हे कवितेचे झाड....!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
9 Feb 2011 - 8:21 am

हे कवितेचे झाड
माझे आहे
तुमचे आहे
ह्याचे आहे
त्याचे आहे
सर्वांचे आहे
सर्वत्र आपले- पणाची भावना आहे ..!!

या ..!!
मनसोक्त बसा
चिवचिव करा
चिवचीवेचे सूर होतील
काही सूर बेसूर असतील
हरकत नाही ...!!
पण शेवटी
सुरांचे एक गाणे होईल
गाण्याची गझल होईल
मग छान मैफल जमेल

सगळेच काही गाणारे नसतात
सगळेच कोणी कवी नसतात
ते नसतात नि तुम्ही असता [?]
त्यांच्या सुरांना साथ नसते
नि तुमचे सूर गगन भेदते
त्यांच्या मुळे तुम्ही मोठे
एवढेच फक्त लक्षात ठेवा ..!!

हे चंद्र , सूर्य , तारे
ही फुले झाडे
ह्या नद्या नाले
आम्ही आहोत म्हणून ते आहेत
त्यांचा आम्हाला आधार आहे
म्हणून त्यांनी गर्व करावा ....?
हे निव्वळ खोटे आहे...!!

देव देव ..कोठला देव ...?
भक्त आहेत म्हणून देव आहे
सगळेच देव... नि भक्त नाही ..
हे असेल तर काय होईल ..?
देव सुद्धा राक्षस होतील ...

काही डावे ...
काही उजवे..!!
काही काळे ..
काही गोरे..!!
म्हणून कोठे कोठे भाव आहे
कोठेतरी नाव आहे ...!!

एवढेच फक्त लक्षात ठेवां
बाकी सगळे विसरून जा ....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

9 Feb 2011 - 11:02 am | कच्ची कैरी

तुमच्या कवितेच्या झाडाखाली चिवचिव करायला मला तर आवडेल बुवा !

यशोधरा's picture

9 Feb 2011 - 11:30 am | यशोधरा

आवडली कविता

गणेशा's picture

9 Feb 2011 - 12:28 pm | गणेशा

मस्त

मेघवेडा's picture

10 Feb 2011 - 1:00 am | मेघवेडा

शीर्षकावरून मला वाटलं 'हे चिंचेचे झाड' चे विडंबन आहे की काय! ;)

मस्त कविता! आवडली. :)

त्रिवेनि शेवते's picture

15 Feb 2011 - 1:27 pm | त्रिवेनि शेवते

आवडली