अवांतर आधी :
माझी आई रांगोळी काढताना फक्त ठिपक्यांचे कासव काढायची(दुसरी रांगोळी तिला येत नाहिच हीच आमची खात्री आहे ).
मग मी -ताई -पप्पा सगळे चिडवायचो तिला .. दरवेळेस काय ते कासव ग..
नंतर ताई रांगोळी काढायला लागल्यावर मग आमच्या आंगणाला शोभा आली, आणि गणपतीला वगैरे बक्षिसे पण आली घरात.
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 4:23 am | Nile
वॉलपेपर करावा असा फोटू आहे. मागे अंधुक काहीतरी आहे ते नसतं (फक्त निळं आकाश असतं?) तर अधिक चांगला आला असता का?
10 Feb 2011 - 5:03 am | चित्रा
नाव लाल जास्वंद आहे, पण फोटोत पिवळा रंग उठून अधिक दिसतो आहे असे वाटते.
10 Feb 2011 - 5:31 am | सुनील
जास्वंदाच्या पाकळीपेक्षा मधला तुरा अधिक उठावदार दिसतो आहे. किंबहुना, तोच उद्देश असावा!
अवांतर - जास्वंदीचे फुल केसात माळले जात नाही अशी माझी आजवर समजूत होती. तिला नुकताच धक्का पोचला!
10 Feb 2011 - 6:25 am | सहज
'जास्वंदीचा तुरा' शीर्षक जास्त योग्य वाटते आहे. झूम, लेन्स इ. इ. तांत्रीक माहीती?
मिपावर अती पाकृ वाचायचा परिणाम की काय हा काहीतरी खाद्य पदार्थ आहे, चीज असलेला व खावासा वाटतो आहे ;-)
10 Feb 2011 - 8:35 am | llपुण्याचे पेशवेll
अंबळ भगवी दिसत आहे माझ्या मॉनिटरवर. :(
10 Feb 2011 - 8:56 am | अमोल केळकर
जास्वंदीला इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिले. मस्त फोटो :)
अमोल
10 Feb 2011 - 12:53 pm | गणेशा
फोटो दिसला नाही,
सुनील यांनी दिलेला फोटो मातत्र दिसला
10 Feb 2011 - 3:42 pm | कच्ची कैरी
मी रांगोळी काढतांना नेहमी जास्वंदाच फूल काढते ,बाकी फोटो एकदम उत्तम आहे !
10 Feb 2011 - 4:18 pm | गणेशा
अवांतर आधी :
माझी आई रांगोळी काढताना फक्त ठिपक्यांचे कासव काढायची(दुसरी रांगोळी तिला येत नाहिच हीच आमची खात्री आहे ).
मग मी -ताई -पप्पा सगळे चिडवायचो तिला .. दरवेळेस काय ते कासव ग..
नंतर ताई रांगोळी काढायला लागल्यावर मग आमच्या आंगणाला शोभा आली, आणि गणपतीला वगैरे बक्षिसे पण आली घरात.
आपले पण तसेच आहे का ? नेहमीच जास्वंदाचे फूल..
11 Feb 2011 - 6:54 am | मदनबाण
छान... :)