मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Marzipan केक (2nd anniversary special)

Mrunalini · · पाककृती
आज आमच्या लग्नाच्या २र्‍या anniversary निमित्त मी हा केक केला होता. तशी ही recipe खुप मोठी असल्यामुळे मी step by step फोटो सहित पा़कृ लिहित आहे. साहित्यः स्पाँज केक - १ चॉकलेट क्रिम - २ पाकिट मिक्स फ्रुट जॅम - १ छोटा डबा Marzipan (बदाम-साखर ची पेस्ट) Cornflour - ३ चमचे कृति : १. नेहमीच्या तुमच्या पद्धतीने १ स्पाँज केक करुन घ्यावा. केक आद्ल्या दिवशी करुन ठेवल्यास जास्त चांगले कारण तो पुर्णपणे गार होतो. Image removed. २. केकचे आडवे २ भाग करुन घ्यावेत. Image removed. ३. हल्ली बाजारात रेडी chocolate cream ची पाकीटे मिळतात. त्या पाकीटा वरील सुचनां प्रमाणे chocolate cream बनवुन घ्यावी. केक च्या एका भागाला ही cream लावावी. ४. केकच्या दुसर्‍या भागाला मिक्स फ्रुट जॅम लावावा. Image removed. ५. हे दोन्ही भाग एकमेकांवर लावावे. ६. संपुर्ण केकला परत एकदा वरतुन सगळ्या बाजुने जॅम लावावा. Image removed. ७. बाजारात मिळणारा marzipan आणुन त्याची पराठ्याच्या जाडीची पोळी लाटुन घ्यावी. Image removed. Image removed. ८. ही पोळी केक वर अलगद ठेवुन त्यास नीट केकच्या आकारानुसार कापुन घ्यावे. Image removed. ९. ह्या marzipan ची वेगवेगळ्या रंगांची, आकाराची फुले व पाने करुन घ्यावीत. हे करताना marzipan हाताला चिटकत असल्यास cornflour चा वापर करावा. ही फुले व पाने करुन झाल्यावर फ्रिज मधे कमीत कमी १ तास ठेवावीत. Image removed. १०. सगळ्यात शेवटी ही फुले व पाने वापरुन केक सजवावा. Image removed.

वाचन 14379 प्रतिक्रिया 0