाटतोय..
तुम्हां दोघांनाही लग्नाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
(केकावलेला) चिगो
11 Feb 2011 - 7:30 pm | रेवती
केकचे फोटू आवडले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!