लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने
कळवळले आकाश सारे, सोबत मूकपणे
होते मनी काय आणि काय घडले आज
मीच माझ्या अंतरीचा घेत आहे ठाव
कालच्या त्या आठवणी आज जाग्या जाहल्या
वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या
धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले
का पशुसम वागणे अन खेळ असे हे मांडले
त्रिवार पाहून घेत आहे आज तुझ्या या मंदिरा
या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा
पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले
लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले
- परी
प्रतिक्रिया
9 Feb 2011 - 2:57 pm | कच्ची कैरी
हे परी कविता मस्तच जमलीय !आवडली मला तर!
9 Feb 2011 - 2:59 pm | निवेदिता-ताई
:)
10 Feb 2011 - 4:48 pm | गणेशा
कविता खुप छान लिहिली आहे , आवडली .
या ओळी विशेष आवडल्या:
पहिल्यांदा कविता वाचली तेंव्हा कवितेतील नायिका विरहबोल बोलताना तिच्या सख्याला उद्देशुन बोलते आहे असे वाटले होते.
नंतर निट वाचतना आणि विशेषता:
या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा या ओळी मुळे ह्या कवितेत नायक देवाला उद्देशुन बोलतो आहे असा बोध झाला. त्यामुळे या ओळी वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या आधी वेगळ्या वाटल्या होत्या आता वेगळ्या वाटल्या.
तुम्हीच सांगा काय बरोबर ते ...
11 Feb 2011 - 7:21 am | मदनबाण
मस्त... :)
11 Feb 2011 - 7:39 am | प्राजु
केवळ सुरेख!! अतिशय सुंदर!!
11 Feb 2011 - 11:21 am | स्पंदना
य्यस्स!! हेच म्हणेन.
11 Feb 2011 - 11:26 am | आजानुकर्ण
शोधा म्हणजे सापडेल. - येशू ख्रिस्त.
12 Feb 2011 - 6:47 pm | तृणफुल
छान..छान..छान !!!! :)