मस्त कथा. शेवटपर्यंत उत्कंठा टिकून राहिली.
वाचताना मधे वाटले होते की बसमध्येही कोणी नसेल (बिनाचालक).
पण पूर्ण कथा वाचल्यावर मग वाटले चालकही नसता तर कथा उगीच लांबली असती. :)
कथा वेगळ्या प्रकारची आहे आणि मस्तच खुलवली आहे.
----------------------------------------------------------------------
अवांतर :-
कलाटणी देणे अवघड असते हे मान्य असून देखिल एक दिलखुलास सुचवणी...:-)
सकाळी झोपेतुन जागे झाल्यावर आपण दुसर्याच कोणत्या तरी घरात आहोत ही कल्पनाच इतकी भयानक आहे की असे झाल्यास हे सगळे विसरून त्याच घरात चहा वगैरे करण्यासाठी स्वयपाकघर धुंडाळणे म्हणजे (मला) जरा अतीच वाटले. ह्या सारखे संदर्भ टाळले असते तरी कथा तितकीच उत्कंठावर्धक झाली असती पण मूळ कथेतच हे जसेच्या तसे असेल तर नाईलाज हे ही खरे.
आपण दुसर्याच कोणत्या तरी घरात आहोत ही कल्पनाच इतकी भयानक आहे की असे झाल्यास हे सगळे विसरून त्याच घरात चहा वगैरे करण्यासाठी स्वयपाकघर धुंडाळणे म्हणजे (मला) जरा अतीच वाटले.
मला तरी ह्यात अतीच वगैरे काही वाटले नाही. कथेतल्या सीमाच्या जागी जर आमची प्रियाली असती तर तिने फक्त चहाच काय, मस्तपैकी मच्छीचं जेवणबिवण बनवलं असतं! :))
>>कथेतल्या सीमाच्या जागी जर आमची प्रियाली असती तर तिने फक्त चहाच काय, मस्तपैकी मच्छीचं जेवणबिवण बनवलं असतं! :))
तात्या, सीमाच काय तुमची साधना कोळीण असती तरी मच्छीचं जेवण बनवू शकली नसती हो.. फडताळाची सगळी दारं घट्ट बंद होती हे विसरलात काय?? :-)
कलाम साहेबांच्या केशरचने व्यतिरीक्त आता आपल्याला असहमतीसाठी आणखी एक पॉइंट मिळाला बघा :-))
मूळ कथेत अशा टाइपचा सीन होता असे आठवते. म्हणजे चहा बिहा भारतीयकरण झाले पण ते दोघे किचनचे ड्रॉवर्स उघडतात इ. इ. काय आहे की वाचकांना कथा असल्याने काहीतरी होणार अशी धास्ती आहे ती त्या दोघांना तोपर्यंत तेवढी नाही. ते प्रवास करत होते, कोणाच्यातरी घरात सुखरुप आहेत. घरही व्यवस्थित आहे. (म्हणजे भूतबंगला इ. नाही. मॉडर्न, प्रशस्त, सूर्यप्रकाशाने भरलेले) त्यामुळे खूप भीती त्यांच्या मनात नाही. आता या पुढची गोष्ट म्हणजे...
नवरा जर सकाळी उठून म्हणाला "ह्यँगओवर! चहा दे तरतरी येईल." तर बिचारी बायको कोणत्याही परिस्थितीत चहा देईल. दिवसभर चिडचिड, कटकट कोण ऐकणार? ;-)
काय आहे की वाचकांना सतत कथेतील रहस्य दाखवून देण्याचा प्रकार आहे. चिकटवलेले ड्रॉवर्स म्हणजे फक्त सेटसाठी बनवलेले, दुकानातले रिकामे पुडे - पेरिशेबल फूडमुळे तयार केलेली प्रॉपर्टी... यांतून वाचकांना हा चित्रपटाचा सेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न. ;-) वास्तववादी विचार केला तर मात्र हे असे चहा करतील का? किंवा भली चांगली माणसं दुकानातून चोरी करतील का? हे प्रश्न स्वाभावीक आहेत. :)
गोष्ट छानच आहे. राम गोपाल वर्मांसाठी नाही तरी निदान बीएमएम च्या एकांकीका स्पर्धेसाठी याचे नाट्यरुपांतर करता आले तर पहा. नक्कीच यशस्वी होईल. माहीती हवी असल्यास कळवा.
काय दिल्ली सफर केली वाटत डीटीसी मधून ;} नाही केली तर एकदा करुन पाहाच.
एक मात्र गोष्ट तुमची मला आवडली तुम्ही वाचकांना कथेचा एक भाग बनवता व वाचकाला असे वाटते की कथा नायक / नायिका ह्यांच्या मागे मागे तो देखील हे सर्व पाहत फिरत आहे.... उदा. "समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.
" हे वाक्य वाचले रे वाचले तो सीन [चित्र] डोळ्यासमोर येते व असे वाटते की रवी व सीमा दोघे बस कडे पाहत आहेत व मी त्यांच्या मागून त्यांना व त्या बस ला पाहत आहे, ह्यातच तुमच्या लेखनाचे यश सामावलेले आहे, अभिनंदन.
राजे
(*हेच राज जैन आहेत व ह्यांना ही कथा खुप ... खुप....... खुप X १००० वेळा आवडली आहे) माझे शब्द....
कथा भयानक आवडली. का आवडली हे सांगता येणार नाही. बांधणी उत्तम आहे, उत्कंठा कायम ठेवली आहे, अप्रतिम कलाटणी वगैरे कारणे द्यायची असतातच. पण मला प्रियालीचे लेखन आवडते. ( मी आणि प्रियाली एकाच कंपूतले आहोत, हे काही कारण झाले नाही. )
प्रियालीताई, इतिहासावर आधारित एखादी भयकथा आल्यास अधिकच मजा येईल. विचार करा.
मंगल पांडे त्याच्या कोठडीत गपचिप पडला होता. तेवढ्याअत इंग्रजाच्या एका भुताने त्याला गोळी मारली. गोळीत गायीची चरबी आहे, असे त्याला वाटले.. आणि अगागा , मेलो मेलो असे म्हणत तो उठला..
(ते स्वप्न होते, हे लक्षात आले लगेच, कारण सर्व*क्षी चा लेख वाचूनच मंगल झोपला होता.... अशी भीतिदायक स्वप्ने त्यानेच पडतात...)
- (स्वातंत्र्यसैनीक, नव्हे स्वातंत्र्यसेनापती) सर्किट
कथेला प्रतिसाद देणार्या सर्वांचे विशेषतः मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपूगिरी अबाधित ठेवून आपल्याच कंपूतील लोकांना भरघोस प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
विकास,
बीएमएमला पाठवण्यासारखी गोष्ट तयार आहे का याबाबत साशंक आहे पण कथाबदलाबाबत तुमची सुचवणी मात्र नक्कीच वाचायला आवडेल.
सर्किट,
तुम्ही एक स्वतंत्र भयकथा, गूढकथा लिहाच. तशी फार गरज नाही म्हणा, आयपी शोधतो सांगितले की सगळे आपोआप टरकतील. ;-)
विशेषतः मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपूगिरी अबाधित ठेवून आपल्याच कंपूतील लोकांना भरघोस प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हा हा हा! 'मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपुगिरी' हे शब्द आवडले..
थोडक्यात कंपुगिरीचे मूळ मनोगतात आहे हे सांगितलेस ते बरे झाले. मनोगतावर प्रथमत: कंपुगिरी सुरू केली ती आमच्या विन्याने! मी कंपुगिरी करायला त्या फोकलिच्या विन्याकडूनच शिकलो! :))
मस्त पकड घेत होती ('आहट' मध्ये वगैरे व्हायचे तसे ;)); शेवट कळल्यानंतर मात्र 'फुस्स' अशी प्रतिक्रिया झाली (कदाचित हेच अपेक्षित होते का प्रियाताई?)
प्रियाताईकडून यापेक्षा सुरस भयकथा वाचायची सवय झाल्याने ही कथा तितकीशी आवडली नाही :( ('शेवटाच्या' आधीचा भाग वगळता) 'इच्छा'च्या वेळी पण माझी अशीच काहीशी प्रतिक्रिया झाली होती.
(अपेक्षाबाज)बेसनलाडू
>>शेवट कळल्यानंतर मात्र 'फुस्स' अशी प्रतिक्रिया झाली (कदाचित हेच अपेक्षित होते का प्रियाताई?)
हो! तेथेच कलाटणी होती. :)
>>'इच्छा'च्या वेळी पण माझी अशीच काहीशी प्रतिक्रिया झाली होती.
काय दुष्ट माणूस आहेस!!! प्रत्येक गोष्टीत कोणीतरी 'भगवान को प्यारा' व्हायला हवा का? :)) असो, असा अपेक्षाभंग होणार हे माहित असल्यानेच वर 'गोष्टीतून फार अपेक्षा ठेवू नये ' असे लिहिले होते. :-)
उपक्रमावर हिचकॉकच्या लेखात एक वाक्य होते: रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का आपल्या कपाळावरून हिचकॉकला कधीही पुसता आला नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "मी सिंड्रेला चित्रपट निर्माण केला तरी प्रेक्षक कोचावर मृतदेह दिसतो का ते धुंडाळतील.”
माझ्या ब्लॉगवरही एक दोघांचा असा अपेक्षाभंग जाणवला. प्रियाताई स्वतःला हिचकॉकच्या पंक्तीत बसवत नाही बॉ! पण टाईपकास्ट तरी नको. ;-)
प्रियाताई स्वतःला हिचकॉकच्या पंक्तीत बसवत नाही बॉ! पण टाईपकास्ट तरी नको. ;-) वेगासचे वर्णन, शिल्पचित्रांची मांडणी, हिचकॉक, फ्लाइंग डचमन वरचे लेख, मासळीवरील तात्यांच्या लेखाला आणि इतरत्रही दिलेले अनेक प्रतिसाद लक्षात घेतले, तर टाइपकास्टिंगची चिंता निदान तू तरी करू नयेस प्रियाताई. पण भयकथा लिहिण्याच्या बाबतीत तुझा आणि काही अंशी अनुताईचा हात धरू शकणारे कमीच नाही का ;) त्यामुळे असे रामू वर्मा / आहट टाइप वातावरणनिर्मिती करणारे काही वाचले की आमचे डोके थरारक शेवटाच्या दृष्टीनेच तयारी करू लागते. याला तू हवे तर आमच्या डोक्याचे (लिमिटेड) टाइपकास्टिंग समज, तुझ्या लेखनाचे नाही. असो.
(टाइपकास्टेड)बेसनलाडू
नाही. फक्त टिंब तेवढी दिसत आहेत. Proxy आणि Proxy शिवायही पाहिल, वेगळ्या browser ने पण पाहिलं तरी काही दिसत नाही.
जुनी गोष्ट 14 Apr 2016 - 5:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा वर सर्व सदस्यांना लेखन प्रतिसाद संपादनाची सुविधा होती. किरकोळ कारणावरुन मिपावर काही सदस्यांचे पटायचं नाही आणि मग रागाच्या भरात मिपाकरांनी आपले लेखन काढून टाकले. आणि शीर्षकात टिंबटिंब भरून ठेवले.
काही मिपाकर चांगले लिहायचे त्यांना वाटलं की आपण मिपा सोडून गेलो आणि लेखन काढून टाकले की मिपा बंद पडेल. आता काय सांगायचं ! आपल्या देशाला स्वांतन्त्रय मिळाल आणि पंतप्रधान नेहरू नंतर या देशाचं कसं होईल असे प्रश्न लोक विचारायचे देशाचे तब्बल पंधरा पंतप्रधान झालेत, देश अतिशय गुण्या गोविंदाने चालु आहे. मिपाचं तसच आहे, लोक येतील जातील. मिपा अवह्यातपणे चालू राहील.
वरील कोणी आयडी स्री की पुरुष मिपावर होता, हेही मी विसरून गेलो आहे.
मला दिसली नाही म्हणूनच तर मी प्रतिसाद टाकून २००७ चा धागा वर आणला. आता एस यांनी एक दुवा दिलाय, तो दिसतो.
बाकी तुम्ही नेमके काय पुण्य केले ज्यामुळे तुम्हाला कथा दिसत आहे :)
कथा वाचली .आवडली .
ज्यांना ही कथा दिसत नाही , त्यांच्यासाठी ...
कथेचे शिर्षक = तीन टिंबं[ ... ]
कथा थोडक्यात अशी ...
एकदा तीन टिंबं होती ... एक टिंब म्हणालं , " काय रे टिंबू ? ... " दुसरं टिंब म्हणालं , " काय म्हणतोस रे हिंबा टण्या ? " तिसरं म्हणालं , " आपण काही म्हणायला नको बाबा !आधीच आपण आहोत लिंबू -टिंबू . उगीचच भांडणं व्हायची . "
.
.
.
आणि मग शेवटी तिन्ही टिंबं सुखाने एकत्र राहू लागली .
प्रतिक्रिया
7 Oct 2007 - 3:24 am | धनंजय
कलाटणी एकदम फिट्ट.
7 Oct 2007 - 4:59 am | चित्रा
उत्कंठावर्धक झाली आहे. शेवटही जमला आहे.
7 Oct 2007 - 5:09 am | नंदन
कथा आणि कलाटणी. रुपांतर चांगले झालेय.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
7 Oct 2007 - 7:12 am | प्रियाली
तसं रुपांतरच आहे पण ही कधीतरी पाहिलेली मूळ कथा अगदी अमेरिकन वळणाने जाणारी विज्ञानकथा होती. म्हणजे परग्रहावरील माणसे-बिणसे.
7 Oct 2007 - 7:27 am | सहज
माझी जरा जास्त झाली असल्याने ट्यूब लगेच पेटली नाही. नक्कीच मजा आली.
--------------------------------
अहो गुढवादी, आपला भाग्यांक ७ आहे का?
7 Oct 2007 - 8:36 am | प्राजु
प्रियाली,
सही एकदम..! सुरूवातीला वाटलेच होते की शेवट गमतीदार असणार... पण छान झाली आहे कथा... खूप आवडली..
- प्राजु.
7 Oct 2007 - 12:27 pm | देवदत्त
मस्त कथा. शेवटपर्यंत उत्कंठा टिकून राहिली.
वाचताना मधे वाटले होते की बसमध्येही कोणी नसेल (बिनाचालक).
पण पूर्ण कथा वाचल्यावर मग वाटले चालकही नसता तर कथा उगीच लांबली असती. :)
7 Oct 2007 - 9:28 am | विसोबा खेचर
मस्त टाईमपास कथा..
भूलनगरी, भुताटकी....! हम्म! म्हणजे इट सीम्स प्रियाली बॅक इन ऍक्शन! :)
तात्या.
7 Oct 2007 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कथा.
जर त्या चंदू ने खूलासा केला नसता तर आमच्या -हदयाच्या ठोक्यांनी वेग घेतलाच होता ! :)
झक्कास बरं का ! शेवट सहीच आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
7 Oct 2007 - 10:00 am | कोलबेर
कथा वेगळ्या प्रकारची आहे आणि मस्तच खुलवली आहे.
----------------------------------------------------------------------
अवांतर :-
कलाटणी देणे अवघड असते हे मान्य असून देखिल एक दिलखुलास सुचवणी...:-)
सकाळी झोपेतुन जागे झाल्यावर आपण दुसर्याच कोणत्या तरी घरात आहोत ही कल्पनाच इतकी भयानक आहे की असे झाल्यास हे सगळे विसरून त्याच घरात चहा वगैरे करण्यासाठी स्वयपाकघर धुंडाळणे म्हणजे (मला) जरा अतीच वाटले. ह्या सारखे संदर्भ टाळले असते तरी कथा तितकीच उत्कंठावर्धक झाली असती पण मूळ कथेतच हे जसेच्या तसे असेल तर नाईलाज हे ही खरे.
7 Oct 2007 - 10:44 am | विसोबा खेचर
आपण दुसर्याच कोणत्या तरी घरात आहोत ही कल्पनाच इतकी भयानक आहे की असे झाल्यास हे सगळे विसरून त्याच घरात चहा वगैरे करण्यासाठी स्वयपाकघर धुंडाळणे म्हणजे (मला) जरा अतीच वाटले.
मला तरी ह्यात अतीच वगैरे काही वाटले नाही. कथेतल्या सीमाच्या जागी जर आमची प्रियाली असती तर तिने फक्त चहाच काय, मस्तपैकी मच्छीचं जेवणबिवण बनवलं असतं! :))
तात्या.
7 Oct 2007 - 11:34 am | कोलबेर
>>कथेतल्या सीमाच्या जागी जर आमची प्रियाली असती तर तिने फक्त चहाच काय, मस्तपैकी मच्छीचं जेवणबिवण बनवलं असतं! :))
तात्या, सीमाच काय तुमची साधना कोळीण असती तरी मच्छीचं जेवण बनवू शकली नसती हो.. फडताळाची सगळी दारं घट्ट बंद होती हे विसरलात काय?? :-)
कलाम साहेबांच्या केशरचने व्यतिरीक्त आता आपल्याला असहमतीसाठी आणखी एक पॉइंट मिळाला बघा :-))
7 Oct 2007 - 5:15 pm | प्रियाली
मूळ कथेत अशा टाइपचा सीन होता असे आठवते. म्हणजे चहा बिहा भारतीयकरण झाले पण ते दोघे किचनचे ड्रॉवर्स उघडतात इ. इ. काय आहे की वाचकांना कथा असल्याने काहीतरी होणार अशी धास्ती आहे ती त्या दोघांना तोपर्यंत तेवढी नाही. ते प्रवास करत होते, कोणाच्यातरी घरात सुखरुप आहेत. घरही व्यवस्थित आहे. (म्हणजे भूतबंगला इ. नाही. मॉडर्न, प्रशस्त, सूर्यप्रकाशाने भरलेले) त्यामुळे खूप भीती त्यांच्या मनात नाही. आता या पुढची गोष्ट म्हणजे...
नवरा जर सकाळी उठून म्हणाला "ह्यँगओवर! चहा दे तरतरी येईल." तर बिचारी बायको कोणत्याही परिस्थितीत चहा देईल. दिवसभर चिडचिड, कटकट कोण ऐकणार? ;-)
काय आहे की वाचकांना सतत कथेतील रहस्य दाखवून देण्याचा प्रकार आहे. चिकटवलेले ड्रॉवर्स म्हणजे फक्त सेटसाठी बनवलेले, दुकानातले रिकामे पुडे - पेरिशेबल फूडमुळे तयार केलेली प्रॉपर्टी... यांतून वाचकांना हा चित्रपटाचा सेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न. ;-) वास्तववादी विचार केला तर मात्र हे असे चहा करतील का? किंवा भली चांगली माणसं दुकानातून चोरी करतील का? हे प्रश्न स्वाभावीक आहेत. :)
असो. दिलखुलास सुचवणीबद्दल खरंच आभार! :)
7 Oct 2007 - 11:26 am | स्वाती दिनेश
मस्त कथा आणि नावही आवडले.
स्वाती
7 Oct 2007 - 12:15 pm | लबाड बोका
अतिशय छान
(जवळ जवळ घाबरलेला) लबाड बोका
8 Oct 2007 - 1:07 pm | विसुनाना
आणखी विनोदी करून 'आवाज'बिवाजला पाठवता येईल.
मस्तच!
8 Oct 2007 - 4:13 pm | सर्किट (not verified)
आवडली. राम गोपाल वर्माने आजवर सिनेमा कसा नाही बनवला यावर ?
- (शामू शर्मा) सर्किट
8 Oct 2007 - 5:11 pm | विकास
गोष्ट छानच आहे. राम गोपाल वर्मांसाठी नाही तरी निदान बीएमएम च्या एकांकीका स्पर्धेसाठी याचे नाट्यरुपांतर करता आले तर पहा. नक्कीच यशस्वी होईल. माहीती हवी असल्यास कळवा.
8 Oct 2007 - 9:38 pm | सर्किट (not verified)
सहमत आहे. एक सुंदर एकांकिका निश्चित्तच होईल. "एक उलट एक सुलट" छाप एकांकिकांपेक्षा छान होईल.
- (प्रायोगिक एकांकिकांना भिणारा) सर्किट
8 Oct 2007 - 9:56 pm | राजे (not verified)
"करकच्चून ब्रेक्स दाबून एसटी थांबली तशी रवी उभ्या जागेवरच कोलमडला. फाटक्या अंगाचा, पोरगेलासा ड्रायवर, गालावर दाढीचे खुंट खाजवत तरवीकडे आश्चर्याने पाहात होता."
काय दिल्ली सफर केली वाटत डीटीसी मधून ;} नाही केली तर एकदा करुन पाहाच.
एक मात्र गोष्ट तुमची मला आवडली तुम्ही वाचकांना कथेचा एक भाग बनवता व वाचकाला असे वाटते की कथा नायक / नायिका ह्यांच्या मागे मागे तो देखील हे सर्व पाहत फिरत आहे.... उदा. "समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.
" हे वाक्य वाचले रे वाचले तो सीन [चित्र] डोळ्यासमोर येते व असे वाटते की रवी व सीमा दोघे बस कडे पाहत आहेत व मी त्यांच्या मागून त्यांना व त्या बस ला पाहत आहे, ह्यातच तुमच्या लेखनाचे यश सामावलेले आहे, अभिनंदन.
राजे
(*हेच राज जैन आहेत व ह्यांना ही कथा खुप ... खुप....... खुप X १००० वेळा आवडली आहे)
माझे शब्द....
9 Oct 2007 - 11:07 am | चित्तरंजन भट
कथा भयानक आवडली. का आवडली हे सांगता येणार नाही. बांधणी उत्तम आहे, उत्कंठा कायम ठेवली आहे, अप्रतिम कलाटणी वगैरे कारणे द्यायची असतातच. पण मला प्रियालीचे लेखन आवडते. ( मी आणि प्रियाली एकाच कंपूतले आहोत, हे काही कारण झाले नाही. )
प्रियालीताई, इतिहासावर आधारित एखादी भयकथा आल्यास अधिकच मजा येईल. विचार करा.
चित्तर
9 Oct 2007 - 11:30 am | सर्किट (not verified)
माझा एक प्रयत्नः
मंगल पांडे त्याच्या कोठडीत गपचिप पडला होता. तेवढ्याअत इंग्रजाच्या एका भुताने त्याला गोळी मारली. गोळीत गायीची चरबी आहे, असे त्याला वाटले.. आणि अगागा , मेलो मेलो असे म्हणत तो उठला..
(ते स्वप्न होते, हे लक्षात आले लगेच, कारण सर्व*क्षी चा लेख वाचूनच मंगल झोपला होता.... अशी भीतिदायक स्वप्ने त्यानेच पडतात...)
- (स्वातंत्र्यसैनीक, नव्हे स्वातंत्र्यसेनापती) सर्किट
28 Dec 2008 - 12:18 am | धम्मकलाडू
मी काहीच बोलणार नाही. पण प्रतिसाद भयंकरपणे गंभीर असा आहे.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
9 Oct 2007 - 6:52 pm | प्रियाली
कथेला प्रतिसाद देणार्या सर्वांचे विशेषतः मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपूगिरी अबाधित ठेवून आपल्याच कंपूतील लोकांना भरघोस प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
विकास,
बीएमएमला पाठवण्यासारखी गोष्ट तयार आहे का याबाबत साशंक आहे पण कथाबदलाबाबत तुमची सुचवणी मात्र नक्कीच वाचायला आवडेल.
सर्किट,
तुम्ही एक स्वतंत्र भयकथा, गूढकथा लिहाच. तशी फार गरज नाही म्हणा, आयपी शोधतो सांगितले की सगळे आपोआप टरकतील. ;-)
10 Oct 2007 - 12:15 am | विसोबा खेचर
विशेषतः मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपूगिरी अबाधित ठेवून आपल्याच कंपूतील लोकांना भरघोस प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हा हा हा! 'मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपुगिरी' हे शब्द आवडले..
थोडक्यात कंपुगिरीचे मूळ मनोगतात आहे हे सांगितलेस ते बरे झाले. मनोगतावर प्रथमत: कंपुगिरी सुरू केली ती आमच्या विन्याने! मी कंपुगिरी करायला त्या फोकलिच्या विन्याकडूनच शिकलो! :))
विन्या की जय हो.... :)
आपला,
(महान कंपुबाज) तात्या.
10 Oct 2007 - 3:39 am | बेसनलाडू
मस्त पकड घेत होती ('आहट' मध्ये वगैरे व्हायचे तसे ;)); शेवट कळल्यानंतर मात्र 'फुस्स' अशी प्रतिक्रिया झाली (कदाचित हेच अपेक्षित होते का प्रियाताई?)
प्रियाताईकडून यापेक्षा सुरस भयकथा वाचायची सवय झाल्याने ही कथा तितकीशी आवडली नाही :( ('शेवटाच्या' आधीचा भाग वगळता) 'इच्छा'च्या वेळी पण माझी अशीच काहीशी प्रतिक्रिया झाली होती.
(अपेक्षाबाज)बेसनलाडू
10 Oct 2007 - 3:38 pm | प्रियाली
>>शेवट कळल्यानंतर मात्र 'फुस्स' अशी प्रतिक्रिया झाली (कदाचित हेच अपेक्षित होते का प्रियाताई?)
हो! तेथेच कलाटणी होती. :)
>>'इच्छा'च्या वेळी पण माझी अशीच काहीशी प्रतिक्रिया झाली होती.
काय दुष्ट माणूस आहेस!!! प्रत्येक गोष्टीत कोणीतरी 'भगवान को प्यारा' व्हायला हवा का? :)) असो, असा अपेक्षाभंग होणार हे माहित असल्यानेच वर 'गोष्टीतून फार अपेक्षा ठेवू नये ' असे लिहिले होते. :-)
उपक्रमावर हिचकॉकच्या लेखात एक वाक्य होते:
रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का आपल्या कपाळावरून हिचकॉकला कधीही पुसता आला नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "मी सिंड्रेला चित्रपट निर्माण केला तरी प्रेक्षक कोचावर मृतदेह दिसतो का ते धुंडाळतील.”
माझ्या ब्लॉगवरही एक दोघांचा असा अपेक्षाभंग जाणवला. प्रियाताई स्वतःला हिचकॉकच्या पंक्तीत बसवत नाही बॉ! पण टाईपकास्ट तरी नको. ;-)
10 Oct 2007 - 9:53 pm | बेसनलाडू
प्रियाताई स्वतःला हिचकॉकच्या पंक्तीत बसवत नाही बॉ! पण टाईपकास्ट तरी नको. ;-)
वेगासचे वर्णन, शिल्पचित्रांची मांडणी, हिचकॉक, फ्लाइंग डचमन वरचे लेख, मासळीवरील तात्यांच्या लेखाला आणि इतरत्रही दिलेले अनेक प्रतिसाद लक्षात घेतले, तर टाइपकास्टिंगची चिंता निदान तू तरी करू नयेस प्रियाताई. पण भयकथा लिहिण्याच्या बाबतीत तुझा आणि काही अंशी अनुताईचा हात धरू शकणारे कमीच नाही का ;) त्यामुळे असे रामू वर्मा / आहट टाइप वातावरणनिर्मिती करणारे काही वाचले की आमचे डोके थरारक शेवटाच्या दृष्टीनेच तयारी करू लागते. याला तू हवे तर आमच्या डोक्याचे (लिमिटेड) टाइपकास्टिंग समज, तुझ्या लेखनाचे नाही. असो.
(टाइपकास्टेड)बेसनलाडू
10 Oct 2007 - 3:41 pm | धम्मकलाडू
बेला तुजा फुस्स परतिसाद वाचुनश्यानि आपिक्शाबंग जाला न्हाइ. कहाणी लय भारी पिर्यालि. लिवत जा.
(यष्टीप्रेमी) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
10 Oct 2007 - 9:56 pm | बेसनलाडू
तुझा अपेक्षाभंग करण्यासाठी प्रतिसाद लिहिला नव्हताच खोजा!!!
(प्रतिसादमास्टर)बेसनलाडू
"तुझ्या (**)त धमक किती? तू नडतोस किती?"
12 Oct 2007 - 4:09 pm | धम्मकलाडू
चीडला :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?तू चिडतोयस किती?"
23 Dec 2008 - 4:50 pm | सिद्धू
छान....कथा उत्कंठावर्धक आहे.
8 Oct 2010 - 11:08 pm | पैसा
ऑक्टोबर आहे. प्रियाली स्पेशल!
8 Oct 2010 - 11:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त आहे कथा!
8 Oct 2010 - 11:43 pm | प्रियाली
कथेबरोबर काही जुनेपाने प्रतिसादही मस्त आहेत. पुन्हा वाचताना मजा आली. ;)
नवप्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.
9 Oct 2010 - 1:36 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू ;)
14 Apr 2016 - 4:32 pm | मराठी कथालेखक
इथे कथेच्या ठिकाणी फक्त तीन टिंबे (...) दिसत आहेत, कसे काय ?
14 Apr 2016 - 4:52 pm | यशोधरा
आहे की कथा, तुम्हाला दिसत नाहीये?
14 Apr 2016 - 5:04 pm | मराठी कथालेखक
नाही. फक्त टिंब तेवढी दिसत आहेत. Proxy आणि Proxy शिवायही पाहिल, वेगळ्या browser ने पण पाहिलं तरी काही दिसत नाही.
14 Apr 2016 - 5:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा वर सर्व सदस्यांना लेखन प्रतिसाद संपादनाची सुविधा होती. किरकोळ कारणावरुन मिपावर काही सदस्यांचे पटायचं नाही आणि मग रागाच्या भरात मिपाकरांनी आपले लेखन काढून टाकले. आणि शीर्षकात टिंबटिंब भरून ठेवले.
काही मिपाकर चांगले लिहायचे त्यांना वाटलं की आपण मिपा सोडून गेलो आणि लेखन काढून टाकले की मिपा बंद पडेल. आता काय सांगायचं ! आपल्या देशाला स्वांतन्त्रय मिळाल आणि पंतप्रधान नेहरू नंतर या देशाचं कसं होईल असे प्रश्न लोक विचारायचे देशाचे तब्बल पंधरा पंतप्रधान झालेत, देश अतिशय गुण्या गोविंदाने चालु आहे. मिपाचं तसच आहे, लोक येतील जातील. मिपा अवह्यातपणे चालू राहील.
वरील कोणी आयडी स्री की पुरुष मिपावर होता, हेही मी विसरून गेलो आहे.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2016 - 5:14 pm | मराठी कथालेखक
वा. फारच रंजक इतिहास आहे मिपाचा :)
पण वर यशोधरा यांनी आजच मला प्रतिसाद दिला आहे
ते कसे काय ?
14 Apr 2016 - 5:18 pm | गवि
हे राम..
14 Apr 2016 - 5:26 pm | यशोधरा
कथालेखक, तुम्ही प्रा डॉ ह्यांचे ऐकू नका अज्जिबात, ते पुण्यवान नैत, तेव्हा, त्याना कथा दिसत नै. पण तुम्हांला पण नै दिसत?
14 Apr 2016 - 5:33 pm | मराठी कथालेखक
मला दिसली नाही म्हणूनच तर मी प्रतिसाद टाकून २००७ चा धागा वर आणला. आता एस यांनी एक दुवा दिलाय, तो दिसतो.
बाकी तुम्ही नेमके काय पुण्य केले ज्यामुळे तुम्हाला कथा दिसत आहे :)
14 Apr 2016 - 7:56 pm | यशोधरा
त्ये शिक्रेट हाय :)
14 Apr 2016 - 5:22 pm | गॅरी ट्रुमन
विसरण्यायोग्यच गोष्ट आहे ही. :)
अशा अहंमन्य माजी सदस्यांनी इतरत्र मिपा आणि मिपाकरांविरूध्द कितीही गरळ ओकली तरी आपल्या मिपाचाच पहिला नंबर असणार आहे.
14 Apr 2016 - 4:55 pm | सरल मान
कथा भयानक आवडली, अजून येऊ द्यात.....
14 Apr 2016 - 5:30 pm | एस
कथा
14 Apr 2016 - 5:35 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद !!
14 Apr 2016 - 5:48 pm | मराठी कथालेखक
एस यांनी दिलेल्या दुव्यावरुन वाचली. मस्त आहे. पण मिपावर आता नाही हे वाईट झाले.
14 Apr 2016 - 7:53 pm | जव्हेरगंज
शेवटी जरा अपेक्षाभंगच झाला.
पण लिवलय खतरा !
साष्टांग __/\__
15 Apr 2016 - 2:16 am | नुस्त्या उचापती
कथा वाचली .आवडली .
ज्यांना ही कथा दिसत नाही , त्यांच्यासाठी ...
कथेचे शिर्षक = तीन टिंबं[ ... ]
कथा थोडक्यात अशी ...
एकदा तीन टिंबं होती ... एक टिंब म्हणालं , " काय रे टिंबू ? ... " दुसरं टिंब म्हणालं , " काय म्हणतोस रे हिंबा टण्या ? " तिसरं म्हणालं , " आपण काही म्हणायला नको बाबा !आधीच आपण आहोत लिंबू -टिंबू . उगीचच भांडणं व्हायची . "
.
.
.
आणि मग शेवटी तिन्ही टिंबं सुखाने एकत्र राहू लागली .
15 Apr 2016 - 4:33 am | साहना
कथा फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही कारण कथेत खोली नाही आहे. थोडी उथळ वाटते आहे. विषम आहे, थोडी सम्यक असली तर चांगले झाले असते.
15 Apr 2016 - 4:53 pm | मम्बाजी सर्वज्ञ
छोटे छोटे भाग करून टाकले असते तर अजून मजा आली असती (अजूनही संधी गेलेली नाही)
15 Apr 2016 - 4:56 pm | मराठी कथालेखक
तीन टिंबांचे छोटे छोटे भाग ? :)
12 Mar 2018 - 3:34 pm | Amol Narkhede
केवळ "..." इत्केच दिसत आहे. क्रुपया मदत करा.
14 Mar 2018 - 12:24 am | रुपी
http://priyambhashini.blogspot.com/2007/09/blog-post.html