माता ही घाबरी ---

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
6 Feb 2011 - 8:44 am

[चाल: राधा ही बावरी -]

गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते
ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते
त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई
माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी !

इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना
थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना
तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई
तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ?

आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती
पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती
ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई
ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !

करुणविडंबन

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

6 Feb 2011 - 9:39 am | प्रकाश१११

छान आणि मस्त जमलीय .!!

नरेशकुमार's picture

6 Feb 2011 - 12:08 pm | नरेशकुमार

एकदम मस्त.

आयला,.... लोकांना हल्ली अडचनींचे काहीच वाटेनासे झाले आहे.

गणेशा's picture

7 Feb 2011 - 6:01 pm | गणेशा

मस्त

अजून एक विडंबन सुचतयं .. राधा ही पादरी

शौचलया समोर लांब रांग पाहता , पोट ठुसठुसते
ऐकून हॉर्न, विसरून भान, ही वाट काढण्या बघते
त्या गर्दीच्या विळख्यामधुनी- हाक आतल्या देई
राधा ही पादरी जोश्यांची, राधा ही पादरी !

टारझन's picture

8 Feb 2011 - 5:08 pm | टारझन

मनातले विडंबण :) =)) पादणे जगात कोणालाही चुकलेले नाही. आणि जो ह्या वैश्विक सत्याला नकार देतो /ते , तो ढळढळीत खोटं बोलतो. तेंव्हा "राधा जोषी = युनिव्हर्सल व्हेरियेबल " असे डिस्क्लेमर टाकावे असे सुचवतो.
विडंबणातले दुसते कडवे जशे च्या तशे (थोडेशे शब्द बदलुन ) इथे कंटिण्यु केल्यास चालु शकेल.

इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना
थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना
तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई
तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ?

- (कवितक गुर्जी ) रमोल

ज्ञानराम's picture

8 Feb 2011 - 4:58 pm | ज्ञानराम

गोगोल @
काय ओ हे?????
दुसरं काही सुचल नाही का

ज्ञानराम's picture

9 Feb 2011 - 9:47 am | ज्ञानराम

वैश्विक सत्याला कोण नकार देतो रे रे ? त्याच घरच उन्हात बांधू..

Pearl's picture

9 Feb 2011 - 10:06 am | Pearl

विदेश,

अप्रतिम कविता :)

अमोल केळकर's picture

9 Feb 2011 - 10:10 am | अमोल केळकर

असेच म्हणतो

अमोल केळकर