कोणास ठाऊक कविता का सुचली ...
उत्कटतेत कदाचित निर्मिली
उदात्ततेत कदाचित उमटली
सौंदर्य अविष्कारात कदाचित रेखाटली..
कविता, नक्की घडते कशी??
भावनांची उत्कटता उमटली असावी
पण मला कशी जमली
नियतीने शिकवली
तिने रंगविली
बाहेर पडली ती उत्कटता
बाहेर पडली ती उग्रता
बाहेर पडली ती भेसूरता
भाव-भावनांची...
कदाचित, नियतीचा हा खेळ नसता,
तर नसती 'ती' पण कदाचित,
अनभिज्ञच असतो मलाच मी,
स्व-अर्थाचा हा आविष्कारच झाला नसता
म्हणून का नियतीने हा रंग दाखविला?
माझ्यातल्या मी ला 'मी' दाखवायला...
प्रतिक्रिया
2 Feb 2011 - 7:28 pm | प्रकाश१११
अभिषेक -छान. पु.ले.शु.
2 Feb 2011 - 7:30 pm | गणेशा
छान जमली आहे कविता