पण...बंड करणार नाही...

अमोल देशमुख's picture
अमोल देशमुख in जे न देखे रवी...
1 Feb 2011 - 1:21 pm

(मा.सलिलदांच्या कवितेतील काही ओळी त्यांची क्षमा मागुन)

भ्रष्ट्राचाराचे कितीही पेव फुटूदे
माफीयांना येथे राज्य करु दे
घोटाळ्यांची मोठी रास पडुदे
काळ्या धंद्यांचे रान माजुदे
पण मी मोर्चाही नेणार नाही
अन संपही करणार नाही
नेत्यांना माझा देश लुटू दे
काळ्या पैशांनी बॅंक भरु दे
महागाई गगनाला भिडु दे
लोकशाहीचा खुनही होवुदे
पण मी मनातल्या मनात कधी
दंगाही करणार नाही अन
याचा निषेध सुध्दा साधा
कधी नोंदवणारही नाही
मी मनातल्या मनात कुढत
माझे आयुष्य जगेन
आता भ्रष्टाचार हाच धर्म
भ्रष्टाचारी नेते आमचे धर्मगुरु
आणि आम्ही त्यांचे
अंध अनुयायी.....................

खरच सामान्य जनता किती हतबल आहे, सारं काही सहन करते, उद्या पेट्रोल १०० रु झाले तरी रांगेत उभे राहुन मुकाटपणे घेईल, कांदा ५० रु झाला तरी डोळ्यात पाणि न येवु देता तो खरेदी करेल, भाज्या महाग झाल्या तर झुनका भाकर खाईल, आतापर्यंत एकटा शेतकरी आत्मह्त्या करीत होता, उद्या महगाईत होरपळुन कुटूंबासहित आत्महत्या करील, पण...बंड करणार नाही...सत्ताधा-यांना जाब विचारणार नाही...आंधळ्याच सोंग घेवुन हे जीवन परीस्थीतीच्या जात्यात दळत राहील आणि भ्रष्टाचारी नेते, माफीया, मात्र सारच पिठ खात राहतील माझही माझ आणि तुझही माझं या अविर्भावात.............

करुणविडंबन

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

1 Feb 2011 - 1:47 pm | कच्ची कैरी

आता मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

कविते मागची भावना .. तळमळ कळते आहे .. ..
मस्त लिहिले आहे

अवांतर : ही कविता सलील कुलकर्णी यांची नसुन संदिप खरे यांची असावी असे वाटते आहे

अमोल देशमुख's picture

1 Feb 2011 - 4:05 pm | अमोल देशमुख

खरे खरे खरे आहे ही कविता संदिप खरे यांचीच आहे, दिलगीर आहोत, आणि चुक दाखवुन दिल्याबद्द्ल आपला आभारी आहे.

गणेशा's picture

1 Feb 2011 - 4:34 pm | गणेशा

दिलगीर, चुक दाखवुन दिल्याबद्दल , आभारी आहे ..
ह्या शब्दाची काही गरज नाही भावा ...

लिहित रहा .. वाचत आहे.
फक्त एक विनंती : विडंबन छान असतेच आणि त्याला रिप्लाय ही छान येतातच पण विडंबन नसलेल्या पण कविता येवुदे मस्त वाटेल . विडंबन नसताना केलेली कविता स्वताला खुप आनंद देवुन जाते असे वयक्तीक वाटते म्हणुन वाटले सांगावे)