गाभा:
दिनांक २२ मे २००४ पासून आतापर्यंत पंतप्रधान असलेल्या माननीय मनमोहनसिंग यांच्या कालावधीतील, भारतातील सर्वात मोठे, राष्ट्रकुलस्पर्धा व स्पेक्ट्रम घोटाळे उघडकीस आलेले आपणा सर्वांना माहीती आहेच. या घोटाळ्याचे दोषी म्हणून कलमाडी व राजा यांचेकडे निर्देश केला जात आहे. जणूकाही फक्त हेच दोघे दोषी असल्याचे वातावरण आहे आणि सर्व माध्यमे पंतप्रधान मनमोहनसिंग कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे पुनःपुन्हा सांगत आहेत. त्यामुळे सामुहीक जबाबदारीचे तत्त्व वगैरे काही असते हे यांना लागू नाही का ? जर आघाडीचे राजकारण व इतर काही कारणांमुळे यांचे हात बांधलेले असतील तर कमीत कमी राजीनामा देवून खरेच स्वच्छ आहोत हे सिध्द करता आले नसते का? त्यामुळे हे खरेच स्वच्छ आहेत का ? असे काही प्रश्न मनात आले. मिपाकरांचे मत जाणून घेण्यास उत्सुक.
-सूर्यपुत्र.
प्रतिक्रिया
6 Feb 2011 - 9:01 pm | चिरोटा
सिंग ह्यांनी राजीनामा दिल्याने ज्यांनी घोटाळे केले त्यांना कशावरून शिक्षा होईल?
नीरा राडिया आणी बड्या धेंडांची बोलणी ३०० दिवस आयकर खात्याने टॅप केली होती. ह्यागोष्टी पंतप्रधानांच्या पूर्वसंमतीशिवाय होवू शकत नाहीत. तीच गोष्ट जयराम रमेश ह्यांनी आदर्श ईमारत पाडण्याचा घेतलेला निर्णय.सिंग स्वच्छ आहेत की नाहीत हे त्यांचा ईतिहास बघूनच पहावे लागेल.
6 Feb 2011 - 10:00 pm | अर्धवटराव
सामुदाईक जवाबदारी वगैरे ठीक आहे हो, पण त्याकरता पंतप्रधानांनी राजीनामा देउन राजकीय अस्थीरतेला आमंत्रण का द्यावे? प्रधानमंत्र्यांना इतर आवश्यक जवाबदार्या देखील पार पाडायच्या असतात...त्या कोण सांभाळणार ?
अर्धवटराव
6 Feb 2011 - 11:36 pm | अविनाशकुलकर्णी
ते अकार्य क्षम आहेत असाहि एक आरोप आहे
6 Feb 2011 - 11:43 pm | वडिल
काहि मुद्दे पटतात.
पण आधुनिक भारताचे खरे निर्माते मनमोहन सिंग आहेत. त्यांचा राजीनामा मागणे चुक आहे.
जो पर्यंत राहुल जी पंतप्रधान पदा साठि तयार होत नाहित तो पर्यंत मनमोहन यांनाच पंतप्रधान पदा वर ठेवणे योग्य आहे.
7 Feb 2011 - 12:15 am | अविनाशकुलकर्णी
राहुल जी पंतप्रधान पदा साठि तयार होत नाहित तो पर्यंत मनमोहन यांनाच पंतप्रधान पदा वर ठेवणे योग्य आहे.
कमाल आहे मा साहेबांना विसरलात? राष्र्ट पति पदा साठी दुसरा उमेदवार कोण आहे?
7 Feb 2011 - 1:01 am | वडिल
हे मुद्दे वादातित आहेत.
उगाच मनमोहन सिंगाना ह्या वयात ( ७०+) ह्यात गोवण्यात अर्थ नाहि.
कुणा मंत्र्या ने केलेला गैरव्यवहार त्यांच्या माथी मारण्यात बरोबर वाटत नाहि. ते त्यांचे काम शांतपणे करताहेत ते त्यांना करु द्दावे.
7 Feb 2011 - 8:36 am | मराठी_माणूस
ते त्यांचे काम शांतपणे करताहेत
अच्छा , म्हणजे ते काही काम करत आहेत तर ? कोणते बरे काम असावे ते ?
7 Feb 2011 - 1:05 am | अनिता
मा. मनमोहन सि॑गा॑च्या कारकिर्र्दितच हे घोटाळे उघडकीस येत आहेत्..कार्य क्षम अस्ल्याशिवाय असे होइल का?
9 Feb 2011 - 10:28 am | महेश-मया
हे कसले पंतप्रधान, खर्या पंतप्रधान तर सोनिया बाई त्यांना तर जोड्याने मारायला पाहिजे.
बाई म्हनेन तसे वागणारे आपल्या मनमोहन सिंगाना पंतप्रधान म्हनावे कि नंदि बैल